पौष्टिक पोहे

Submitted by तृप्ती आवटी on 20 October, 2008 - 15:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी पोहे, १ वाटी भिजवलेली हरबरा डाळ, २ वाट्या मक्याचे दाणे, अर्धी वाटी भरड दाण्याचा कुट (दाणे स्वच्छ सोलुन घ्यावेत), अर्धा मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरुन, अर्ध्या लिंबाचा रस, कडीलिंबाची ४-५ पाने, ४ हिरव्या मिरच्यांचे एक सेंमीचे तुकडे, फोडणीसाठी मोहोरी, हळद, हिंग, १ डाव तेल.

क्रमवार पाककृती: 

मक्याचे दाणे व हरबरा डाळ मिक्सरमधे वाटुन घ्यावी. पोहे भिजवुन घ्यावेत. मग पोह्याला करतो तशी हिंग-हळद-मोहोरी-कडीलिंब-हिरवी मिरची फोडणी करुन त्यात दाणे व कांदा परतुन घ्यावा. पोहे, डाळ व मका सर्व एकदमच घालावे व चांगले हलवुन घ्यावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. झाकण घालुन चांगली वाफ येऊ द्यावी. लिंबाचा रस घालुन परत एकदा चांगले हलवुन घ्यावे. हे झाले पोहे तयार. वरुन सढळ हाताने नारळ व कोथींबीर पेरावी.

वाढणी/प्रमाण: 
तीन मोठे
अधिक टिपा: 

भारतात मिरची कटर मिळते (इथे दिसले नाही कुठे) त्यात मिरच्या बारीक करुन घातल्या तर जास्त छान लागते. लिंबाऐवजी कच्ची कैरी किसुन घातली तरी चालते.

माहितीचा स्रोत: 
आई + मी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडे, रेसिपी मस्तच वाटतेय. पण ह्याचा गोळा होऊ नये म्हणून काय करायचं?
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

पोहे आणि कांदा त्यासाठीच आहेत. वाफ आली की छान सगळे मोकळे होते. मी फ्रोझन मक्याचे दाणे घेतले. ताजा मका किसुन घेतला तर दुधच इतके निघते आणि त्याचा गोळा होतो. आई मात्र ताजी मक्याची कणसेच घेते.

सिंड्रेला,
हीच रेसिपी तीनही पदार्थांची -पोहे, मक्याचे दाणे आणि वाटलेली डाळ याची वेगवेगळी केली आहे.
एकत्र करण्याची कल्पना मस्तच आहे. नक्की करून बघेन.

आज-काल माझा मुलगा पण खातो घास दोन घास माझ्याबरोबर. त्याला नुसती ह डाळ पचेल की नाही असे वाटले म्हणुन सर्व एकत्र केले. तसे मला वाटली डाळ फार आवडते.

ह्या कृतीची लिंक "पौष्टिक पोहे बदलून" अशी का दिसते आहे ? मी तर काहीच बदल नाही केला Uhoh

हम्म्म्म्म, माझ्याही 'चिंचभात' ची लिंक 'बदलून' अशी दिसते आहे आणि मी त्यात काहीही बदल केलेला नाही. Uhoh
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी

मी हे पोहे ताज्या मक्याच्या दाण्याचे केले..एकदम खास...भरपुर खाल्ले..मस्त रेसिपी आहे तृप्ती!!

मस्तच वाटतायत वेगळ्या प्रकारचे पोहे. जर मी कॅन्ड मका घेतला तर चालेल?पुढच्या वेळी केलेस हे पोहे की फोटोही काढच.
BTW ही रेसिपी आधी कुठे टाकली होतीस का? वाचल्यासारखी वाटतेय
.

छान रेसीपी. करून बघायला हवी.

हे पोस्ट कधी आले Uhoh धन्यवाद धन्यवाद Happy आधी कुठे नव्हती टाकली ही कृती. कॅन्ड मका मी कधी वापरला नाही. तुच कर आणि सांग Wink

Back to top