सप्त फुले

Submitted by jyo_patil25 on 19 October, 2008 - 00:52

पिवळे पिवळे सूर्यफूल
सूर्याला नमस्कार करी
शुभ्र शुभ्र पारिजातक
अंगणी चांदण्या पसरी
गेडेंदार गेडेंदार झेंडू
बांधितो तोरण दारी
इवली इवली जाईजुई
घालिते मंडप दारी
टपोरे टपोरे गुलाब
सार्‍यांचे स्वागत करी
लाल लाल जास्वंदी
असते गणेशा समोरी
बहरली बहरली रातराणी
गंध आसमंतात भरी

गुलमोहर: 

ज्योत्स्ना आवडली कवीता.

सुरेख कविता Happy
एकदम सगळ्या फुलांचा सुवास दरवळायला लागला.
~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

खुपच सुंदर.