मासे ११) बांगडा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 July, 2010 - 03:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बांगडे ४-५
थोड ओल खोबर,
१ चमचा धणे,
३-४ तिरफला ठेचुन
७-८ लाल सुक्या मिरच्या
५-६ लसुण पाकळ्या
१ छोटा कांदा चिरुन
अर्धे हळकुंड
मिठ चविपुरते
थोडा चिंचेचा कोळ
तेल

क्रमवार पाककृती: 

बांगड्याला खवले नसतात त्यामुळे साफ करायला सोपे असतात. बांगड्याच्या कालवणासाठी पोटातील घाण काढायची, शेपुट व डोके काढून टाकायचे. बांगड्याचे दोन ते तिन तुकडे करायचे. तळण्यासाठी हवे असतील तर छोटे बांगडे पोटातील घाण व शेपुट काढून मध्ये मध्ये चिरा देउन ठेवायचे.

प्रथम ओल खोबर, कांदा, हळकुंड भिजवुन फोडून, धणे, लाल मिरच्या, लसुण घालुन वाटण करायचे. मग तेलावर ह्या वाटणाची फोडणी देउन ठेचलेले तिरफला, चिंचेचा कोळ(गरजे नुसार पाणी घालून) घालायचा एक उकळ आणायची नंतर त्यात वरुन बांगडे घालायचे, मिठ घालायचे व ३-४ मिनीटे उकळवुन गॅस बंद करायचा.

तळण्यासाठी बांगड्यांना आल लसुण पेस्ट, मसाला, हिंग, हळद, मिठ व थोडा चिंचेचा कोळ लावुन मुरवावेत मग बेसन किंवा रवा लावुन तळावेत.

वाढणी/प्रमाण: 
५ ते ६ जणांसाठी
अधिक टिपा: 

ह्यावर अधिक माहीती साधना देउ शकेल कारण बांगडे हे साधनाचे खास आहेत आणि तिच्या गावाला म्हणजे कोकणात बर्‍याच पद्धतीने केले जातात बांगडे. माझ्याकडे ३-४ मालवणी पद्धती आहेत. जर कोणाला हव्या असतील तर देईन.

धणे नसतील तर कोथिंबीर चालेल.
कोणतेही मासे ३ पाण्यातुन स्वच्छ दुवावेत कापल्यावर.
हळकुंड जरा आधीच भिजत घातले तर चांगले.
हळकुंड नसतील तर १/२ चमचा हळद चालेल पण ती चव येत नाही.

माहितीचा स्रोत: 
मालवणी पदार्थाचे पुस्तक. त्यात थोडी फेर फार करुन
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झावळी किंवा नारळ, कुणाच्याही डोक्यावर पडून इजा करत नाहीत, अशी
ठाम समजून आहे तिथे.

हो.. झावळी किंवा नारळ कधीही कोणाच्या डोक्यावर पडत नाहीत. नारळ पडला डोक्यावर तर तो माणुस थेट वरच जाईल...

असोल्या नारळाच्यावरचे आवरण काढणे ही एक कला आहे जी फक्त तिथल्या लोकांनाच जमते. असे असतानाही तिथले वानर मात्र झाडावरच्या नारळाला जिथे डोळे असतात त्या भागात पोखरुन आतले खोबरे खायचे आणि पाणी प्यायचे.. Happy

साधना मलाही नारळ सोलता आणि फोडता येतो. लहानपणापासुनच ह्या सगळ्या वातावरणात वाढले त्यामुळे आपोआपच आवड निर्माण होउन हे उद्योग यायला लागले. मला झाडूही काढता येतो नारळाच्या पात्यांचा. ताडगोळेही काढले आहेत मी पण त्यासाठी खुप कलाकुसर लागते. मला तेवढे सफाईदार नाही काढता आले.

होय आम्ही म्हणतोच की घरावर काही पीडा असेल तर आधी माड जळतो. आजी असेही म्हणते की माडची झापसुद्धा घरावर किंवा माणसावर पदायची नाही.

बांगड्याचे तिकले करताना आम्ही ओला नारळच वापरतो. वाटणात थोडासा कांदा पण घालतो धणे आणि मिरचीसोबत. आणि भिजवलेली तिरफळेही वाटायला घालतो (पण खूप मिरमिरीत होतं त्यामुळे, मला आवडते). हळदीच्या दिवसात हळदीचे पान आमटी उकळताना घालतात. (मला नाही आवडत).

बांगडा हा माझा मोस्ट फेव. मासा आहे. आठवणीनेही तों. पा. सु.! Happy

कोकणात माड असतं व्हय, आमच्याकडे ताड असतं. आमच्याघरी दोन ताड आहेत.

बांगडाssssssssssss वा वा

आज घरी जाताना अर्धा किलो घेऊनच जातो आता.

आज घरी जाताना अर्धा किलो घेऊनच जातो आता.

पुण्यात बांगडेही किलोच्या भावात मिळतात????

आमच्याकडे अजुनही नगानेच विकले जातात ...

बांगड्यांना तिरफळे मस्ट्च...

जाई मलाही हळदिच्या पानांचा वास खुप उग्र वाटतो.
मधुकर आमच्याकडे बांगडे काय कुठलीही मच्छी वाट्यावरच मिळते.

इथले वाचवाचुनच अश्विनी मासेहारी झाली की का??? किमान बांगडेहारी तरी.. अगदी 'तिरफळे मस्ट' हे वाचुन तिनेही लगेच अनुमोदन दिले.....

क्या बात है मॅडम???????

नाही गं. मी सांगितलं ना कोळीण बसलेली दिसली की मी ४ फुटांवरुन जाते. पण साधनाची खोडी काढायची हुकी आली म्हणून अगदी अगदी म्हटलं आणि मलाच हसू आलं की मी खाते काय (भाजीपाला)अन बोलतेय काय? Happy

माश्यांना जवळून न पहाता लिहिलेल्या रेसिपीज करुन खायची तयारी असेल तर टाकेन मनगढत पाकृ Proud

हो Biggrin

ए , टाईमपास पुरे आता . Wink
११ नवीन पोस्ट वाचून मला वाटले की कोणीतरी पाककृतीमध्ये " अमूल्य " माहिती दिली असावी , बघते तर काय ? ( डोक्याला हात लावलेली स्मायली . Wink )

मिन्वा, बांगडा फोटुत दिसतोय त्याच्यापेक्षाही मोठा असतो.. पुर्ण वाढलेला बांगडा साधारण ८-१० इंच लांब आणि दिड पावणेदोन इंच रुंद असा असतो. फोटोत आहेत ती पावसाळ्यातली पिल्ले आहेत.. Happy

इथे परत येणार नाही आता. गळणारी लाळ थांबवणे कठीण जाते. बांगडा माझा लाडका.. रविवारी आणु काय?? रु.१०० ची फोडणी घालतेच..

काल 'आम्ही सारे खवय्ये'चा एक एपिसोड पहात होते, त्यात गोव्याची कुरकुरीत तळलेल्या बांगड्यांची रेसेपी पाहिली. चांगली वाटली. त्या बाईंच्या मते गोव्याचेच बांगडे चवदार असतात. मुंबई, कोकणातल्या, मालवण वगैरे भागातल्या बांगड्यांना एवढी चव नसते. त्यांनी बांगडे तळण्यासाठी कसे कापावेत आणि त्याला कशा पध्दतीनं मसाला लावावा सांगितले होते.

बांगडा - फोटो दिसत नाहीत ग मला. इतकं वाईट वाटतं ना मग. एक तर खायला नाही नुसतं वाचायचं त्यात फोटो पण नाही. भ्यां ..........

Pages