चंप्याची वेबसाईट

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

http://www.esakal.com/esakal/20100807/5056541499969512610.htm

ग्रामीण भागातील युवकांसाठी 'संकेतस्थळा' ची निर्मिती
सकाळ वृत्तसेवा
Saturday, August 07, 2010 AT 09:11 AM (IST)
Tags: kardakwadi website, hiware bazar, maharashtra
पुणे - महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील युवकांच्या सहकार्यासाठी ९ ऑगस्ट रोजी असलेल्या 'क्रांती दिना'च्या मुहूर्तावर श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्र, या उपक्रमाच्या www.kardakwadi.org या संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात येणार आहे. श्री. पोपटराव पवार ह्यांचे हस्ते आदर्श गांव हिवरे बाजार येथे या संकेतस्थळाचे उदघाटन होणार आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि युवक- युवतींना उच्च-शिक्षण, शेती, आरोग्य, क्रीडा, सामाजिक आणि राजकीय विषयांवर सहकार्य करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. ऑस्ट्रेलियातील बिझकॅट प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम राबविला जात आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांच्या वास्तव्य असलेल्या नेवासा तालुक्यामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर, वाचण संस्कृतीचा विकास याद्वारे ग्रामविकासाची संकल्पना मनात ठेऊन 'करडकवाडी- वैश्विक खेडे उपक्रम' राबविला जात आहे.

या उदघाटन प्रसंगी 'बाळकृष्ण ज्ञान केंद्रा' चे अ‍ॅड. अशोक करडक, श्री. सुभाष डिके, श्री. दिपक चौधरी, श्री. भारत भवार, श्री. संतोष मंजुळे, श्री. अनिल मारकळी आणि मुकिंदपुर (करडकवाडी) ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, श्री. गणेश माटे, श्री. मदन कराडे, श्री. विजय गाढे, श्री. राजु काळे, श्री. पटेल, श्री. घोलप व इतर ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागातील युवकांसाठी ज्ञान केंद्राने अनेक उद्दिष्टे समोर ठेवली आहेत. त्यापैकी प्रगत राष्ट्रांमधील नागरिकांच्या राहणीमानाच्या दर्जाप्रमाणेच, ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे आणि 'मानवी विकास निर्देशांक' या संकल्पनेची ओळख सर्वसामान्यांना करून देणे. सामान्य नागरिकाचे दैनंदिन जगणे सुसह्य व्हावे यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न करणे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीमध्ये मदत करणे. शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थी ज्या क्षेत्रांत मागे पडतात, ती क्षेत्रे लक्षात घेऊन त्या उणिवा दूर करण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना साहाय्य करणे. तरुणांना उच्चशिक्षणासंबंधी संधींची, रोजगाराच्या अन्‌ स्वयंरोजगाराच्या संधींबद्दल माहिती पुरवणे. शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, क्रीडा, आरोग्य, सामाजिक अन्‌ राजकीय क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे प्रबोधन करणे आणि सामान्य नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे, अशी काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.

शहरांमध्ये आणि प्रगत देशांमध्ये 'माहितीचा स्फोट' होत असतानाच ग्रामीण भागात मात्र माहितीच्या अभावामुळे 'बौद्धिक कुपोषण' होत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी, युवक-युवती यांच्यामध्ये एक सहकार्याचा सेतु बांधण्याचे काम या ज्ञान केंद्राला करण्यात येणार आहे.

निसर्गाचे वरदान आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्वांचा खजिना असलेल्या आपल्या भागातील प्रागतिक विचारांच्या युवकांना एकत्रीत करणे गरजेचे आहे. शिक्षण, संशोधन, क्रीडा, शेती, आरोग्य यांचा आलेख दर्शवणार्‍या 'मानवी विकासाच्या निर्देशांकाची' संकल्पना ग्रामीण जनतेमध्ये रुजवणे गरजेचे आहे. म्हणुन, ग्रामीण सुशिक्षित युवकांचे संघटन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यादृष्टीने श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्र ह्या संस्थेची स्थापना केली गेली आहे.

आपल्या सूचना, मार्गदर्शन आणि सहकार्याची अपेक्षा. धन्यवाद! - श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्र, करडकवाडी !
संकेतस्थळ - www.kardakwadi.org ई-मेलः kardakwadi@gmail.com

प्रकार: 

गेले तीन महिने सुरु असलेले काम अखेर संपले!

मायबोली उद्योजक गटातील रुमा अन दुसरे मायबोलीकर प्रसाद शिरगांवकर यांच्या सहकार्याने एक सुंदर साईट तयार झाली!

अश्विनीमामी, संकल्प आणि कुल यांचे बहुमोल सहकार्य लाभले. कुल चे आभार मानावे तितके थोडे आहेत! थॅन्क्स कुल!

ग्रेटच रे चंपक Happy
या उपक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा!
या उपक्रमात सहभागी मंडळींचे अभिनंदन!
तुझ खुप कौतुक वाटत Happy जियो!

चंपक,
मस्त रे भाऊ! अभिनंदन अन खूप शुभेच्छा!!!

आणि बाबा चंपक चे मनःपूर्वक अभिनंदन !!!! "निमीश" चे चंपक ला बाबा केल्याबद्दल त्याचे डबल अभिनंदन आणि अर्थातच त्याच बरोबर तुझ्या सौ. चे ही.

मस्त रे. निदान काही लोकं, नुसत्याच गप्पा न मारता काही तरी करत आहेत हे पाहून आनंद झाला. तुझ्या वेबसाईटला अनेक शुभेच्छा.
सुंपथ कडून सहाय्य हवे असेल तर प्लान पाठव. मी सदस्यांना विचारुन बघतो.

एकमेका सहाय्य करु ..

अभिनंदन चंपक आणि शुभेच्छा! वेबसाईट बघितली. अजून काही दिवसांत आणखी नवीन गोष्टी तेथे येतील असे दिसते.

चंपक, तू गावातील लोकांसाठी काहितरी करावेस, अशी बरीच वर्षे आशा आणि अपेक्षा होती. ती पूर्ण झाली. तूझ्या करडक वाडीला भेट दिल्यापैकी, मी एक भाग्यवान आहे, आता तिथले कार्य बघायला, परत यावे लागणार.
अभिनंदन, शुभेच्छा आणि आशिर्वाद ही.
अश्विनी, कूल, रुमा, प्रसाद, संकल्प, सर्वांचे माझ्यातर्फेही आभार !

लाख , लाख , शुभेच्छा व अभिनंदन ,
चंपक प्रत्येक गावात एक तुझ्या सारखा चंपक आसवा , त्यामूळे देशाचा विकास नक्कीच होणार .

चंपक प्रत्येक गावात एक तुझ्या सारखा चंपक आसवा , त्यामूळे देशाचा विकास नक्कीच होणार .

लक्ष्मणराव, प्रत्येक गावात एक चंपक निर्माण होणे ही कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाही.
आणि जर समजा तसे झालेच तरीही त्याने देशाचा विकास होईल ही कल्पना भ्रामक आहे.
फार तर त्याने आणखी दहा-पाच अण्णा हजारे, बाबा आमटे वगैरे तयार होतील.

पण अवतारी पुरुषांमुळे देशाच्या संपुर्ण ग्रामिण भागात क्रांतीकारी बदल झाल्याचे उदाहरणच नाही.

जोपर्यंत शासकिय गंगाजळीचा प्रवाह ग्रामिण भागाकडे वळत नाही आणि ग्रामिण माणसांच्या कष्टाची किंमत होत नाही तो पर्यंत ग्रामिण जीवनाचा विकास होणे शक्यच नाही.

चंपक,
छान साईट झाली आहे !
या उपक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा!
या उपक्रमात सहभागी मंडळींचे अभिनंदन
जोपर्यंत शासकिय गंगाजळीचा प्रवाह ग्रामिण भागाकडे वळत नाही आणि ग्रामिण माणसांच्या कष्टाची किंमत होत नाही तो पर्यंत ग्रामिण जीवनाचा विकास होणे शक्यच नाही.
अनुमोदन !

धन्यवाद!

उद्घाटन दणक्यात झाले! पोपटरावांनी भरपुर कौतुक केले. दोन दिवसात @ ५००० हिट्स! बॅन्ड्विड्थ वाढवुन घ्यावी लागली Happy

मेडिया ने चांगले सहकार्य केले. फोटो मिळाले, कि (लवकरच) अपलोड करेल!

दै. सकाळ ची बातमी

http://www.esakal.com/esakal/20100807/5056541499969512610.htm

दै. म. टा. ची बातमी. (१५ ऑगस्ट च्या महाराष्ट्र खास आवृत्तीमध्ये)

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6312887.cms

दै. लोकमत ची बातमी

http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=AurangabadEdition-...

Pages