मोड काढलेले मूग ४-५ वाट्या ( साले पण काढायची असतात )
ओलं खोबरं - अर्ध्या नारळाचं कमीतकमी
८-१० बेडगी मिरच्या
२ टीस्पून धणे .
मूठभर काजू, सहा आंबाडे, शेवग्याच्या शेंगांचे दीड्-दोन इंच लांब तुकडे पंधरा सोळा - यातलं काहीतरी एक.
थोड्या तेलावर मिरच्यांचे तुकडे व धणे परतून घ्यावेत - करपू देऊ नये.
गॅस बंद करून त्यात पाव चमचा हळद घालावी.
गार झाल्यावर खोबरे, मिरची , धणे, सगळं अगदी बारीक वाटावं. अजिबात खरबरीत लागता कामा नये. काही जण यात एक चमचा तांदूळ पण वाटतात . मी नाही घालत.
मोड आलेले मूग थोडं मीठ घालून पातेल्यात थोड्या पाण्यात शिजत लावावेत.
( असे शिजवून घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रीज मधे आठ दहा दिवस रहातात )काजू/ शेंगा वगैरे घालायचे असले तर तेही यातच घालावेत.
मूग शिजत आले की ( अगदी गचका होऊ नये ) वाटलेला मसाला व मिक्सरचे भांडे धुतलेले पाणी मुगात घालावे, मीठ चवी प्रमाणे घालावे. आमटी फार पातळ नसते. ( पाहिजे तर शिजलेले मूगच चमचाभर वाटणात घालता येतात.)
एक-दोन उकळ्या आल्या की गॅस बंद करावा. मसाला घालून जास्त उकळू नये.
मसाला घातला की दुसर्यागॅसवर फोडणी करायला घ्यावी
तेल तापले की मोहरी, ती तडतडली की सुक्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, हिंग, थोडी हळद घालून आमटीला उकळी आली की फोडणि त्यावर घालून लगेच झाकण लावावे.
गरम गरम भाताबरोबर लगेच खावे ! फोडणी घालून झाकण लावले की भांडे जेवणाच्या टेबलवर गेले पाहिजे.
शोनू,
शोनू, थँक्यु!!!!! वाचूनच चवदार वाटतेय आमटी . नक्की करते. पुढल्या वेळी बिरड्यासाठी मूग सोलण्या ऐवजी मुगाघशी मूग सोलेन.
आता एव्हडंच सांग, आंबाडे म्हणजे?
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!!
धन्यवाद
धन्यवाद शोनु. बेडगी मिरच्या म्हणजे काय ? तसेच ओले काजु म्हणजे भिजवुनच ना ?
सिंड्रेला,
सिंड्रेला, इंडियन स्टोअरमध्ये लाल सुक्या मिरच्या असतात त्यावर बेडगी मिरच्या लिहिलेला पॅकही सापडेल तुला. बेडगी ही जात आहे लाल मिरच्यांची(चू.भू.द्या.घ्या)
हं शोनू मलाही सांग 'आंबाडे' म्हणजे काय?
रेसिपी मस्तच वाटते आहे. जर मुगाची सालं काढायची नसती तर करुन बघायला खूप आवडली असती.
जर मुगाची
जर मुगाची सालं काढायची नसती तर करुन बघायला खूप आवडली असती >>>> सालं न काढता कर आणि शोनुच्या रेचिपीत बदल केल्याचा भाव खा {मी तेच करणार आहे हे वेगळे सांगायला नको }
काजूगर
काजूगर काजूच्या बोंडातून काढले जातात तेंव्हा ओले असतात. पार्ल्यात एखाद्या भाजीवाली कडे, किंवा शिवाजी मंदिराच्या जवळ एका दुकानात मिळायचे सीझन मधे. एरवी साधे काजू वापरले तरी चालतात . बेडगी मिर्ची म्हणजे बेळगाव संकेश्वर वगैरे भागात प्रामुख्याने उगणारी एक मिर्ची. अति तिखट नसते अन चव व रंग एकदम मस्त. इथे एडिसन मधे आजकाल मिळते . नसल्यास साधी सुकी मिरची वापरायला हरकत नाही. शिर्सी, सिद्दापूर, कुमटा, या भागात तीच जास्त वापरली जाते .
थोडी चिंच पण घालतात वाटणात ते लिहायला विसरले.
अंबाडे म्हणजे हिरव्या बोरांसारखं पण आतून मोठी बी असलेलं किंचित आंबट फळ. मुंबैत पावसाळ्यात मिळायचं. कोकण भागात वापरतात. त्याला इंग्रजी मधे काय म्हणतात ते माहित नाही, अन इथेही एडिसनला किंवा चिनी , कोरियन दुकानात कधी पाहिलं नाही.
>>>शोनुच्या
>>>शोनुच्या रेचिपीत
लाडं लाडं का बोलते आहेस सिंड्रेला?
रेसिपी वाचल्या वाचल्याच माझ्या डोक्यात शॉर्टकट यायला लागले. त्यामुळे मुगाची सालं काढणं हे मी सोयीस्करपणे नजरेआड केलेलं आहे.
सिंड्रेका, ओले काजू हे नेहमीचे भिजवलेले काजू नसतात. बाजारात (भारतातल्या) ते ह्याच नावाने मिळतात. कुठे? कसे दिसतात? वगैरे काही माहित नाही मला. पण आमच्याकडे आई ओल्या काजूची आमटी करते. आम्ही खायचं काम करतो हे वेगळं सांगायला नकोच.
बेडगी
बेडगी मिरची नाही.. ब्याडगी मिरची.. निपाणी, संकेश्वर, बेळगाव ह्या भागात ह्या मिरचीचे पिक घेतात.. ही तिखट नसते मुळीच आणि रंग एकदम लाल असतो. त्यामुळे रस्सा वगैरेला वापरतात.
तसेच ओले काजु म्हणजे भिजवुनच ना ? >>
टण्या, हसु
टण्या, हसु नकोस. १ ltr पाण्यात इडलीचे पीठ भिजवण्यापेक्षा माझा प्रश्न बरा आहे (एक वाकुल्या दाखवणारी बाहुली)
अंबाडे
अंबाडे साधारण जन्माष्टमी ला बाजारात येतात. कोवळी असतात त्यावेळी छान शिजतात. मग जून झाले कि त्यात खूप रेषा येतात. आंबट असले तरी चिंच वा कैरीला ती चव येत नाही.
या अंबाड्याचे रायते आणि लोणचेही घालतात. फळ पिकले तर थोडे फिक्कट होते पण ना गोड होत ना पिवळे होत. मोठे झाड असते, गुच्छाने फळे लागतात. दादरला रानडे रोडवर असतात, विकायला.
ओ काकु
ओ काकु त्या रसचंद्रिकामधे पाहुन परवाच करुन पायले हो ते. लय म्हणजे लयच भारी. आणि ते देसी दुकानात ब्याडगीच्यानावाखाली जे काय देतात तेला निपाणी/संकेश्वरकडे कोणी विचारत पण नाय
----------------------------------------------------------------
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
मला
मला ब्याडगी मिरची ऐकून माहित होती पण तिखट्/कमी तिखट कशी असते त्याची कल्पना नव्हती. मोठ्या कौतुकाने आणली नी जराही तिखटपणा नाही. अगदी दहा घातल्या तरीही.
इथे
इथे महत्त्वाचा मुद्दा नजरेआड होतोय. भिजवलेल्या मुगाची सालं कशी काढायची? मी प्रयत्न केला पण मुगाचं पीठ झालं साधारण भाजलेल्या शेंगदाण्याची सालं जशी काढतो तशी सालं काढायचा प्रयत्न केला (दोन्ही हातांच्या तळव्यात मूग भरुन घ्यायचे आणि तळवे एकमेकांवर घासायचे)
ब्याडगीचा स्टॉल आणि तिखट मिरचीचा स्टॉल हे अगदी वेगळे ओळखू येतात होलसेल मार्केटात.. कुणी निपाणीला वगैरे मार्केटात गेले असाल तर कळेल..
टण्या,
टण्या, http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/46715.html ही लिंक बघ.
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!!
हे खरं,
हे खरं, इथली बेडगी म्हणजे वर्षाची भरायला म्हणून आणतात त्यातली चांगली निवडून उरलेली आई फोडणीत घालायला वापरायची तसली असते.
म्हणूनच मी अजूनही पुष्कळदा भारतातून ही मिरची अन त्याची पूड आणते. मासे भाजताना किंवा कच्ची केळी, वांगी , भेंडी , बटाटे यांचे काप भाजताना बेडगी मिरची बेस्ट.
बेडगी नाही
बेडगी नाही ब्याडगी.. ब्याडगीला बेडगी म्हणणे म्हणजे रसाच्या गुर्हा़ळातल्या चिपाड उसाला ७४५चा उस म्हणण्यासारखे वाटते
>>>भिजवलेल्
>>>भिजवलेल्या मुगाची सालं कशी काढायची
टण्या, मूग भिजवून त्याला मोड आले की काढ सालं. मी डाळिंब्याची उसळ करते तेव्हा वालाला मोड आले की ते ५ मिनिटं गरम पाण्यात टाकते की सालं पटापट निघतात. मूगही गरम पाण्यात टाकावे लागतात का ते तज्ञ मंडळींना विचारुन घे.
मोड
मोड आल्यानंतर मूग कोमट पाण्यात घालून ठेवायचे अन मग हाताने ते सगळं गोल गोल फिरवायचं - सेंट्रिफ्युगल ऍक्शन झाली की सालं मधे एकत्र होतात ती हलकेच भांडं कलतं करून टाकून द्यायची.
अरे वा, खूप
अरे वा, खूप खटाटोप नाहीये तर. सिंड्रेला, बघ बरं करुन.
शोनु,
शोनु, मूगाची सालं काढण्यामागे काही कारण आहे का?
चवीत फरक पडेल का त्याने काही?
सिंड्रेला,
तू सालासकट मुग वापरून हि डिश केलिस कि नक्कि सांग ईथे
सालं नाही
सालं नाही काढली ना तर ती शिजवल्यावर वेगळी वरती येतात , त्यांना चव नसते काहीच अन मसाला पण शोषून घेत नाहीत. आई , मावशी यांनी केले तेंव्हा एकही साल ठेवत नाहीत. पण मी, बहीण वगैरे करतो तेंव्हा सहज निघतील तेव्हढी सालं काढतो. मूग शिजल्यावर पण काही सालं वर येतात ती पण काढून टाकतो. बाकीची थोडीशी राहिली तर चालवून घेतो न काय!
ओले काजू नसले तर सुकेच मूग शिजताना घातले तरी चालतात हां.
आजकाल मुंबै मधे प्लास्टिकच दोन थर असलेलं एक गिझ्मो मिळतं त्यातनं अमेरिकेतल्या कोरड्या, गार हवेत सुध्दा छान मोड येतात असं ऐकलंय. पुढच्यावेळी येताना आणीन म्हणते.
तुम्ही कोणी वापरलंय का ते ?
मी नाही पण
मी नाही पण माझ्या एका मैत्रीणीने वापरले आहे आणि तिला ते खूप आवडले तेव्हापासुन ती सगळ्यांना तेच प्रेझेंट देते.
-----------------------------------------------------------
Calvin : You can't just turn on creativity like a faucet. You have to be in the right mood.
Hobbes : What mood is that?
Calvin : Last-minute panic.
- Calvin & Hobbs
अगं तू
अगं तू स्प्राऊट मेकरबद्दल म्हणते आहेस का शोनू? माझ्याकडे ही आहे.इथून एडिसनच्या सब्जी मंडीतून घेतलेलं. चांगले मोड येतात.
स्प्राउट
स्प्राउट मेकर... छान असतो... काम सोपे होते..
मी पण हेच
मी पण हेच सुचविणार होते.
ब्याडगी ला बेडगी म्हणणे म्हणजे 'त्यो' म्हणणारा खेडूत जर एकदम 'तो' म्हणाला तर कसं वाटेल?
शोनु,
शोनु, आमच्याकडे याला 'मुगा गाठी' म्हणतात.
माझा आवडता पदार्थ.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी
शोनू, मी
शोनू, मी काल मोड आलेल्या हिरव्या मूगाची ह्या पद्धतीने उसळ केली. एकदम मस्त झाली होती. दोन वेळेची उसळ आणि पोळ्या दुपारीच संपल्या.
संकेश्वरी,
संकेश्वरी, गुंटुर, लवंगी, ब्याडगी हे पश्चिम महाराष्ट्रातले मिरचीचे मुख्य प्रकार.
लवंगी एकदम पिटुकली पण जहाल.
गुंटुर मिरची साधारण २-२.५ इंची रंगाने केशरट लाल असते आणि जहाल.
संकेश्वरी साधारण ४-५ इंच लांब लालसर केशरी तिखटपणाला मध्यम.
ब्याडगी साधारण ५-६ इंच लांब मस्त लालचुटुक रंग आणि तिखटाला एकदम सौम्य.
घरी तिखट करायचे तर १ किलो बॅडगी, १/२ किलो संकेश्वरी असे करते मम्मी. म्हणजे रंग आणि चव दोन्ही मस्त येते.
----------------------------------------------------------------
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
शोनु, आज
शोनु, आज केले होते वरील कृतीप्रमाणे. मस्तच झाले होते आधी १ वाटीभर नुसतेच खाल्ले मग भाताबरोबर. ताज्या वाटलेल्या मसाल्याची चव छान आली होती.
ओले काजु माझ्या पद्धतीचे घातले
शिळ्या
शिळ्या मुगामोळ्यामधे शिळी इडली घालून मुगामोळ्यातलीच फोडणीला घातलेली लाल मिरची कुसकरून खायची. किंवा हातसडीचे जाडे पोहे असतील तर ते घालून खायचे. स्लर्रर्रर्रप!
करुन बघावे
करुन बघावे लागेल.
शिळ्या मुगामोळ्यामधे शिळी इडली घालून <<<
घ्या... म्हणजे हे करण्यासाठी ती आमटी उरवायची, आधी इडली करुन ती उरवायची आणि फोडणी पण उरवायची ? आनंद आहे.
आधी १ वाटीभर नुसतेच खाल्ले मग <<< Cindrella, तू हे बघू नकोस, तुझी अशाने उरत नसणारच नाही कधी
Pages