१५- ऑगस्ट ईन अमेरिका आणी भारतीय नकाशा ...

Submitted by आवळा on 16 August, 2010 - 11:31

आमच्या ईथे अमेरिकेत (Bloomington - IL).. काल १५ ऑगस्ट .. भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला..
नेहमी प्रमाणे छोट्या मुलांची नाच गाणी वगैरे प्रकार झाले..

आमच्या लोकेशन ला हा ईव्हेंट दरवर्षी साजरा केला जातो..
ह्या वेळेस एक तेलगू - वंदे मातरम गाणे चालु होणार होते.. त्या साठी भारताचा नकाशा लावण्यात आला..
आणी लाजिरवाणी बाब म्हणजे .. त्या नकाशा मधे पाकव्याप्त काश्मिर चा भाग वगळला होता.. आणी चीन जो प्रदेश अनधिक्रूत पणे बळकावला आहे तो पण वगळला...
आणी आता लिहित असताना पण खुप वाईट वाटते हे सर्व ईथल्या भारतीय लोकांनी केले..

त्यामागची कारणे कितीपण असतील

१ अमेरिकेतील लोक भारताचा हाच नकाशा आहे असे मानतात.. आणी ह्य ऑर्गनासींग कमीटी ला त्यांना दाखवायचे असते की आम्ही असले ईव्हेंट करुन अमेरिका आणी भारत ह्यांच्यातील नाते मजबुत करत आहोत Uhoh

२ ह्या कमीटीतील लोकांनी पुर्णपणे निर्लज्ज होऊन हार पत्कारली तर आहेच आहे .. आणी त्या वरुन त्याचा असा गवा करायचा की पुढच्या पिढीला पण विसरुन जावे लागेल की भारताची अशी पण जागा बळकावली होती.. ईथली भारतीय मुले .. तो कापलेला नकाशा म्हनजेच भारताचा असेच म्हणनार...
आणी ह्यांना पण तेच हवे असेल..

जर आपले लोकच आप्ल्या देशाचा मान ठेवत नसतील तर दुसर्या देशांतील व्यक्तींकडुन काय अपेक्षा करणार..

मला ही गोष्ट फारच दु:ख दायक वाटली.... रहावले नाही म्हणून ईव्हेंट ऑर्गनायजर ला जाऊन भेटलो..
आणी विचारले.. "हा कोणत्या देशाचा नकाशा आहे"
त्यावर एक निर्लज्ज ऊत्तर "भारत"
त्यावर माझा परत प्रश्न " आर यु शुअर??"
त्याची मान शरमेने का होईना थोड्या वेळासाठी खाली गेली असावी..
आणी माझ्या त्या प्रश्नाला ऊत्तर... "वहा पडदे पे रिंकल्स आये है.. तो मॅप ठीक से नही दिख रहा"

ह्या त्याच्या ऊत्तराला आता काही प्रतिसाद देणे जरुरीच नाही वाटले आणी अर्ध्या कार्यक्रमातुन
निघुण आलो..
कार्यक्रमाला १५०+ भारतीय लोक होती.. एकानी सुध्दा त्या नकाशावर आक्षेप घेतला नाही...
का???????
ह्या प्रश्नाचे ऊत्तर मी तरी नाही लिहु शकत ..... Sad

गुलमोहर: 

इथे मागच्या वेळी राष्ट्रगीत च चुकवले. लक्षात आणुन दिले तर अजुन राग गेला नाहीये त्यांचा.... Sad

यंदा जाणे झाले नाही. काय केले महित नाही.

किशोर .. आत्ताच अजून एका ब्लोगवर अमेरिकेमधील स्वातंत्र दिन सोह्ण्याबद्दल वाचले. आपण आपल्या देशाचा नकाशा, राष्ट्रगीत आणि झेंडा याचा उचित सन्मान राखतो आहोत की नाही हे आपण बघायलाच हवे. तुम्ही योग्यच केलेत. 'ते दोन्ही' भाग वगळणे म्हणजे आपल्या सैनिकांची अवहेलना आहे... Sad

आणि ज्या पद्धतीने सरकार काश्मिर प्रश्न हाताळत आहे त्यामुळे तर काही दिवसात सगळाच काश्मिर गायब होइल नकाशातून Sad Sad Sad

मला नाही तसे वाटत... सध्या उत्तर-पूर्वी राज्यांमध्ये अधिक बिकट परिस्थिती आहे.. तिकडे आपले अजून लक्ष्याच नाही आहे... पुढची ५० वर्षे आपण चीन बरोबर लढण्यात घालावणार आहोत...

बर्‍याचवेळा तिरंगाहि ऊलटा लावतात तोहि कुणाला कळत नाहि . नकाशाचि गोष्ट तर दुरच. देशाभिमान मनात जागवण्याकरता खुप काहि करण्याचि खरोखरच आवश्यकता आहे.

तसे एकदा झाले होते. एक तासभर बिचारा तिरंगा उलटाच होता. कुणितरी जाणीव करून दिल्यावर सुलटा झाला. खुलासा असा की इथल्या उत्साही मुलांनी केले हो, त्यांना नक्की माहित नव्हते!

थोडक्यात उत्साह महत्वाचा की ...

मला वाटते की झेंडा, नकाशा लावायचा असेल, राष्ट्रगीत किंवा वंदे मातरम जरी म्हणायचे असेल तर, त्यासाठी कुणितरी जबाबदार, माहितगार व्यक्तीने त्यात लक्ष घातले पाहिजे. अश्या चुका करता तेंव्हा तुम्ही एका स्वतंत्र देशाचा अपमान करता, हे लक्षात ठेवा.

इकडेपण खुप तमाशा केला. सांगायला गेलं तर आम्ची BAD TASTE Sad
या लोकांना कळत नाही का कि ध्वज संहिता हा काहीतरी प्रकार आहे. परदेशात असा काही प्रकार होत असेल तर तक्रार करायला काही जागा आहे का? तक्रार केल्यानंतर काही उपयोग होत्तो का?