Submitted by देवा on 18 December, 2007 - 01:03
हाय हॅल्लो करण्यासाठी जमतिल सारे
आणि खोटे हसण्यासाठी जमतिल सारे
जर उद्याला रस्त्यावर का मेला कोणी
कोण मेला बघण्यासाठी जमतिल सारे
हाल कोणी पुसण्यासाठी आले नाही
भाळ ओले पुसण्यासाठी जमतिल सारे
जे शहाणे वेड्यांच्या या दुनियेमध्ये
तेच वेडे ठरण्यासाठी जमतिल सारे
कारण तसे उरले नाही भेटायाचे
फक्त आता जमण्यासाठी जमतिल सारे
गुलमोहर:
शेअर करा
छान
देवा चांगला प्रयत्न...
मतला आणि 'हाल' आवडले
शंका : जमतिल का जमतील...
अजून एक शंका ...
जे शहाणे वेड्यांच्या या दुनियेमध्ये
तेच वेडे ठरण्यासाठी जमतिल सारे
>>> ह्या मध्ये थोडी गडबड वाटतेय... तेच आलेय म्हणल्यावर सारे हे repetation वाटते आहे... किंवा त्यांना वेडे थरविण्यासाठी असे काही पाहिजे होते का? (अर्थात वृत्त सांभाळून तश्या अर्थाचे काही)
चु.भू. द्या. घ्या.
....
http://milindchhatre.blogspot.com
देवा, छान
देवा, छान आहे रे
धन्यवाद
मिल्या, पल्लवि धन्यवाद
मिल्या मला जमतिल असंच वाटतय.
आणि वेड्यांबाबत..:)
मला दुसरा उला मिसरा सुचला होता तो असा
जे शहाणे वेड्यांच्या या दुनियेमध्ये
त्यांस वेडे छळण्यासाठी जमतिल सारे
सु॑दर आहे.
सु॑दर आहे. मस्त.
:)
काय देवा, gtg बद्दल होते का सारे

गझल छान आहे.
जमतील बरोबर आहे
मिल्या, जमतील बरोबर आहे.
I will make the appropriate changes & post the gazal again.