आमच्या मराठवाड्यात विशेषतः परभणी-बीड या भागात भुरका फार आवडीचा. शिळी भाकरी असो की रसाचे जेवण, भुरक्याचे एक बोट चाटले की जिभेवरचे सगळे शेवाळ गेलेच पाहिजे.नव्या घासाच्या नव्या चवीसाठी जीभपण नवी! या प्रकाराला काही ठिकाणी 'तळलेले तिखट ' असेही म्हणतात.
हा चटणीचा एक प्रकार आहे. करायला सोपा. तिकडे नुसते तिखट वापरून करतात. मी थोडा सौम्य करावा म्हणून थोडा बदल केला आहे.
वेळ : ५ ते ७ मिनिटे
साहित्य : पाव वाटी लाल तिखट
पाव वाटी पोहे
२ चमचे दाण्याचा कूट
लसूणपाकळ्या १०-१२
पाव वाटी तेल
जिरे-मोहरी-मीठ
कृती :
छोट्या कढईत तेल तापत ठेवा.
एका वाटीत तिखट आणि मीठ एकत्र करा.
तापलेल्या तेलात मोहरी जिरे टाका. मग सोलून पोह्यांसारखा चिरलेला लसूण टाका.
लसूण गुलाबी रंगाचा झाला की गॅस बंद करा. मग त्यात पोहे टाका. पोहे लगेच तळले जातील.
हे मिश्रण वाटीत ठेवलेल्या तिखटावर ओता. मग त्यात भाजलेल्या दाण्याचा कूट घाला. चांगले मिसळा. भुरका तयार.
८-१० दिवस ही चटणी छान टिकते. ब्रेड, पोळी, भाकरी, भात, पिझ्झा, सँडविच अशा वेगवेगळ्या प्रकारांसोबत खमंग लागते.
मस्त! खाल्लाय, बरेच दिवस
मस्त!
खाल्लाय, बरेच दिवस झाले. रेसिपी माहीत नव्हती. तू पोहे अॅड केले आहेस का?
हो लालू, पोहे मिसळले की मस्त
हो लालू, पोहे मिसळले की मस्त कुरकुरीत लागते चटणी. तिखटपणाही कमी होतो. आई- आजी मात्र आजही 'शुद्ध तिखटाची " करतात ही चटणी... आमच्या पुणेरी ध्यानाला झेपत नाही मग
तिखटाचे प्रमाण वाटीच्या मापात
तिखटाचे प्रमाण वाटीच्या मापात ? बाप रे सॉल्लिड दिसतेय रेसिपी! करून बघणार!
मैत्रेयी, आजच करून बघ आणि
मैत्रेयी, आजच करून बघ आणि उद्या घेऊन ये.
मस्त दिसतेय रेसिपी. उद्या
मस्त दिसतेय रेसिपी. उद्या मैत्रेयी करुन आणेल तेव्हा चव घ्यायला मिळेलच
रावण पिठल्यापेक्षा तिखटाचं प्रमाण कमी आहे तेव्हा करुन बघायला हरकत नाही.
सहीये गं. नक्की करून बघणार.
सहीये गं. नक्की करून बघणार.
माया. वेगळा छान प्रकार. (पण
माया. वेगळा छान प्रकार. (पण मला झेपणार नाही, कूट आणि पोहे, दोन्ही वाढवावे लागतील.)
त्या पेक्षा तिखट कमी करा
त्या पेक्षा तिखट कमी करा दिनेश ...
मस्त माया, मी पण करुन पाहीन म्हणते.
व्वा माया ..मस्त जहाल प्रकार
व्वा माया ..मस्त जहाल प्रकार आहे. करून पहाते.
ए........पुणेरी ध्यान कोण गं? (नाही म्हणजे रेसिपीतच उल्लेख आहे म्हणून विचारते!!!!!!!!!!)
मानुषी, पुणेरी ध्यान म्हणजे
मानुषी, पुणेरी ध्यान म्हणजे नवरा गं..त्याच्याकडे कमी तिखट खातात.. म्हणून अशी पोहे-कूट मिसळून हायब्रीड चटणी करावी लागते...
दिनेशदा तुम्ही या चटणीत तिखट कमी घाला. फोडणीत थोडे तीळ पण घाला. बाकी सगळे सेम. मस्त लागते तशीपण..
बाकी ही चटणी शिल्लक राहिली तर तयार असलेल्या भाजीत आमटीत खमंगपणा वाढवण्यासाठी वेगळी फोडणी न करता मिसळली तरी चालते.
मस्त रेसिपी गं माया! तोंपासु
मस्त रेसिपी गं माया! तोंपासु
वॉव.. अगदी आवडती रेसेपी आहे
वॉव.. अगदी आवडती रेसेपी आहे की ही. मी नेहेमी करते ही भुरका चटणी. सासरी भाजीत अगदी अर्धी मिरचीच घालावी लागते, सगळेच कमी तिखट खाणारे. त्यामूळे मी आपलं माझ्यासाठी भुरका, खरडा असलं करत असते नेहेमी.
मस्त आहे, एकदम झणझणीत... पण
मस्त आहे, एकदम झणझणीत... पण मलाही तिखट कमी करुन पोहे तीळ घालावे लागणार. अगदीच कमी तिखट खाते मी, नुसत वाचुनच डोळ्या-नाकातुन पाणी यायला लागले
नवीन माहिती कळली. माझे
नवीन माहिती कळली. माझे मेहुणे तिखट खातात त्यांना भाकरी व भुरका करून वाढीन नक्की.
यात हिरवे काहीच नाही. कढी पत्ता , कोथिंबीर? काही प्रॉब्लेम नाही. ऑथेंटिसीटी जाईल ते घातले तर.
मस्त जहाल प्रकार दिसतोय!
मस्त जहाल प्रकार दिसतोय! एकदा क्रुन बघायला हवा (अर्थात तिखट कमी घालुन) रच्याकने, मी साधारण अशाच प्रकारचे लसणीचे तिखट करते. कडकडीत तेलात मोहरी टाकायची. ती तडतडली की त्यात भरपुर लसुण (चिरुन) टाकायचा. लसुण गुलाबीसर झाला की त्यात १-२ चमचे तिखट टाकुन गॅस लगेच बंद करायचा. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकायची. यात तिखट जळायला नको पण तळले गेले पाहीजे. तिखटाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करावे. हे तेल मुगडाळ घालुन केलेल्या खिचडीबरोबर छान लागते.
वत्सला, अगदी सेम चवीचा भुरका
वत्सला, अगदी सेम चवीचा भुरका आहे हा.. तिखट जळू नये म्हणून कडकडीत तेल तिखटावर ओतायचे. बाकी मी पण कधीकधी कोथिंबीर घालते. पण ते तिखट लवकर संपवावे लागते.
आज केली ही भुरका चटणी . मस्त
आज केली ही भुरका चटणी . मस्त तिखट झालीये . थँक्स माया .
फस्क्लास चटणी. आज तुम्ही
फस्क्लास चटणी. आज तुम्ही दिलेल्या प्रमाणानुसार करून बघितली. ठणकामार तिखट, पण चवदार झाली.
पाककृतीसाठी धन्यवाद.
अगदी तोंडाला चव आली वाचुनच.
अगदी तोंडाला चव आली वाचुनच.
छान आहे..
छान आहे..
आजच खाल्ली भुरका चटणी.
आजच खाल्ली भुरका चटणी.
आम्ही नुसतं भुरका किंवा मीठ -भुरका असं म्हणतो
नेहमी होते माझ्याकडे, अर्थात तीळ घालून.
पोह्यांची आयडिया छान आहे