Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अम्या, Micromax, INQ , LAVA ,
अम्या, Micromax, INQ , LAVA , MAXX किंवा मग Spice मधे चेक कर.
सॅमसंग मधे असे बरेचसे ऑप्शन आहेत पण तुला ड्युअल सिम मिळणार नाही. सध्या सॅमसंगचा ओमनिया प्रो. सही लुक्स मधे आहे.
नेट वापरण्यासाठी AIRCEL , किंवा मग CDMA मधे RELIENCE or TATA Indicom यासारख्या नेटवर्कसची सर्व्हीस चांगली आहे.
तरीही या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला www.techtree.com आणि www.tech2.com वर मिळतील.
GSMArena अशा काहितरी नावाची
GSMArena अशा काहितरी नावाची एक साईट पाहिली होती, त्यावरही सर्व मॉडेल्सची रिव्ह्यूसह माहिती आहे.
gsmarena.com, fonearena.com
gsmarena.com, fonearena.com ईथे बघ.
Dual Sim साठी सुर्याने दिलेली मॉडेल्स बघ. साधारण ६०००/- पर्यंत मिळतील. Micromax Q5 चांगलं आहे. त्यांचं नवीन Q7 देखिल मस्त वाटतय, ज्यात Wi-fi देखिल आहे.micromaxinfo.com बघ Nokia C0 OR C2 असं ड्युअल सिम वालं मॉडेल आणतय असं त्यांच्या साईटवर आहे. पण ते अगदीच बाळबोध असेल. Samsung मधे Dual sim models आहेत पण ती बहुधा एकावेळी दोन वापरता येत नाहीत.
वर्ड, एक्सेल साठी मात्र तुला business phone घ्यावा लागेल. म्हणजे Nokia E series OR BlackBerry! ९००० ते १३५००.
घरी वापरण्यासाठी MTNL बेष्ट! ३९५ unlimited हा नविन प्लान चांगला आहे.
असुदे, मोबाईलच्या मॉडेल्सचं
असुदे, मोबाईलच्या मॉडेल्सचं मला काही ज्ञान नाही. पण एक सांगू.....
मागे एक एसएमएस आला होता. मोबाईल आणि बायको दोन्ही गोष्टी अश्या आहेत नां, की घेतल्यावर/मिळाल्यावर वाटतं अरे अजून थोडं थांबायला हवं होतं, आणखीन चांगलं मॉडेल मिळालं असतं.
आडो अगदी खरं आहे. मोबाईल
आडो अगदी खरं आहे. मोबाईल सर्रास चोरीला जातात आजकाल.. पण बायका नाही
न९००..... मला आजकाल तेवढा एकच
न९००..... मला आजकाल तेवढा एकच दिसतोय डोळ्यासमोर.... तुम्हाला हव्या असलेल्या पैकी ड्युल नाही त्यात... आणी तुम्हाला आवडेल असा पण नाहीये म्हणा..... मुळात विषयांतर केल्या बद्द्ल क्षमस्व... पण इथे.... कोणी अस आहे का ज्यानई नोकिया एन ९०० वापरला आहे....
सुर्या न मिळालेल्या मोबाईलचं
सुर्या न मिळालेल्या मोबाईलचं दु:ख आत्तापासूनच...
अम्या तुला हा प्रष्न का पडावा
अम्या तुला हा प्रष्न का पडावा असा मी विचार करतोय...
आणि फारच अपेक्षा आहेत रे तुझ्या , आधी जरा स्वत:कडे बघ
विन्या त्याच्याकडे बघूनच
विन्या त्याच्याकडे बघूनच त्याने अपेक्षा मांडल्या आहेत. बाकी ड्युअल सिमचं मला कळलं नाही अम्या ह्या वयात असं शोभतं का तुला
एका वेळेस दोन दगडांवर पाय
एका वेळेस दोन दगडांवर पाय ठेवायची सवय काही जात नाही अम्याची
अम्या, अगदी सेम बीबी चालू
अम्या, अगदी सेम बीबी चालू करायच्या मी पण विचारात होते. गूड दॅट यू डीड इट.
लोको, मला पण घ्यायचाय मोबाईल. माझ्या requirements टाकते थोड्याच वेळात. मला पण सजेस्ट करा.
अम्या... ड्युअल सिम हवा असेल
अम्या...
ड्युअल सिम हवा असेल तर मायक्रोमॅक्स किंवा सॅमसंग घे...
जर ती रिक्वायरमेंट शिथिल करणाअर असलास तर मिड रेंज मधे नोकिया ई६३ (सुमारे ७०००)/ ई७१ (सुमारे १३०००) घेऊ शकतोस...
जर हाय एंड घेणार असलास (१७०००+) तर अँड्रॉईड बेस्ड फोन घे...
त्यातल्या त्यात स्वस्तातले अँड्रॉईड फोन्स-
सॅमसंग गॅलेक्सी ५७००, गॅलेक्सी ७५००
एचटीसी टॅटू, हीरो, मॅजिक
आडो बाकी तुला असले प्रश्न
आडो
बाकी तुला असले प्रश्न पडावेत म्हणून जरा आश्चर्य वाटतय
अमित साठी खास फोन
अमित साठी खास फोन
अश्विनीमामी
अश्विनीमामी
अमित साठी खास फोन >>>
अमित साठी खास फोन >>> अम्याच्या फोटोसकट :d
फोटोत काहितरी मिसिंग
फोटोत काहितरी मिसिंग आहे...मामी
नोकीया सी-३ येवु
नोकीया सी-३ येवु घातलाय..
फक्त ६००० मध्ये हे सगळे आहे..
इंडीयात लॉच व्हायची फक्त देरी आहे...........
नक्की फोनच हवाय ना
नक्की फोनच हवाय ना
नोकियाच्या एखाद्या कम्युनिकेटर मॉडेल मध्ये कदाचित असतील ह्या सोयी.
आडो , मामी असुदे नक्की मो
आडो , मामी
असुदे नक्की मो बाईल च शोधतोय का ?
सध्या तरी मी सॅमसंग(कॉर्बी)
सध्या तरी मी सॅमसंग(कॉर्बी) वापरते आहे(या जानेवारीपासुन). अजुनही एकही कंप्लेंट नाही, मला थोडाअ नोकीयापेक्षा सरस वाटतोय. कारणे पुढिलप्रमाणे...
१) हॅन्डलिंग टच स्क्रिनमुळे एकदम सोप्पे.
२) बॅटरी लाईफ नोकियापेक्षा खुपच जास्त. अगदी सकाळी आणि संध्याकाळी १-१ तास गाणि ऐकुनही मला २-२.५ दिवस बॅटरी पुरते.
३) माझ्याकडे नेट पटपट चालु होते.(वोडाफोन)
४) आवाजही बर्यापैकी आहे.
५) एक्सपांडेबल मेमरी ४ जिबी
फक्स्त तुझ्या पॉईंटप्रमाणे दोन सिम आणि एक्सेल वैगरे नाहीय पण मला ओवरऑल सॅमसंगचा खुपच चांगला अनुभव आला आहे. (मी "नोकियावेडी" असुनही मान्य करत आहे...)
सॅमसंग हवा असेल तर एक कॉल कर. थोडि मदत करु शकेन..
C3 मधे Dual Sim नाही, त्याची
C3 मधे Dual Sim नाही, त्याची अपेक्षित किमत ५५०० आहे. त्यापेक्षा Corby घ्यावा.
आवाजही बर्यापैकी आहे.>> म्हणजे तुझा आवाज समोरच्याला Amplify करुन ऐकु येतो कां?
रुपाली,,, तु कॉर्बीच कोणत
रुपाली,,, तु कॉर्बीच कोणत मॉडल वापरतेस.... कारण मी जो बेसीक कॉर्बी वापरला होता त्याच्यात ब्राउजींग नोकीयाच्या तुलनेत फारच भंगार होत अस मला वाटत...
तो मुळातच फुल ब्राउजींग सपोर्ट करत नाही....
वरील प्रतिसादात वापरलेल्या भेसळयुक्त मराठीमुळे मी स्वतःला ३ मिनेटे अंतरजालापासुन दुर ठेवण्याची शपथ घेत आहे..... :फासावर लटकवलेली बाहुली: (मरण्यापुर्वी काढुन घेणे... पुढे कधीतरी कामाल येईल)..
धन्स सर्वानाच ,
धन्स सर्वानाच , प्रतिसादांबद्दल.
सुकी,
Micromax, INQ , LAVA , MAXX , Spice मध्ये फोनबुक बॅकअप ची सोय आहे काय ? ह्यांचा सर्व्हिस सेटअप कसा आहे ?
आडो, मुद्दा बरोबर आहे पण काही फरक आहेतच
१. दोन वा जास्त मोबाईल वापरणं हा कायद्याने गुन्हा नाही.
२. तुम्हाला दुसरं मॉडेल आवडल्यास तुमचा मोबाईल जळत / तुम्हाला धमक्या देत नाही.
३. मोबाईल तुमच्याकडे काहीच मागत नाही.
४. मोबाईल तुमच्यावर स्वयंपाकाचे प्रयोग करत नाही.
५. तुम्ही तुमचा मोबाईल बंद / म्युट ठेवू शकता. त्याचा आवाजही कमी ठेवू शकता.
६. मोबाईलवरची तुमची संभाषण खाजगी राहू शकतात.
मालक, अपेक्षांची कारणे अशी
१. एक ऑफिसचे सिम एक पर्सनल. ओफिसच्या सिमेवर अर्थातच नेटास बंदी असणार
२. नेट कनेक्टिव्हिटी अर्थातच मेल्स व सोशल नेटवर्किंग साईट पुरती मर्यादित.
३. लुक्स चे कारण नव्या ऑफिसमध्ये माझी खरी किंमत कळू नये.
४. माझ्याकडे साधारण १००० च्या आसपास कॉन्टॅक्ट नंबर्स असल्याने बॅक अप आवश्यक
बाकी अपेक्षा काय कुणीही बाळगू शकतो हे ही सिद्ध झाल यातून...
मामी, तुमाखमै. बाकी सगळे फुकाचे सल्ले देत्यात...
मंगेश, मी वाट पाहू का तिथून मागवू ?
रुपाली, सॅम्संग चा ड्युएल सिम आलाय. शोधून बघतो.
अमित, माझा अनुल्लेख केलास.
अमित, माझा अनुल्लेख केलास. असो. Micromax ची Authorized Service Centres आहेत. माझ्या मित्राने घतल्यावर दोन महिन्यात त्याचा हेडफोन कनेक्टर शॉर्ट झाला (त्याच्याच चुकीने). त्याला नवीन पिस मिळाला . (हे "मोबाईल"च्या बाबतीतच होतं ). Micromax सोबत सॉफ्टवेअर पण मिळतं ज्यायोगे तू बॅकअप घेऊ शकतोस.
भ्रमा, तूझा अनुल्लेख केला
भ्रमा, तूझा अनुल्लेख केला कारण तू दिलेल्या साईटवर सर्चतोय अजून. मॉडेल्स सिलेक्ट केल्यावर डिस्कस करण्यासाठी तूला कॉलेनच
अम्या.... सॅमसंग चा DUOS बघ
अम्या.... सॅमसंग चा DUOS बघ रे C6112 मॉडेल.. बर्यापैकी अपेक्षा पूर्ण होतील तूझ्या.. किंमत ६८००.. एक्स्पांडेबल मेमरी ८ जीबी.. सोशल नेटवर्कींग चे ही बरेच ऑपन्शस आहेत.. लूक पण मस्त आहे... मला तरी चांगला अनुभव आला ह्याचा... अजुन काही माहीती लागली तर ईपत्र धाड...
c6112 ... 6800 b5722 ...
c6112 ... 6800
b5722 ... 11680
B572 टच स्क्रीन आहे.
अम्या , तू ड्युअल सिम मधे
अम्या , तू ड्युअल सिम मधे काँम्प्रमाईझ कर अन सॅमसंग ओमनिया प्रो घे डोळे झाकून.
भ्रमा, खालची मॉडेल्स
भ्रमा,
खालची मॉडेल्स चेकतोय
नोकीया सी६ / सी३ / ई५ ( डबल सिम ?)
मायक्रोमॅक्स क्यू७ (क्यूट )
सामसुंग सी६११२ आणि बी५७२
हि वेबसाईट बघ
http://www.infibeam.com
अमित, तू बघितलेलं मॉडेल लई
अमित, तू बघितलेलं मॉडेल लई भारी दिसतय.
http://www.cyberindian.net/2010/06/20/bright-telecom-launches-g-fone-g-7...
हवे ते फिचर्स, कमी किंमत.. थोडक्यात काय सही रे सही. सर्विस सपोर्ट Accel Frontline कडे आहे, म्हणजे प्रॉब्लेम्स येऊ नयेत. मला पण घ्यावासा वाटतोय!! :-).
ड्युअल सिम मधे काँम्प्रमाईझ
ड्युअल सिम मधे काँम्प्रमाईझ कर अन सॅमसंग ओमनिया प्रो घे डोळे झाकून.
>>
ओम्निया नको...
गॅलॅक्सी स्पेसिया घे... १२८०० पर्यंत उतरलय...
३जी आहे
वायफाय सुविधा आहे
अँड्रॉईड २.१ बरोबर येतो
फेस्बुक, गूगल, ट्विटर आदी काँटॅक्ट्स एका क्लिक मधे फोनबुक शी सिंक होतात
वाईड रेंज ऑफ अॅप्लिकेशन्स अँड विजिट्स...
इथे सुचवललेल्या कोणकोणत्या
इथे सुचवललेल्या कोणकोणत्या मोबाइइलवर मराठी युनीकोड फॉन्ट Avialable आहे? कोणी स्मार्टफोनमधे हि सुवीधा वापरत असल्यास प्लिज सुचवा..... मी अजुन नोकीया-६२३३ च वापरतोय, त्यावरून मी मायबोली देखिल बघु शकतो. लहान स्क्रीन सोडल्यास सर्वकाही ठिकच आहे.
...... वर्ड, एक्सेल, फेस्बुक, गूगल, ट्विटर, ओपेरा......... हे जर कोणत्याही मोबाइइल मधुन एक्सेस करावयाचे असतील तर www.getjar.com या साइट्ला अवश्य भेट द्या
I want to take new mobile.
I want to take new mobile. which OS/ S/W good for use... Just like JAVA or something else...
which OS/ S/W good for
which OS/ S/W good for use...
>>
अँड्रॉईड २.१
micromax x600 gravity phone
micromax x600 gravity phone घे भन्नाट आहे. तुझ्या सर्व अपेक्शा पुर्ण होतिल. ५०००/- फक्त. बाकि कोणाचे ऐकु नकोस्...........गेल्या महिन्यातच launch झाला आहे.
X600 & G777 यांच्य तुलनेत
X600 & G777 यांच्य तुलनेत G777 उजवा वाटतोय. एकतर त्यात Mobile Office आहे जे X600 मधे नाही. कॅमेरा देखिल 3.2MP आहे.
अॅन्की, माझ ब्राउजिंग फक्त
अॅन्की, माझ ब्राउजिंग फक्त मेल्स आणि फेबु पर्यंतच मर्यादित राहील. माबोचं कस जमणार आहे देवजाणे. त्यामुळे स्वस्त आणि मस्त असा जी-फोनचा ७७७ घेईन बहुधा. सल्ल्याबद्दल धन्यावाद लोकहो. अर्थात उद्या संध्याकाळी घ्यायला जाणारे त्यामुळे व्होटिंग लाईन्स खुली है.
भुषण कदम, हा ड्युएल सिम दिसत नाहीये. तुम्ही तरिही एकदा भ्रमर ह्यांनी दिलेल्या लिंकवर चेक करुन तुमचे म्हणणे मला कळवा.
X600 is Dual SIM...आवडलेली
X600 is Dual SIM...आवडलेली गोष्ट म्हणजे सिम बदलाययला फक्त फोन उलट करायचा..Gravity Sensor!!!
हुश्श, अखेर घेतलाच फोन.
हुश्श, अखेर घेतलाच फोन. वापरला जवळजवळ दोन आठवडे. जी-फोन चा ७७७.
किंमत ५५००, मी मागितलेलं सर्व काही. फिर भी कुछ जम्या नही. बेसिक फंक्शन्सची कमी जाणवते..
उदा. : फॉन्ट छोटा / मोठा करुनही एका वेळी चारंच नाव दिसतात फोनबुक मध्ये. व्ह्यू ऑप्शन्स नाहिच्च्येत. फक्त नाव दिसणार स्क्रीनवर. ते सिलेक्ट केलं तर फोन नं दिसणार. नाहितर मग उघडा कॉन्टॅक्ट. सिंक सॉफ्टवेअर अगदीच बेसिक आहे. त्यातल्या त्यात बरं म्हणजे आउटलुक / लोटस नोट बरोबर जमत त्याचं. पण सीएसव्ही / एक्सेल इंपोर्टच्या नावाने बोम्ब.
नेट बरं आहे पण जी-टॉक ईन्स्टॉल नाय केलं अजून मी त्यावर.
पण दिसायला गोड आहे आणि ईंप्रेसिव्ह पण....
सो भाव खायला मस्तच....
कॅमेरा कसा आहे. आणि Mobile
कॅमेरा कसा आहे. आणि Mobile office चेकलं कां??? मुख्य म्हणजे बॅटरी किती काळ टिकते?? साधारण "बोलवेळ" किती मिळतो?
कॅमेरा सो सो. सेटिन्ग्ज्स
कॅमेरा सो सो. सेटिन्ग्ज्स फार्शी नाहीत. फोटोला झूम नाही, व्हिडिओ ला आहे.....
ऑफिसच्या फाईल्स खुलतात पण सल्लो सल्लो. टेक्स्ट बर्यापैकी उघडतात.
बॅटरी दोन दिवस धकते...
मला कालच १ मैत्रिण भेटली
मला कालच १ मैत्रिण भेटली होती. तिच्याकदे आय-फोन ३जि ८ जिबि आहे. तिने सेकंडहँड घेतला ३ महीन्यांपुर्वी, आता तिला तो काढून ४जि घ्यायचा आहे. त्याची तिला १७,५००/- किम्मत हवि आहे. हि किम्मत बरोबर आहे का? आता हा फोन ८महिने जुना आहे. मुळात थर्ड हँड घ्यावा का?? घेतल्यास त्याची किम्मत किती असावी??
४जि ची भारतातील किम्मत किति आहे??
मी शक्यतो सेकंडहॅन्ड वस्तु
मी शक्यतो सेकंडहॅन्ड वस्तु प्रेफर करत नाही पण नापतोल.कॉम वर चेक केले तर भारतातील आय-फोनच्या (फर्स्ट हॅन्ड) किंमती खालील प्रमाणे आहेत
Apple iPhone 3G/32GB :-Rs. 27,399 ;
Apple iPhone 3G/8 GB:-Rs. 23,110 ;
Apple iPhone 4G/32GB:-Rs. 46,000
3G गरजेचे असल्यास नोकीयाचा 5230 हा फोन Rs.6,488 ला उपलब्ध आहे, त्याचे मॅक्सीमम फिचर्स देखिल Apple iPhone 3G सारखेच आहेत.
सॅमसंगचे हायर रेंजमधले (>१५K)
सॅमसंगचे हायर रेंजमधले (>१५K) चांगले फोन्स सुचवा ना प्लीज....
सॅमसंग मधे Samsung B5722 हा
सॅमसंग मधे Samsung B5722 हा फोन ड्युअल सिम, 3.15MP कॅम, 240 x 320 डिस्प्ले असलेला फोन Rs.7,821 पासुन पुढे किंमतीला उपलब्ध आहे, बजेट जास्त असल्यास Samsung S8000 Jet हा 3G फोन Rs.12,177 ला उपल्ब्ध आहे. ईतर मॉडेल्सच्या माहितीसाठी http://www.naaptol.com/buy-online/WO-shopping-best-deals-W27O/mobile_pho... ईथे क्लिक करा
धन्यवाद प्रसिक....
धन्यवाद प्रसिक....
माझा मायक्रोमॅक्स क्यू७ आहे
माझा मायक्रोमॅक्स क्यू७ आहे its really value for money की काय म्हणतात ते .....छान आहे !!
म्युसीक क्वालीटी ही मस्त !!!
धन्यवाद प्रसिक. आय फोन ३ जि
धन्यवाद प्रसिक. आय फोन ३ जि नवाच घेईन म्हणते!!
१५-२०००० दरम्यानचा एखादा
१५-२०००० दरम्यानचा एखादा चांगला फोन सुचवाल का?
१) टच / टच+QWERTY चालेल.
२) ३जी, Wi-Fi, उत्तम कॅमेरा, चांगली बॅटरी असावेत (मला सध्या सोनी एरिकसनचा खराब अनुभव आहे)
३) मुख्यतः वापर हा गाणी ऐकणे, नेट सर्फिंग, चित्रपट पाहणे, चॅटिंग (फेसबुक, जीमेल) इ.
४) वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
मी नोकिया E-72, HTC Desire, Samasung Galaxy व Blackberry Curve 3G यापैकी एक घ्यावा असा विचार करतोय.
Pages