दोन विरुद्ध गोष्टी अनेकविध स्वरुपात आपल्यासमोर येतात. कधी त्या एकमेकांबरोबर खुलून दिसतात, एकमेकांचे सौंदर्य वाढवतात. कधी हूरहूर लावून जातात, कधी निराशेतून आशा दाखवतात, एक नवा दृष्टीकोन देतात. केवढी ही लोभस रुपं!!!
दोन विरुद्ध गोष्टींची ही जुगलबंदी टिपायला एक कॅमेरा आणि टिपणारी नजर असेल तर मग क्या बात हैं!!! चला तर मंडळी, या अदाकारी 'काँट्रास्ट' ला कॅमेर्यात पकडायचा प्रयत्न करुया.
प्रकाशचित्रे स्पर्धा क्र. १ : विरुद्ध
*****************************************************
स्पर्धेचे नियम :
१. एका आयडीतर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
२.एका छायाचित्रामध्येच दोन विरुद्ध गोष्टी टिपलेल्या असल्या पाहिजेत. अर्थातच या एकाच छायाचित्रामध्ये परस्पर विरोधी गोष्टी दर्शित झाल्या पाहिजे. दोन छायाचित्रे असलेली प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही. उदा. एकाच छायाचित्रात समुद्रकिनार्यावरचा कँपफायर असे दृश्य टिपलेले छायाचित्र स्पर्धेस पात्र आहे.
३. छायाचित्र स्वत:च काढलेले असावे.
४. स्पर्धेसाठी पाठवलेले छायाचित्र या आधी मायबोलीवर किंवा इतरत्र प्रकाशित झालेले नसावे.
५. कॅमेर्याच्या सेटींगचे तपशील (शक्य असल्यास) देणे अपेक्षित आहे, मात्र बंधनकारक नाही.
६. पिकासा, फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडीटींग सॉफ्टवेअर वापरण्यास परवानगी आहे. छायाचित्रात असे काही बदल केले असल्यास ते नमूद करावे.
६ अ. वर नमूद एडीटींग सॉफ्टवेअरच्या साहाय्याने दोन किंवा अधिक फोटो जोडलेले चालणार नाहीत. अशी छायाचित्रे स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाहीत ह्याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
७. फाईलचे आकारमान २०० kb पेक्षा जास्त नसावे व छायाचित्राची मोठी बाजू (लांबी/रुंदी) ७५० पिक्सेल इतकी असावी.
८. छायाचित्रांवर स्वतःच्या नावाचा किंवा वेबसाइटचा लोगो न टाकता मायबोली गणेशोत्सव २०१० असा लोगो टाकावा.
९. स्पर्धेचा अंतिम निकाल परीक्षकांच्या मताने ठरवण्यात येईल. तो स्वीकारणे सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
प्रवेशिका कशा पाठवाल?
१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ-मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इ-मेल पाठवताना photography spardha : Viruddha असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र विनंती : स्पेलिंगमधल्या चुका टाळण्यासाठी इथूनच कॉपी-पेस्ट करावे.)
३. संयोजकांना इ-मेल पाठवताना, छायाचित्राच्या फाईलचे आकारमान हे २०० kb पेक्षा जास्त नसावे. छायाचित्राची मोठी बाजू (लांबी/रूंदी) जास्तीत जास्त ७५० पिक्सेल अशी हवी.
४. स्पर्धेसाठी छायाचित्र पाठवताना इ-मेल मधे छायाचित्राची प्रत जोडावी. त्याच बरोबर मायबोली आयडी लिहावा आणि या विषयाला अनुसरून प्रकाशचित्रात काय विरोधाभास आहे ते एका ओळीत लिहावे.
५. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर ती प्रवेशिका स्पर्धेच्या धाग्यावर प्रकाशित होण्यास २४ तासाची मुदत द्यावी. २४ तासानंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.
प्रवेशिका स्वीकारण्यास गणेश चतुर्थीला सुरूवात होईल व अनंत चतुर्दशीपर्यंत स्वीकारल्या जातील.
या विषयासंदर्भात कोणाला काही
या विषयासंदर्भात कोणाला काही शंका असतील तर संयोजकांना इथेच नक्की विचारा.
धन्यवाद संयोजक, एक छान आणि
धन्यवाद संयोजक, एक छान आणि वेगळा विषय
माबो फोटोग्राफर चला लागा कामाला
मस्तच विषय
मस्तच विषय
खूपच मस्त विषय संयोजक !
खूपच मस्त विषय संयोजक !
छान विषय.
छान विषय.
अरे व्वा.. इंटरेस्टिंग आहे..
अरे व्वा.. इंटरेस्टिंग आहे.. विरोधाभास शोधायला हवा आता..
वा..छान विषय..
वा..छान विषय..
छान विषय.
छान विषय.
विरोधाभास सुचल्यावर , थोडीशी
विरोधाभास सुचल्यावर , थोडीशी मेहनत घेऊन फोटो काढल्यास चालेल का, कि प्रकाशचित्र अवचित काढलेलच असावं ?
सूर्यकिरण, विरोधाभास
सूर्यकिरण,
विरोधाभास सुचल्यावर , थोडीशी मेहनत घेऊन फोटो काढल्यास चालेल का >>> हो चालेल.
कि प्रकाशचित्र अवचित काढलेलच असावं ?>> असा कोणताही नियम नाही.
फक्त छायाचित्र या आधी मायबोलीवर किंवा इतरत्र प्रकाशित झालेले नसावे हा नियम काटेकोरपणे पाळण्यात यावा अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद
धन्यवाद, संयोजक. आता
धन्यवाद, संयोजक. आता स्वतःकडूनच अपेक्षा वाढल्यात
प्रवेशिका स्विकारण्यास गणेश
प्रवेशिका स्विकारण्यास गणेश चतुर्थीपासून (११ सप्टेंबर) सुरुवात होईल व प्रवेशिका अनंत चतुर्दशीपर्यंत (२२ सप्टेंबर) स्वीकारल्या जातील. दिलेल्या तारखेआधी व तारखेनंतर कोणतीही प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही. कृपया नोंद घ्यावी.
वेगळा विषय आहे. आवडला!
वेगळा विषय आहे. आवडला!
छान विषय आहे. वेगला हि आहे...
छान विषय आहे. वेगला हि आहे... मस्तच...
प्रवेशिका पाठवली आहे.
प्रवेशिका पाठवली आहे.
सिंडरेला, तुमची प्रवेशिका इथे
सिंडरेला, तुमची प्रवेशिका इथे प्रकाशित केली आहे.
धन्यवाद.
प्रवेशिका पाठवली.
प्रवेशिका पाठवली.
मृण्मयी , तुमची प्रवेशिका इथे
मृण्मयी , तुमची प्रवेशिका इथे प्रकाशित केली आहे.
धन्यवाद.
फोटो बरोबर जे वर्णन लिहायचं
फोटो बरोबर जे वर्णन लिहायचं असेल ते ई-मेल मधे कसं द्यायचं?
मामी, तुम्ही इथेच म्हणजे
मामी, तुम्ही इथेच म्हणजे मायबोलीवर टाईप करून ते कट-पेस्ट करून, फोटो पाठवताना तिथे हा मजकूर टाकू शकता. संयोजक तुमची प्रवेशिका टाकताना छायाचित्र व मजकूर टाकतील.
धन्यवाद.
धन्यवाद.
एकाच धाग्यावर प्रवेशिका
एकाच धाग्यावर प्रवेशिका दिल्याने नवी प्रवेशिका आली की पान वर येत नाहीये. अशाने शेवटी शेवटी ट्रॅक रहाणार नाही.
>>की पान वर येत नाहीये. पान
>>की पान वर येत नाहीये.
पान वर आणण्यासाठी १ नवी कमेंट टाकता येईल
.
.
गणेशोत्सव २०१० अंतर्गत
गणेशोत्सव २०१० अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आभारी आहोत.