झटपट संत्रा केक

Submitted by मनःस्विनी on 27 August, 2010 - 22:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

हा अगदी नो कटकट केक आहे. दुसरे म्हणजे अंडे टाकून वा न टाकता सुद्धा होवु शकतो पण मग दही प्रमाण ज्यास्त घ्यावे.

सामानः
दिड कप गव्हाचे पीठ्(आजकाल मी आशिर्वाद चे आणते चांगलेय),
१ अक्खे naval orange( हि गोड असतात, साली विशेष कडवट नसते),
१ संत्र्याचा ताजा जूस् (रस काढण्याआधी साल मस्त ग्रेट करून घ्या),
१ अक्खे अंडे,
१ मस्त फेटून हलके झालेले egg white शेवटी शेवटी फोल्ड करून घालायचे.
पाव कपाच्या जराशीच वर Organic agave nectar/अर्धा कप ब्रॉउन साखर्/अर्धा कप रोजची साखर.(मला गोड कमी लागते. पण हे प्रमाण अगदीच अगोड नाही करत. :))
पाव कपच्या जरासेच वर कनोला तेल,
मीठ चवीप्रमाणे,
१ लहान चमचा बेकींगपॉवडर + अर्धा चमचा बेकिंगसोडा,
२ मध्यम आकारच्या चमचे घट्ट दही,
पंपकीन स्पाईस १ चमचा.

क्रमवार पाककृती: 

कृती:
अंडे टाकूनः
अवन आधी ३५० डिग्री वर तापायला ठेवा १५ मिनीटे तरी तापला पाहिजे.
१)सर्वात आधी पीठात स्पाईस, बेपॉ व बेसो घालून मिक्सीत फिरवून घ्या नाहीतर चाळून घ्या.
२)एक अक्खे संत्रे सालीसकट कापून, त्याच्या बिया काढून मिक्सीच्या भांड्यात टाका. प्युरी करून झाली की मग संत्रा रस टाकून प्युरी करून घ्या. रस काढण्याआधी साल किस्सोन घ्या. किसलेली साल बाजूला ठेवा.
३) मग १ आक्खे अंडे + वॅनिला + तेल + साखर्/अगेव मिश्रीत दही टाका. मिक्सी फिरवा.
४)मग हळू हळू पीठ टाकत जा. मग सगळ्यात शेवटी egg white fold करा. मग त्यात बेरीज,किसलेली साल व ऑक्रोड (हवेच असेल्यास)टाका.
६) केक पॅनला तेल व पीठ लावून मग वरचे मिश्रण ओता. वरून फॉइल लावून अवन मध्ये टाका.
नोटः हा केक ५० मिनीटे भाजा. बरोबर ३० मिनीटाने अवनचे टेंपरेचर ३०० वर आणा. मग अलगद स्वःताला न भाजून घेता केक पॅनची फॉइल काढा. केक मात्र अवनच्या आतच ठेवा आणखी २० मिनीटे. Happy

अंड्याशिवायः
वरच्या स्टेप ३) व ४) मधील अंडी वगळून बाकी सर्व सेम.
इतका मस्त वास येतो संत्र्याचा की कधी खातो असे होते.
( अंडे अजीबात घालत नसाल तर दही चार मोठे चमचे व तेल अर्धा कप असे घ्या.)

अधिक टिपा: 

संत्र्याचा ज्युस ताजाच घाला.
बाहेरील ज्युस मध्ये प्रीसर्वेटीव असतात ते अवन मध्ये कडवट होतात हाय टेंप वर.
मिश्रण एकदम वर पर्यंत भरू नका. केक फुगतो व फॉइलला चिकटेल. फॉइलला आतील बाजूस जरासे तेल लावून जस्ट वर ठेवून द्या. काढायला बरे पडते.

बेकिंग सोडा टाकायचा नसेल तर बेकींग पॉवडर टोटल दिड चमचा टाका.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद, हो चुकीचे होते ते. Happy

हा केक आजच (८/२७/१०) केला मी. अंड्याशिवाय केला आहे पहिल्यांदा. उलट हा मला स्वःताला ज्यास्त आवडला. आले मनात , पटपट काढले सामान तेल, दही,संत्री,रस काढला हातानेच,पीठ.. झाला.

sk3.jpgsk2.jpgsk1_0.jpg

मस्त रेसिपी. भारतात न मिळणा-या वस्तु...

१. अक्खे naval orange - इथले संत्र अख्खे टाकता येईल असे वाटत नाही. त्यामुळे एका संत्र्याऐवजी दोन संत्र्यांचा रस घ्यावा काय??

२. पंपकीन स्पाईस??? ह्याजागी काय वापरावे??

३. इथे कनोला तेल मिळेल कदाचित. पण त्याजागी शेंगदाण्याचा पर्याय वापरुन बघेन असे म्हणतेय Happy

गव्हाचे पिठ वापरुन रेसिपी माझ्या विशेष आवडीची.. मैद्याचे पदार्थ खाताना मनात उगाचच चुक करतोय असे वाटत राहते. मन भरुन खाता येत नाही...

साधना, भारतात कुठले गोड संत्रे मिळते बघ थंडीत छोटी छोटी येतात, ती चालतील.
तू १ कपभर रस घे मग नी दोन छोटी संत्री सालीसकट घे वाटून. साल बघ कडवट नाही ना.
इथले नवल ऑरेंज खूप गोड लागते व रसाळ असते.
शेंगदाणा जरा उग्र लागेल , मी नाही वापरले पण दुसरे येते ते वापर नाव विसरले मी वेजी ऑईल.
पंपकीन स्पाईस = वेलची, दालचीनी, आले पूड.

आताच अंड्याशिवाय केला मी. फोटो टाकते. खरेतर आता असे वाटले की अंड्याशिवायच मस्त लागतो व कमी कॅलरीज.

छान आहे हा प्रकार.
भारतात नाहीच मिळणार इतकी गोड संत्री. हल्ली भडक केशरी रंगाची जी मिळायला लागलीत, ती कधी कधी गोड असतात. पण ती अख्खी वापरायची असतील, तर तिचे पांढरे साल पूर्णपणे काढावे लागेल. (तयार मार्मलेड पण वापरता येईल, साखर मग कमी करावी लागेल)

मी नेवल संत्रे म्हणुन सर्च केला.. इथे मिळतात तशी अगदी छोटी संत्री आणि आतल्या संत्र्याच्या टोकाला अजुन एक छोटासा गुच्छ असे स्वरुप दिसले. थोडीफार अशी दिसणारी संत्री मिळतात इथे डिसेंबरात. लक्ष ठेऊन राहायला पाहिजे... Happy

हल्ली भडक केशरी रंगाची जी मिळायला लागलीत
ती संत्री मी कधीच घेतली नाहीत. ती मला संत्री वाटतच नाहीत. असली संत्री, अमेरिकन सफरचंदे, चायनीज कलिंगडे इ.इ. गोष्टी मी टाळते. घेताना तिनतिनदा विचारले, नक्की भारतीयच आहेत ना फळे म्हणुन.. Happy

साधना, दिनेश ह्यांची आयडीया मस्त आहे मार्म्लेड वापरायची. पण मग साखर कमी घाल. व दही अ‍ॅडजस्ट कर. बघ ट्राय करून डिसेंबर पर्यंत थांबण्यापेक्षा.