मासे ११) बांगडा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 July, 2010 - 03:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बांगडे ४-५
थोड ओल खोबर,
१ चमचा धणे,
३-४ तिरफला ठेचुन
७-८ लाल सुक्या मिरच्या
५-६ लसुण पाकळ्या
१ छोटा कांदा चिरुन
अर्धे हळकुंड
मिठ चविपुरते
थोडा चिंचेचा कोळ
तेल

क्रमवार पाककृती: 

बांगड्याला खवले नसतात त्यामुळे साफ करायला सोपे असतात. बांगड्याच्या कालवणासाठी पोटातील घाण काढायची, शेपुट व डोके काढून टाकायचे. बांगड्याचे दोन ते तिन तुकडे करायचे. तळण्यासाठी हवे असतील तर छोटे बांगडे पोटातील घाण व शेपुट काढून मध्ये मध्ये चिरा देउन ठेवायचे.

प्रथम ओल खोबर, कांदा, हळकुंड भिजवुन फोडून, धणे, लाल मिरच्या, लसुण घालुन वाटण करायचे. मग तेलावर ह्या वाटणाची फोडणी देउन ठेचलेले तिरफला, चिंचेचा कोळ(गरजे नुसार पाणी घालून) घालायचा एक उकळ आणायची नंतर त्यात वरुन बांगडे घालायचे, मिठ घालायचे व ३-४ मिनीटे उकळवुन गॅस बंद करायचा.

तळण्यासाठी बांगड्यांना आल लसुण पेस्ट, मसाला, हिंग, हळद, मिठ व थोडा चिंचेचा कोळ लावुन मुरवावेत मग बेसन किंवा रवा लावुन तळावेत.

वाढणी/प्रमाण: 
५ ते ६ जणांसाठी
अधिक टिपा: 

ह्यावर अधिक माहीती साधना देउ शकेल कारण बांगडे हे साधनाचे खास आहेत आणि तिच्या गावाला म्हणजे कोकणात बर्‍याच पद्धतीने केले जातात बांगडे. माझ्याकडे ३-४ मालवणी पद्धती आहेत. जर कोणाला हव्या असतील तर देईन.

धणे नसतील तर कोथिंबीर चालेल.
कोणतेही मासे ३ पाण्यातुन स्वच्छ दुवावेत कापल्यावर.
हळकुंड जरा आधीच भिजत घातले तर चांगले.
हळकुंड नसतील तर १/२ चमचा हळद चालेल पण ती चव येत नाही.

माहितीचा स्रोत: 
मालवणी पदार्थाचे पुस्तक. त्यात थोडी फेर फार करुन
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुतन धन्स.
बी मच्छी च्या शौकीनांना नसतो चातुर्मास त्यांना ते सहन होत नाही. माझाही नसतो. अहो श्रावणात तर खरी छान भरपुर मच्छी येते.

जागवे, तू इतकी कट्टर मासेहारी आणि रानेहारी (रानभाज्या खातेस म्हणून रानेहारी) आहेस तर तुझी बुद्धी तीक्ष्ण असेल नाही!!!!!!! दिसतेचं ते इथे Happy

सुके खोबरे वापरता का ? मालवणला आणि गोव्याला ओले खोबरे.
गोव्याला छोट्या बांगड्याला, लाडाने बांगडूली म्हणतात. एकेकाळी
मालवणला, ५ रुपयाला १०० सुके बांगडे मिळायचे, (हो माझ्या
आठवणीत.)

साधना, बी Lol
एकेकाळी
मालवणला, ५ रुपयाला १०० सुके बांगडे मिळायचे, (हो माझ्या
आठवणीत.)

दिनेशदा आता परत साधनाचा जीव जळेल.

एकेकाळी
मालवणला, ५ रुपयाला १०० सुके बांगडे मिळायचे, (हो माझ्या
आठवणीत.)

कशाला जळवताय?? माझ्या लहानपणी वाडीला रुपयाला शेकडा मिळायचे बांगडे... (कहा गये वो दिन?????????????????). बाबांनी आणले की आई शेजारीपाजारी वाटायचा उद्योग करायची..

गेल्या आठवडयात १०० रुपयांना ६ बांगडे हा दर ऐकुन परतले.. Sad

जागु, आमच्याकडे मोरी (बेबी शार्क), खेकडा आणि शिवल्या ह्या तिनच मत्स्यप्रकारांना खोबरे भाजुन वापरतात. सुके खोबरे तर अगदीच वर्ज्य. बाकी सगळे मासे नारळ अगदी ताजा ताजा फोडुनच...
तुझ्या पद्धतीने गेल्या रविवारी बोईट केलेले, तेही आवडले मला. पण बांगड्यासाठी मात्र ओले खोबरेच हवे.... आता आणायला हवेत बांगडे. ५० रुपयांचे तीनतरी घेऊन येईन..

बांगड्यांचे अनेक प्रकार गोव्यात करतात..

मच्छी च्या शौकीनांना नसतो चातुर्मास त्यांना ते सहन होत नाही

Happy माझ्या माहेरी शेजारी कोळी राहात. ते श्रावणात चिकन मटण वर्ज्य करत. मासे मात्र खात असत.

साधना मी केले तेंव्हा माझ्याकडे ओले खोबरे नव्हते. म्हणून मी सुके टाकले आणि तिच रेसिपी इथे उतरली. पण तु म्हणतेस ते बरोबर आहे ह्याच्याआधी मी ओल्या खोबर्‍यानेच केले आहे कालवण. मी रेसिपीत बदल करते.
म्हणुनच मी टिपेत टाकलय साधना जास्त सांगेल. दिनेशदांनीही सांगितलय. धन्स.

माझ्या कोळी मैत्रिणीकडे १० दिवस गणपती असतो,आणि जेवण म्हणुन मासे,ते पण पापलेट,सुरमई,कोळंबी.
आईग्,,,आम्हि खास जेवायला उरणला जायचो तिच्याकडे,कधी एकदा गणपतीचं दर्शन होतय आणि जेवतोय असं व्हायचं. Happy

जागू, बांगडे साफ करायच्या आधी त्यांना आधी थोडा वेळ मीठ वा चिंचेचा कोळ लावून ठेवत नाहीस का, त्यांची हिंवसाण जावी म्हणून?

शैलजा तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी यापुढे करेन. मी तळण्यापुर्वी करते असे. खर तर ही मालवणी पद्धत आहे. आमच्याकडे फक्त आल, लसूण, मिरची कोथिंबीर, ओल खोबर च वाटण आणि चिंच, मसाला मिठ घालुन करतात. पण मी वरील पद्धतीच पुस्तकात वाचुन केल आहे.

तू हे करतेस ना?

बांगड्याच्या कालवणासाठी पोटातील घाण काढायची, शेपुट व डोके काढून टाकायचे. बांगड्याचे दोन ते तिन तुकडे करायचे. तळण्यासाठी हवे असतील तर छोटे बांगडे पोटातील घाण व शेपुट काढून मध्ये मध्ये चिरा देउन ठेवायचे.

त्यानंतर थोडा वेळ मीठ वा चिंचेचा कोळ लावून ठेवायचे. मग धुवून घ्यायचे, म्हणजे मग त्यांचा वास येत नाही. बांगड्यांना एक प्रकारचा वास असतो, तो निघून जातो मीठ वा कोळ लावल्याने. तू लिहिले नाहीस म्हणून विचारले. Happy मालवणीच असे नाही, एकूणच कोकण, गोवा बा़जूला असेच बनवतात.

मग त्यांची आमटी करणार असशील तर तू लिहिलेले वाटण वगैरे.

गोव्यात बांगडा कोळशावर भाजून त्यात कच्चा कांदा, ओलं खोबरं, भरपूर कोथंबीर आणि वरून खोबर्‍याचं तेल घालून केलेला एक प्रकार बघितला होता. बरोबर असलेल्या जनतेने आवडीनं खाल्ला होता.

अंजली, सुक्या बांगड्याचा हा प्रकार करतात. खोबरं, कोथिंबीर नसली तरी चालते अर्थात.. पण अगदी भन्नाट लागतो. मी सुका बांगडा भाजुन त्यात मग साफ करुन त्याचे मास कुसकरुन घेते आणि मग त्याच्यात मिरची पुड आणि खोबरे तेल घालते. आहा.... काय फर्मास लागते...

बांगड्यांना जरासा वास येतो त्यामुळे शैलजा म्हणते तसे मिठ लावुन ठेवावे लागते.

अंजली त्याला बहुतेस बांगड्याचे तिसमुर म्हणतात. माझ्याकडे रेसिपी आहे मी उद्या टाकते.

बांगडे!!!!! माझे अत्यंत आवडते मासे. Happy

जेजे हॉस्पिटलच्या स्टाफ कँटीनमधे बांगड्याची आमटी मिळते. असली सही असते. तिथे काम करणारी माझी मैत्रीण आमच्यासाठी घेऊन यायची. अक्षरशः मारामारी व्हायची आमच्यामधे!!

या ओल्या सुक्य़ा खोबऱ्याची गंमत आहे. पूर्वी घाटावर ओला नारळ मिळायचाच नाही.
(माझी मावशी म्हणते, म्हणून तर देवाला नारळ द्यायचे अप्रूप होते.) सुक्या खोबऱ्याची
मोठी बाजारपेठ राजापुरला होती. तिथून तो व्यापारी, कोल्हापूरला आणत. त्यामूळे
कोल्हापुरी मसाल्यात सुक्या खोबऱ्याचा वापर असतो. पण एकदा त्या मसाल्यात ते
वापरले, कि परत रोज भाजी आमटीत वापरायची गरज नसते. (आता तर मी
नारळाची झाडे, राहुरीला (नगर) पण बघितली.)
माझ्या आजोळी, नारळाचे उंच वाढलेले झाड आहे आणि त्याला नारळ पण भरपूर
लागतात, पण ते काढायला कुणी माणूस मिळत नाही.
ओल्या नारळाचा, माश्याबरोबर संयोग, आहारच्या दृष्टीने पण योग्य आहे. तसेच
नारळाबरोबर, कढीपत्ता व तिरफ़ळे, वापरल्याने, त्यापासून कमी अपाय होतो.
राजापुरला पूर्वापार सुके खोबरे वापरायची पद्धत आहे, पण मालवण आणि खाली
गोव्याकडे, मात्र ते अभावानेच वापरतात. नारळ किती बारीक वाटायचा, त्याचे
मानक पण मालवणला, दबदबीत आणि गोव्याला गंधासारखे, असे आहे.
मालवण आणि गोव्याला नवीन घर घेताना, माड किती, हा एक महत्वाचा
मुद्दा असतो. गोव्यातील महिलांच्या जेवणाची, सुरवात नारळ फ़ोडणे, यापासूनच
होते. सगळ्यात ओले खोबरे असतेच, त्यामुळे, कोकम कढी मात्र, बिननारळाची
जास्त केली जाते.
नासिक भागात तर, शेंगदाण्यावर भर असतो. कांदाही असतोच. आता या सीमारेषा
पुसट झाल्यात.

मालवण आणि गोव्याला नवीन घर घेताना, माड किती, हा एक महत्वाचा
मुद्दा असतो.>>>> हो, इथे रत्नागिरीत सुद्धा "स्वतःचे घर" आहे असं म्हटलं की पुढचा प्रश्न माड किती असा हमखास असतो. आमच्याकडे चार माड!! Happy

जागू, तुमच्या मासे आणि रानभाज्या दोन्ही माहितीपूर्ण. आणि रेस्प्या पण झकास! भारतात आल्यावर तुमच्याकडे मासे खायला चक्कर टाकीन म्हणते Happy
दिनेशदा, माझ्या माहेरी (पुण्याला) पण ३ नारळाची झाडे आहेत. पण माणूस मिळत नाही नारळ काढायला तिथे पण. जे झाड गेटच्या जवळ (रस्त्याला फेसिंग) आहे, त्याला सगळ्यात जास्त नारळ लागायचे. रस्त्यावर आम्ही सगळी मुलं खेळत असू म्हणून ते झाड जास्त आनंदी आहे, म्हणून त्याला जास्त नारळ लागतात असं माझी आजी म्हणायची.

राखी खुप खुप धन्यवाद.

रस्त्यावर आम्ही सगळी मुलं खेळत असू म्हणून ते झाड जास्त आनंदी आहे, म्हणून त्याला जास्त नारळ लागतात असं माझी आजी म्हणायची.

राखी तुझ हे आजीच वाक्य खुप आवडल.

नंदिनी, हे माड; ते "माड आल्येत" मधल्ये माड तर नाहित ना ?

दिनेशदा, सुंदर माहिती. खाद्यसंस्कृती ह्या शब्दाची व्याप्ती हळूहळू लक्षात येत्येय...

<<<मोठी बाजारपेठ राजापुरला होती<<
अच्छा, म्हणुन खोबरं घ्यावं तर राजापुरचं अस म्हणतात वाटतं! राजापुरी खोबरं काळ्या पाठीचं आणि भरपुर तेलाचं असतं ना?

<<नासिक भागात तर, शेंगदाण्यावर भर असतो<< अगदी अगदी दिनेशदा. नासिकच काय जळगाव जिल्हा, धुळे नंदुरबार शेंगदाणा कुट टाकुनच भाज्या अस्तात. जळगाव ला हॉस्टेलला अस्तांना मी मेथी, पालकसारख्या पालेभाज्या ही दाण्याचा कुट/ मिरच्या (ओला) लावुन केलेल्या खाल्ल्यात.

जागू, विषयांतराबद्दल क्षमा असावी.

कोकणात माडाबद्दल बरीच आपुलकी असते. तिथला कल्पवृक्षच आहे तो.
काथ्या, झापा, घराचे वासे, होडी साठी, वगैरे अनेक उपयोग आहेत त्याचे.
झावळी किंवा नारळ, कुणाच्याही डोक्यावर पडून इजा करत नाहीत, अशी
ठाम समजून आहे तिथे.
वादळवाऱ्यात माड पडला, तर जीव हळहळतो तिथल्या लोकांचा, पण त्या
पडलेल्या माडाच्या टोकाशी असणाऱ्या बुंध्याचा कोवळा, भाग पण अप्रुपाने
खाल्ला जातो.
गोव्यात, गणपतिच्या उंदराला, आमच्या माडाला इजा करु नको, म्हणून
खास गाऱ्हाणे घातले जाते.

Pages