मासे १२) जवळा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 July, 2010 - 05:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जवळा एक किंवा दोन वाटे,
बेसन १ ते दिड वाटी
१ कांदा बारीक चिरुन
आल लसुण, पेस्ट
२-३ मिरच्या बारीक कापुन किंवा २ चमचे मसाला
थोडी कोथिंबीर चिरुन
हिंग, हळद
चविपुरते मिठ
थोडा लिंबाचा रस
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

जवळा निवडून धुवुन घ्यावा. निवडायचा म्हणजे कधी कधी ह्यात दुसरे बारीक मासे, छोट्या चिंबोर्‍या असु शकतात ते काढायचे.
तेल वगळून वरील सगळे जिन्नस एकत्र करावे. पाणि घालु नये. मग चपट्या वड्या करुन तव्यावर शॅलो फ्राय करायच्या.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांसाठी
अधिक टिपा: 

ह्यात तुम्ही आवडीनुसार गरम मसाला घालू शकता.
लसूण कापुन घातल तर अजुन चांगल्या लागतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू सहीच तोंपासू . मला खुप आवडतात जवळयाच्या वड्या Happy
जागू चिकनची हि रेसिपी सांग ना श्रावण सुरू व्हायच्या आधी .

जवळा साफ करायला खुप कटकटीचे असते काय गं? मी कधी आणला नाही. माझी मैत्रिण म्हणत होती की त्यात बरेचदा पातळ प्लेस्टिक पण येते म्हणुन..
फायनल प्रॉडक्ट अगदी तोंपासु असणार यात नवल नाही. कोलंबीचे सगळे प्रकार तोंपासुच असतात.

करंदी - जवला एकच ना?? ओली ती करंदी, तीच वाळवली की जवला तयार... माझी एक मैत्रिण ह्यालाच अंबाडी असेही म्हणायची. जागुमॅडम, तुमच्या एक्पर्ट कमेंट येऊ द्या. करंदी-जवला-अंबाडी वर.. Happy

जागु, हा जवला आहे की करंदी?? जवला एकदम बारीक असतो नां? मला देखील हाच प्रश्न पडला.

ओली ती करंदी, तीच वाळवली की जवला तयार... >> मला वाटत वाळवलेली करंदी वेगळी, आणि वाळवलेला जवळा अगदीच बारीक असतो. फोटोत दिलेला जवळा असू शकतो, थोडफार जाडसर

साधना, ही करंदी, किंवा ओला जवळा. करंदी वाळली की ती जवळा. अन या पेक्षा मोठी कोळंबी सुकली की आंबाडी किंवा त्यालाच सुकट असंही म्हणतात. हो ना जागू ?
जुई, अगं खुप क्लोज अप आहे म्हणून तुला ती मोठी वाटत असेल; असते अगदी बारीकच.

हो ओला जवळाच म्हणायला हवे याला. साधारण जवळा, म्हंटले कि सुका जवळा असे समजतात.
जवळा, झिंगा, गोलीम, सोडे............

फोटोतल्या साईझवरुन "ओला जवला" नाही वाटत. मी करंदी म्हणतो ती कोळंबीपेक्षा लहान आणि जवल्यापेक्षा मोही असते आकाराने. असो. पदार्थ छान आहे हे नक्की!

आरतीशी सहमत.. अंबाडी मोठी असते तीचे डोके आणि शेपुट काढुन वापरावी लागते. जवल्यात ती भानगड नाही..

तशी मी सगळ्यांशीही सहमत. ओला/सुका जवळा/करंदी/अंबाडी जे काय असेल ते असुदे, नावे बाजुला ठेवा आणि मला खायला बोलवा. वर उल्लेखलेले सगळे प्राणी तोंडात घालायच्या आधी तोंडाला पाणी सुटते आणि तोंडात घातले की ब्रम्हानंदी टाळी लागते......... Happy

वरील फोटो झुम करुन काढल्याने जवळा करंदी सारखा दिसतोय.

साधना, जुई, आरती, भ्रमर, दिनेशदा मी सविस्तर सांगते. जसे फोटो मिळतील तसे टाकेनही.

*पहिला कोलीम किंवा रेफा ह्यात अगदी बारिक बारिक नुकतीच जन्मलेली पिल्ले वाटा पाहिल्यार कोलंबीचा आकारही ह्या पिल्लांना दिसत नाही. हा सुका करतात कांद्यावर भाकरीबरोबर एकदम टेस्टी लागतो.
ह्यातील सुका प्रकार म्हणजे कोलिमाच्या वड्या. ह्याच्या पापडाच्या आकाराच्या वड्या करुन सुकवतात ह्या वड्या भाजुन भाकरीबरोबर खातात.

* नंतर जवळा म्हणजे जरा कोलंबीचा आकार दिसायला लागलेली कोलंबीची पिल्ले. साधना म्हणते त्या प्रमाणे ह्यात कधी कधी प्लास्टीक येते आढळून ते काधून टाकायचे.
ह्याचा सुकवलेला प्रकार म्हणजे सुका जवला हा बर्‍याच जणांना माहीत असेल.

* नंतर येते करंदी किंवा अंबाड थोडी गुटगुटीत बाळ झालेली कोलंबी.
हिच सुकवल्यावर सुकी करंदी किंवा सुकी आंबाड होते.

*नंतर येते कोलंबी ही तर सगळ्यांना माहीत आहे.
हिचा सुकवलेला प्रकार म्हणजे कोलंबीचे सुके सोडे हे खुप महाग असतात.

* ह्यानंतर करपाली चांगल्या जाड्या जुड्या फुगलेल्या काळ्या कोलंब्या
हे सुकवले की कोलंबीचे मोठे सोडे तयार होतात.

प्लॅस्टीक कसं येतं त्यात?

बाकी पहिला फोटो बघवत नाहिये (आधीचे अख्खे चंदेरी मासे सुंदर दिसत होते). एका मैत्रिणीला हे घ्यायचं होतं. तिने कोळणीच्या पुढ्यातील वाटा दाखवल्यावर मी तिला बाय बाय करुन पलिकडल्या फुटपाथला गेले पण विचार करत होते की ही माश्यांचा उरलेला बारीक बारी कचरा का विकत घेतेय? आता कळलं ते काय होतं ते.

थंड रेसिपी दे कोलमाच्या लोणच्याची. मी पहिलांदाच एकल. कोलंबीच लोणच माहीत आहे.
भ्रमर Happy
अश्विनी, अग जाळ लावल की त्यात समुद्रात वाहत असलेल्या बारीक सारीक वस्तुही अडकतात जाळ्यात.

जागू मी शाकाहारी आहे पण रेसिपी वाचून उत्सुकता लागली होती की जवळा निवडल्यावर तेल सोडून सगळं सामान मिक्स करून थेट वड्या कशा थापता येतात? Uhoh या जवळा म्हणजे माश्यांचाच प्रकार आहे ना? त्यात काटे-बिटे नसतात का?

दक्षीणा, अश्विनी जवळ्यात काटे नसतात. फक्त जवळ्याची डोकी थोडी टोकदार असतात. पण त्याने एकवढा काही फरक पडत नाही. जवळा लिबलिबीत नसतो बेसन ने तो मिळून येतो.

अगं ते लिबलिबीत असणार म्हणून एकजीव होत असेल कालवल्यावर वड्या थापण्याजोगं.

कायच्या काय हा अश्वे..... काही लिबलिबित नसते. एवढ्या गोजिरवाण्या बाळांना उगी लिबलिबित म्हणु नकोस, मला राग येईल...

अश्विनी अग बोंबिल असतात लिबलिबीत जवळा फरफरीत असतो Lol
आणि साधनाला जर राग आला तर काही खर नाही तुझ.

जागु, मस्तच दिसतेय हि रेसिपी. नक्की करुन बघेन.

भ्रमा, आता पुढच्यावेळी नक्की फिश मार्केटात दिसणार ओला जवळा शोधताना. Happy
मलातर सुका जवळाही खुप आवडतो. Happy

बुधवारीच साबांनी कोलंबीचे लोणचे केले होते. खुप दिवसांनी खाल्यामुळे खुप मस्त जेवण झाले त्यादिवशी. लेकीला बाबा म्हणाला की मी तुझा ना सोनु मग मला तुझ्यातल्या दोन कोलंबी देना. तर तिने उत्तर दिले की बाबा मी तुमचीच आहे पण ह्या कोलंबी माझ्या आहेत. Happy बाबाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

माझ्या लेकीनेही असला उद्योग केला होता. माझ्या सासरी मासे व. खात नाहीत. मी तिथे राहात होते तेव्हा लेकीला फिश खायला मिळायचे नाहीत. एके दिवशी जेवताना जोरात रडायला लागली, सासरे मला म्हणाले, मुलांना जे आवडते ते द्या खायला मग रडणार नाहीत आणि तिला त्यांनी विचारले, बाळा तुला काय खायला पाहिजे. ती जोरात ओरडली, फिश... आणि अजुन जोरात रडायला लागली. सा.बू.चा चेहरा पाहण्यालायक. संध्याकाळी आईकडे गेले आणि तिला फिश खायला घातले.

रवीवारी सकाळी मी फिश मार्केटातच सापडतो.

भ्रमर, कशासाठी फिश विकण्यासाठी की फिशच्या वाट्यात बसलेला असतोस ?

Pages