नुकत्याच झालेल्या ट्रिप मधे भारतीय कस्टमचा एक सुखद अनुभव आला. (झक्की ऐकताय ना? )
झालं असं कि आम्ही एअर इंडियाच्या सलग विमानसेवेने मुंबईत पोहोचलो. सुट्टीकरता गेलेलो त्यामुळे फारसं सामान नव्हतच. पटापट बॅगा घेउन ग्रीन चॅनल मधुन निघालो. हल्ली कस्टम मधे पुर्वीसारखा त्रास नसतो त्यामुळे निश्चिंत होतो. एका बॅग मधे फोन, इलेक्ट्रिक शेवर असल्या चटरफटर इलेक्ट्रॉनीक वस्तु होत्या. ती बॅग त्यांनी उघडायला सांगितली. ते सोपस्कार झाल्यावर निघालो. टॅक्सीत बसुन अर्ध्या रस्त्यावर आलो तेव्हा माझ्या डोक्यात दिवा पेटला. एक छोटी बॅगपॅक नाहिच्चे. त्यात डिजीकॅम, हँडीकॅम, माझं नविन जॅकेट ह्या गोष्टी होत्या. झालं! एकमेकांवर आरडाओरडा करुन झाला. कुठे राहिली असेल ह्यावर भांडुन झालं. शेवटी प्रीपेड टॅक्सी शोधायला एका माणसाने मदन केलेली त्यानेच चोरली असणार आणि परत जाउन काही उपयोग नाही. कॅमेरे गेले!! असं वाईट कन्क्लुजन काढुन आम्ही घरी पोचलो.
घरी गेल्या गेल्या कुणाला काही सांगितलं नाही. झोपता झोपता पुन्हा विचार केला. तेव्हा कस्टम मधे पण राहिली असु शकेल असं वाटलं. एक अंधुक आशा वाटत होती कि बॅगेवर पत्ता आणि फोन नंबर आहे. कुणा सदगृहस्थाच्या हातात पडली तर कदाचीत मिळेल सुद्धा. त्यात एक वाईट गोष्ट झालेली कि घरचा फोन नीट चालत नव्हता. तेव्हा सेल फोन नंबर का नाही टाकला ह्या साठी चुकचुकाट करुन झाला. झोपलो.
सकाळी सकाळी ६ वाजता फोनची एक रिंग वाजली नी फोन बंद झाला. आमच्या आशा थोड्या पल्लवीत झाल्या. परत ३,४ वेळा असं झालं. उचले पर्यंत फोन कट होत होता. पुन्हा वाजला. किरणने एका झेपेत उचलला. प्रचंड खरखर... त्यातुन त्याला कस्टम, किरण भावे एवढे २ शब्द ऐकु आले. पुरेसे होते.
मग काही पुन्हा फोन आला नाही. पण जी कोणी व्यक्ती करत होती तिने खुप वेळा ट्राय केलेलं.
उजाडल्यावर किरण एअरपोर्ट वर गेला. पण प्रॉबलेम असा कि तिथे आत जाणं कठिण. तिथे त्याला अजुन एक माणुस भेटला ज्याचं सामान राहिलेलं. त्याच्याकडुन कस्टमचा नंबर घेउन त्यांना फोन केला. पण तिथे कुणाला काहिच माहिती नव्हतं. झालेलं असं कि आम्ही आलो तेव्हाचे अधिकारी आता घरी गेले होते आणि त्यांची ड्युटी २ दिवसांनंतर होती. आशा परत मंद झाल्या. (रच्याकने, त्यांनी ड्युटी पुर्ण १२ तास असते)
२ दिवसांनी पुन्हा किरण गेला. पुन्हा फोन केला. अधिकारी त्या दिवशीचे होते. तेव्हा एक अधिकारी बाई होती तिने आमची बॅग एअर इंडियाच्या हवाली केलेली. तिचं आम्हाला फोन करत होती. गेट पास इत्यादी सोपस्कार केल्या नंतर गुहेत प्रवेश मिळाला. असंख्य हरवलेल्या सामानांमधुन आमची बॅग आम्हाला मिळाली. अगदी व्यवस्थित सील केलेली होती.
लांबण लावलय.. माहित्ये, पण हा अनुभव सांगावासा वाटला. कधीपासुन लिहायचं होतं ते आज जमलं.
तुमचेही असे चांगले अनुभव असतील तर येउद्या. नेहेमीच काय शिव्या द्यायच्या.
किरणचे अॅडीशनः
त्या बाईंचे नाव मला नक्की आठवत नाहीये पण मला वाटते तिला 'लक्ष्मी'मॅडम का काहीतरी तिचे सहकारी म्हणत होते. त्या साऊथच्या असाव्यात. त्याचबरोबर ज्याने आमची बॅग प्रथम उघडून पाहिली (पण काहीही त्रास न देता सोडले) त्याचे काहीतरी मराठी आडनाव होते.
ह्या सगळ्यात केवळ कस्टमच नव्हे तर एअर इन्डियाच्या स्टाफची सुद्धा खुप सहकार्य आणि मदत झाली.
म्हणजे खरेतर कस्टम सुद्धा क्लिअर होऊन आलेली अशी ती बेवारस बॅग होती, जी नियमाप्रमाणे डिस्पोज ऑफ झाली असती. पण त्या अधिकार्यांनी ती नियमात बसवणासाठी ती बॅग त्या प्लेन मधून न येता मागाहून आली अशा धर्तीच्या रुटीन मध्ये ती घालून सुरक्षित ठेवली. त्या बाईंनी आतमध्ये किमती सामान आहे हे पाहून लगेचच ती सील केली.
मला आत कोणत्याही रेफरन्सशिवाय आत येण्यासाठी त्यांनी एक माणूस बाहेर पाठवून माझा पासपोर्ट आत नेऊन माझ्यासाठी आयत्या वेळी गेटपास बनवून आणला. नंतर त्यानेच मला अनेक रजिस्टर्स वर सह्या करवून आतल्या लॉकप मध्ये ठेवलेली बॅग बाहेर आणण्यापासून हातात मिळेपर्यंत मदत केली.
मी इतका भांबावून गेलो होतो की मला ह्यापैकी कोणाचेच नाव विचारायचे देखील सुचले नाही.
फक्त रेफरंस साठी २० जूनला भारतात पोचलेली AI 140 ला रिसिव्ह केलेली टीम एवढाच रेफर्न्स शिल्लक आहे.
कोणाला असे वाटेल की केले तर त्यात काय एवढे, आपल्याला सापडले असते तर आपणही नसते का केले. इ. पण मी म्हणतो की असे जण आणि अशी निरपेक्ष परोपकारी वृत्ती फार कमी होत चालली आहे, त्यामुळे अशा गोष्टी हायलाईट होणे फार महत्वाचे आहे.
नशीबवान आहात!
नशीबवान आहात!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
नशीबवान आहात या tangent ची
नशीबवान आहात या tangent ची गरज नव्हती.
उलटे कस्टम् चे कौतुक व्हायला हवे . असेच लोक नव्या दिशा दाखवतात
अगदी रेव्यु. नशिबवान असुही
अगदी रेव्यु.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नशिबवान असुही आम्ही मंदार, पण त्यामुळे त्या कस्टम अधिकारीचा चांगुलपणा दुर्लक्षुन कसं चालेल? तिचं खरं कौतुक.
अमृता, त्यांच्या वेबसाईटवर
अमृता, त्यांच्या वेबसाईटवर सोय असेल तर तेथे (कदाचित Ministry of External Affairs च्या वेब साईटवर असेल) किंवा पत्राने जरूर कळवावे असे वाटते. निदान जे चांगले आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल.
माझा अनूभव कष्टम्स बाबत नाही,
माझा अनूभव कष्टम्स बाबत नाही, पण असाच.
माझी बॅग कराचीला जाऊन व्यवस्थित परत आली होती. माझे फ्लाइट झुरिक ते कराची, व्हाया दुबई होते, (स्विस ) तिथून एमिरेट्स चे मुंबई होते. वेळ थोडा होता. उतरल्यावर मी बॅग ट्रन्सफर झाली का ते बघायला हवे होते.
मूबईला आल्यावर कळले कि बॅग आलेलीच नाही. पण तोपर्यंत एमिरेट्स ची ऑफीसर माझ्यासाठी निरोप घेऊन उभी होतीच. तिने माझे नंबर्स लिहून घेतले. आणि पुढे काय करायचे ते पण समजावले.
असे काहि झाल्यास, लँडींग सर्टिफिकेट घ्यावे लागते. तिथे आपल्या बॅगेचा टॅग नंबर नोंदावावा लागतो.
त्यानंतर पुढच्या फ्लाइटने दुसर्या दिवशी माझी बॅग आली. अर्थात एमिरेट्सचा लगेच फोन आला.
बॅग आणायला जाताना, पासपोर्ट, टॅग आणि लँडींग सर्टीफिकेट बरोबर न्यावे लागते. ते दाखवल्यावर आत प्रवेश मिळतो. मग रितसर कष्ट्म्स मधून बॅग क्लीयर करुन घ्यावी लागते.
पण एक वाईट अनुभव पण, एमिरेट्सचाच. वजन जास्त झाले म्हणून मी बॅगेतील काही पुस्तके हँडबॅगेत काढून घेतली. (मुंबईला ) आणि बॅगेला लॉक करायचे विसरलो. ज्यावेळी बॅग मिळाली, त्यावेळी माझा नवा कोरा मोबाईल त्यात नव्हता. त्या सर्व पॅकमधला फक्त मोबाईलच काढून घेतला होता. मी एमिरेट्सशी संपर्क साधला, मला व्यवस्थित उत्तरे मिळाली, पण चेक्ड इन बॅगमधे कुठलीही मोल्यवान वस्तू ठेवू नये हा नियम आडवा आला.
मोबाईल काढून घेतला ते एकवेळ मी समजू शकतो, पण जर काही अनावश्यक वस्तू बॅगेत ठेवली असती तर !!! माझ्या या प्रश्नाला त्यांचाकडून कधीच उत्तर मिळाले नाही. सबब चेक इन करताना बॅग लॉक करायला विसरु नका,
चांगली कल्पना आहे फारएण्ड.
चांगली कल्पना आहे फारएण्ड. जरुर करेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(ईसकाळ मधे पाठवावा का अनुभव?? बापरे!!! तिथले प्रतिसाद काय असतिल ह्याचा विचार करुनच धडकी भरत्ये.
)
ईसकाळ चुकूनही नको लिहू सबब
ईसकाळ
चुकूनही नको लिहू
सबब चेक इन करताना बॅग लॉक करायला विसरु नका,>>> दिनेश मध्यंतरी अमेरिकेत तरी चेक-इन बॅगा लॉक करू नयेत असे सांगत. अजून आहे की नाही माहीत नाही.
दिनेश मध्यंतरी अमेरिकेत तरी
दिनेश मध्यंतरी अमेरिकेत तरी चेक-इन बॅगा लॉक करू नयेत असे सांगत. अजून आहे की नाही माहीत नाही.>>
अजुन आहे कि नाही मलाही नाही माहीती पण गेले कित्येक वर्ष आम्ही बॅग लॉक करत नाही आहोत पण कधीही वाईट अनुभव नाही आलाय.
अमृताला अनुमोदन .. आम्हीही
अमृताला अनुमोदन .. आम्हीही बॅगा लॉक करत नाही आणि वाईट अनुभव अजिबात नाही ..
मध्ये नियम होता पण आता पाठपुरावा केला जातो की नाही कल्पना नाही ..
मुंबई एअरपोर्ट वर गेल्या दोन्ही वेळचे प्रवासाचे अनुभव सुखद ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमृता, त्या बाईंचं नाव आणि
अमृता, त्या बाईंचं नाव आणि संबंधीत अधिकार्यांची नावं टिपून ठेवली असलीत तर नावानिशी उल्लेख करून पत्र पाठवा. (वाईट कामाला शिव्या घालतो, तसंच) चांगल्या कामाकरता स्तुती करून प्रोत्साहन द्यावं हे फारेंडाचं म्हणणं अगदी पटलं.
अमॄता... सत्यनारायण घाला...
अमॄता... सत्यनारायण घाला...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि त्या ऑफिसरांचे कौतूक कराच...
आम्ही बॅगा लॉक करतो (यावेळी ही केल्या होत्या).
मागच्या वेळी मुंबईहुन येताना बॅग लॉक होती पण बाहेरच्या पाकिटातून चीजवस्तू लंपास झाल्या होत्या...
दिल्लीला तर (१० वर्षांपुर्वी) Security वाला '५०० च्या वरची नोट देशाबाहेर नेणे अकायदेशीर आहे' असं सांगून पैसे लाटायचा प्रयत्न करत होता...
ईसकाळ मधे पाठवावा का अनुभव??
ईसकाळ मधे पाठवावा का अनुभव?? बापरे!!! तिथले प्रतिसाद काय असतिल ह्याचा विचार करुनच धडकी भरत्ये>>>> अमृता, प्लीज नको. काये की काही मजेशीर, कुचके प्रतिसाद आले तर ते पार्ल्यात शेअर करुन मनसोक्त हसता यायचं नाही.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बाकी अनुभव चांगलाच. त्यांच्या वेबसाईटवर फिडबॅक असेल तर नक्की टाक.
ईसकाळ मधे लिहाच ! मज्जा येइल.
ईसकाळ मधे लिहाच ! मज्जा येइल.
ईसकाळ्च्या प्रतिक्रियांचा एक
ईसकाळ्च्या प्रतिक्रियांचा एक नमुना मला लालूने मगाच पार्ल्यात दिला.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
'आमच्याकडे काही अनुभव नाहीत आम्ही सामान विसरत नाही'
मृ, माझ्याकडे तिचं नाव नाहिये ग, किरणला आठवत असेल तर बघते. खरच त्यावेळी ह्या गोष्टी लक्षात आल्या नाहीत.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
देसाई, १० वर्षांपूर्वीच काही
देसाई, १० वर्षांपूर्वीच काही सांगु नका.
आणि बाहेरच्या कप्यात सामान ठेवावंच का म्हणते मी?? ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
फारेन्ड्ला अनुमोदन अमृता,
फारेन्ड्ला अनुमोदन![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अमृता, लिहिणार तर लिही, पण शेवटचं वाक्य गाळ
आम्हालाही असाच अनुभव आला.
आम्हालाही असाच अनुभव आला. मागच्या वेळी सुनितची बॅग राहिली होती. ३-४ दिवसांनी घरपोच मिळाली. आणि बॅगेतली एकही वस्तू गहाळ झाली नव्हती.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आम्हीही कधीच कुलुपं लावत नाही बॅगेला! कधीच काहीच प्रॉब्लेम आला नाही.
टच वूड!!
बाहेरच्या कप्यात सामान
बाहेरच्या कप्यात सामान ठेवावंच का म्हणते मी?? << महत्वाचं नव्हतं म्हणून..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एकच अनुभव दोनदा आला की (दोन बाफ काढलेत म्हणून... )![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नशीबवान आहात या tangent ची
नशीबवान आहात या tangent ची गरज नव्हती.
हे तुम्ही गंमतीनेच लिहीले आहे ना? कारण भारत असो, अमेरिका असो, एअरपोर्टसारख्या अत्यंत घाई गर्दीच्या ठिकाणी हरवलेली बॅग सापडणे म्हणजे नशीबच. तेव्हढेच लिहीले आहे. त्यात tangent वगैरे कुठे दिसले तुम्हाला?
झक्की, ऐकताय ना?
ऐकतोय्, वाचतोय.
नशीबवान आहात.
मलाहि भारतात खूप चांगले लोक भेटले, चांगले अनुभव आले. नेहेमी भारताबद्दल वाईटच का बोलायचे म्हणून मी एक धागाच सुरु केला - मला आलेले भारतातले चांगले अनुभव. अमेरिकेत काही चांगले आहे म्हंटले की भारतातल्या लोकांना राग येतो, म्हणून म्हंटले तुम्ही भारतातले चांगले लिहा, मी सुरुवात करून देतो.
कसले काय? अक्कल धावते घोड्यापुढे भारतीयांची! त्यांना त्यात tangent, sarcasm एव्हढेच दिसले! पण एकाहि हरीच्या लालाने काही चांगले लिहीले नाही!!
तुम्ही भारतात कायमचे जाताहात, तुम्हाला अजून खूप चांगले अनुभव येतील, चांगले लोक भेटतील. पण ओळखीच्या नातेवाईक नि मित्र मंडळींशी सुद्धा बोलताना, वागताना जपून. बर्याच जणांना वाईट अनुभव आलेले आहेत. आपण इकडे आल्यावर बहुधा ते बदलतात, पूर्वीसारखे रहात नाहीत. तेंव्हा ते लक्षात ठेवून थट्टा, मस्करी जपून. काही काही विचित्र लोक आहेत, तिथे.
माझीही एक बॅग यावेळेस आली
माझीही एक बॅग यावेळेस आली नव्हती.. ती रिपोर्ट करून फॉर्म भरून,पासपोर्टची फोटोकॉपी करेस्तोवर सगळा एअरपोर्ट ऑलमोस्ट रिकामा झाला.. आमचीच एक फ्लाईट आलेली तेव्हा.. त्यामुळे बाहेर बाबा प्रचंड काळजीत.. पण तेथील स्टाफने, कस्टम ऑफिसर्सनी चांगले सहकार्य केले (म्हणजे जसे वागायला पाहिजे तसेच वागले, खडुसपणा न करता..) व बॅगही २ दिवसांनी आली पुणे एअरपोर्टवर.. घरपोच नाही दिली त्यांनी काहीतरी नियम फेकला, पण व्यवस्थित आली हे महत्वाचे..
इन फॅक्ट अनलॉक्ड ठेवण्याचा
इन फॅक्ट अनलॉक्ड ठेवण्याचा नियम अजूनही असावा कारण हल्लीच नविन बॅग्ज घेतल्या तेव्हा बरोबर ती कुलूपं मिळाली, काय म्हणतात त्याला ते विसरले पण एअरपोर्ट वाले आणि एअरलाईन्स वाले ह्यांच्याकडे मास्टर की असते अशा कुलूपांची .. ह्याचा अर्थ एकतर अनलॉक्ड ठेवा किंवा अशीच कुलूपं लावा जी गरज पडल्यास designated लोकांनां उघडता येतील ..
(काहीतरी गडबड आहे. एक तर
(काहीतरी गडबड आहे. एक तर मायबोली अतिशय स्लो रिस्पॉन्स टाईम, नि सगळे डबल होतेय.)
महत्वाचं नव्हतं म्हणून.>> बरच
महत्वाचं नव्हतं म्हणून.>> बरच झालं मग गेलं ते. तेवढीच अडगळ गेली.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एकच अनुभव दोनदा आला की (दोन बाफ काढलेत म्हणून... )>>> इतका तो सुखद अनुभव कि दोनदा क्लिकलं.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
नेमस्तकांना पेशल धन्यवाद!
झक्की, पहिली पोस्ट चुकुन
झक्की, पहिली पोस्ट चुकुन पोस्ट झाली का?
माझंही मगाशी असंच झालं. मग लोकं लगेच बोलतात ' दोनदा एकच अनुभव आला का?' ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझीही बॅग २ वेळा राहीली आहे बस्के. एकदा ऑस्ट्रीयाला नी एकदा भारतात. ऑस्ट्रीयात त्यांनी घरपोच आणुन दिली पण भारतात एअरपोर्ट वर जावं लागलं. कस्टम्सचे नियम असतात मला वाटत काहीतरी. शिवाय प्रत्येक एअरलाइन्सचे पण नियम निरनिराळे असतात.
शिवाय असे बघा, ऑस्ट्रिया किती
शिवाय असे बघा, ऑस्ट्रिया किती लहान देश, लोकसंख्या किती कमी. अनेक दिवसातून कुणितरी एकदा बॅग विसरतात, मग एअरपोर्टवरच्या लोकांना तेव्हढाच चान्स, एअरपोर्टच्या गाडीतून भटकून यायचे. ज्यांची बॅग पोचवायची ते वर बीअर देतील ते वेगळेच.
भारत देश किती मोठा, लोकसंख्या किती. विसरभोळे अमेरिकन अडाणी तरी कित्ती येतात रोज! कुठे कुठे जाणार बॅगा पोचवायला? गंमत वाटली का एअरपोर्टवरून कुर्ल्याला, नि पनवेलला बॅग पोचवायला जाणे?
विसरभोळे अमेरिकन अडाणी तरी
विसरभोळे अमेरिकन अडाणी तरी कित्ती येतात रोज >>> ती बॅग विमानानेच आली नाही हो झक्की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी तुमच म्हणण अगदी १००% मान्य.
खरं तर हे कस्टम्सच्या
खरं तर हे कस्टम्सच्या नियमामुळे होतं..
इथे अमेरिकेत कस्टम्सवाले तसे ढिले असतात त्यामुळे Airline चे Contractor घरी आणून बॅग देतात .मला तर बॅग आणि बॅट आणून दिलेली. एक माणूस आणि एक कुत्रा बॅग/बॅट घेऊन घरी आले वर तो म्हणतो (माणूस), 'What a wierd Paddle'
भारतात कस्टम्सचे नियम जास्त पाळले जातात म्हणून बॅगा घरी आणून देत नाहीत...
मग लोकं लगेच बोलतात <<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
दिनेश मध्यंतरी अमेरिकेत तरी
दिनेश मध्यंतरी अमेरिकेत तरी चेक-इन बॅगा लॉक करू नयेत असे सांगत >> TSA locks वापरली तर हरकत नसते लॉक करायला. उघडलीच तर आत एक पत्र घालून परत लॉक केलेली असते.
अमृता, छान अनुभव. ए, लिही न
अमृता, छान अनुभव.
ए, लिही न सकाळमध्ये. मजा येईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रतिक्रीयांना घाबरू नकोस, अशाच असतील.
१. अरे वा! तुम्ही अमेरिकेत असता का?
२. एवढे कसे हो तुम्ही धांदरट? सामान तपासून घ्यायला नको का?
३. लगेच दुसर्यांवर आळ? तुमच्या अमेरिकेत हेच असत का?
४. अमेरिकेत परत देत नाहीत वाटतं सामान दुसर्यांच?
५. कहिही लिहायच.
६. फालतू आर्टिकल.
७. अच्छा! तुमच्याकडे व्हिडिओ कॅम आहे वगैरे सांगायच आहे का? इथेहि असतात हल्ली सगळ्यांकडे.
Pages