Submitted by एम.कर्णिक on 17 August, 2010 - 09:04
बाबा तुम्मी रोजच का हो उशीरानी येता ?
सकाळी मी उठण्याआधी निघून पण जाता ?
आई मण्ते नोकरीसाठी जावं लागतं असं
सांगा पण मग माझ्याशी खेळाल तुम्मी कसं?
साएब मणुन कोणी मणे नोकरीमद्धे असतात
उशीरानी येणार्यांचा पगार पण ते कापतात
आई घेते अॅपल कापून खायला तस का?
आणि कापलेला पगार पण तेच खातात का ?
साय्बांना नस्तात का कोणी बनू आणि बंटी?
विरघळवून टाकेल त्याना अशी ज्यांची मिठी?
अस्ले कस्ले साएब अस्तात तुम्च्या कामावर?
काढून टाका बघु त्याना उद्या गेल्यावर !
बाबा सांगू का हो माझं सिक्रेट तुम्माला ?
फोडू नका बरं का ते ताई नि आईला
तुम्मी जाताना सकाळी जागा अस्तो मी
झोपेचं सोंग मुद्दामून घेउन र्हातो मी
हळुच घेता पप्पी तुम्मी डोळ्यांची गालांची
आवडते ती म्हणून करतो असली चालाखी
गुलमोहर:
शेअर करा
छान
छान
आई घेते अॅपल कापून खायला तस
आई घेते अॅपल कापून खायला तस का?
आणि कापलेला पगार पण तेच खातात का ?>>>
ते खातात कि नाही, माहीत नाही रे बाळा...
पण कापतात हं अॅपलसारखं...!
छान आहे कविता! शेवटची
छान आहे कविता! शेवटची साखरपेरणी तर फारच निरागस व गोड!
गोड आहे कविता
गोड आहे कविता
मस्तच. अॅपल कापतात तस. सहीच
मस्तच.
अॅपल कापतात तस. सहीच कल्पना.
शेवट छान
मुकुंददा,
मुकुंददा,
मस्तच...
मस्तच...
नेहमीप्रमाणेच मस्त शेवट
नेहमीप्रमाणेच मस्त
शेवट अप्रतिम
(No subject)
(No subject)
फार सुंदर.
फार सुंदर.
तुम्मी जाताना सकाळी जागा
तुम्मी जाताना सकाळी जागा अस्तो मी
झोपेचं सोंग मुद्दामून घेउन र्हातो मी
हळुच घेता पप्पी तुम्मी डोळ्यांची गालांची
आवडते ती म्हणून करतो असली चालाखी
---- आवडले... मी स्वत: रोज अनुभवतो...
सुरेख.. अस्ले कस्ले साएब
सुरेख..
अस्ले कस्ले साएब अस्तात तुम्च्या कामावर?
काढून टाका बघु त्याना उद्या गेल्यावर !>>
विषेश आवडलं..
सही जमलं आहे गीत
वाह्,खूप छान..
वाह्,खूप छान..