सर्वप्रथम मातृभाषेत शिकणे हीच सर्वोत्तम पद्धत (ले० स्वामीनाथन एस० अंकलेसरिया अय्यर, टाईम्स ऑफ इंडिया)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

“Faced with half-empty classrooms in government schools, some state governments plan to introduce English from Class 1 to win back students. That would be a serious error.” श्री० अंकलेसरिया स्वामीनाथन अय्यर यांनी भारतातील राज्यशासनांस इशारा दिला आहे.

http://amrutmanthan.wordpress.com/2010/02/10/सर्वप्रथम-मातृभाषेत-शिकण/

क०लो०अ०

प्रकार: 

वाचनीय लेख! पण हे असलं काही स्वतःच्या भल्याचं आम्हां मराठ्यांना झेपणार नाही हो; पराभूत मानसिकतेची परंपरा असलेला समाज आमचा. Sad Angry

बाकीच्या भाषिकांचे माहित नाही, पण मुंबईत राहणा-या मराठी लोकांना मात्र मराठीतही शालेय शिक्षण होऊ शकते ह्याचा विसर पडलाय. त्यामुळे मराठी शाळांची संख्या दिवसेदिवस कमी होत चाललीय. मराठीत डि.एड करणा-यांची संख्या पण आता रोडावत असेल बहुतेक, कारण त्यांना नोकरी कुठे मिळणार हा प्रश्न पडत असेल. अजुन काही काळाने, मराठी शाळा उपलब्ध नाहीत, आहेत त्या शाळेत शिक्षक उपलब्ध नाहीत म्हणुन मराठीतुन शिक्षण घेणे कायमचे बंद होईल. मग मी माझ्या नातीला सांगेन, ' बरं का गं ठमे, तुझ्या आईच्या आणि माझ्या लहानपणी, आता आपण ज्या भाषेतुन बोलतोय ना, त्याच भाषेत शाळेतही बोलायचे....' आणि ती माझ्याकडे आश्चर्याने पाहिल, थक्क होऊन... Happy

मुंबईबाहेर काय परिस्थिती आहे माहित नाही....

खरयं साधना... सगळीकडे परिस्थीती एकच आहे

चिरंजीव (२.५) सध्या ज्या नर्सरी मधे जात आहे तिथे इतर भाषिक मुलेही येत आहेत. तिथे प्रत्येक मुल मातृभाषेतून संवाद साधत असताना पाहिले आणि शिक्षक मात्र इंग्रजीतून मार्गदर्शन करताना दिसतात. या संवाद अक्षमतेमुळे पाल्यला लहानपणीच बुजरा होण्याचे बाळकडू मिळत आहे.

परळ-दादर मधे मराठी माध्यमाच्या शाळा बर्‍याच आहेत पण त्यांच्या दर्ज्या बद्दल काय बोलावे Sad