पनीर कॅप्सिकम

Submitted by सायो on 20 August, 2010 - 09:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पनीर- बोटासारखे लांब तुकडे करुन, भोपळी मिरची- बोटासारखे लांब तुकडे करुन, टोमॅटो- बारीक चिरुन साधारण पाव वाटी, आलं-लसूण पेस्ट- एक ते दिड टीस्पून, धणे- एक ते दिड टे. स्पून, लाल मिरच्या-अंदाजे, कसूरी मेथी- १ टे. स्पून, मीठ-चवीप्रमाणे, कोथिंबीर.
पनीर आणि भोपळी मिरची समप्रमाणात असावी.

क्रमवार पाककृती: 

तेलावर उभी चिरलेली भोपळी मिरची परतून झाकण घालून शिजवावी. जरा मऊ वाटली की आलं-लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून पुन्हा एक वाफ काढावी. धणे-लाल सुक्या मिरच्या आणि कसूरी मेथी मिक्सरला वाटून पावडर किंवा पाणी घालून पेस्ट करावी. ती ही भाजीत घालावी. सगळ्यात शेवटी पनीरचे तुकडे आणि मीठ घालून शिजवावं. भाजीला खूप रस रहाता कामा नये. वरुन कोथिंबीर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
माणसांप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं.
अधिक टिपा: 

हव्या असल्यास लाल, केशरी, पिवळी भो.मिरची वापरायलाही हरकत नाही.
पुन्हा करेन तेव्हा आठवणीने फोटो काढून टाकेन. दुसर्‍या कुणी टाकल्यास माझा इगो हर्ट होणार नाही Proud

माहितीचा स्रोत: 
आठवत नाही.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यम्मी Happy

मी टॉमॅटो पेस्ट्/प्युरी घालते आणि लाल मिरच्यांच्या ऐवजी थोडा गरम मसाला/पावभाजी मसाला... Happy

फोटो टाकत जावा गो बाय्कांनो. आम्हाला कसं कळणार कसं दिसतं ते?? Sad
पन एकंदर झ्याक असावं.

आडो, तुच टाक बघ फोटो शहाण्या आडोसारखी.. (तोफु टाकुन... )

सायो, झकास पाकृ! नेहमीचे मसाले नाहीत. त्यामुळे जास्तच आवडली. करून बघेन.

(पनीर नसलं तर चिकनचे तुकडे/बटाटे चालतात का? :P)

पनीर ऐवजी बटाटे?>>> मी घालते ग बरेचदा. उभ्या फ्राईज साठी करतो तश्या काचर्‍या करून घालते.
यम्मी लागते. Happy
स्वाती, माझ्या लेकाला ब्रेड मध्ये घालुन देते मी ही भाजी. त्याला भारी आवडतो हा प्रकार.
सायो पुन्हा एकदा धन्यवाद. आमच्याकडे सगळ्यांची लई आवडती भाजी.

मी बरेचदा केलीय सायोची हिच क्रुती वापरुन,एकदम यम्मी आणि सोपी पण.
आडो,मी तोफू वापरुनपण केलीय.मस्त होते.

मस्त.
सायोची पनीरमाखनी हिट्ट आहे आमच्याकडे. आता ही करून बघेन.

माझ्याकडे पनीर बनवायचा डबा आहे. पुर्वी कोथंबीरीचे डबे मिळायचे जाळीचे तसा डबा आणि त्याचे लूझ झाकण आहे. दूध फाडल्यावर डब्यात ओतून, झाकणावर वजन ठेवायचे. सकाळपर्यंत पनीर तयार. Happy