युनिक्स/लिनक्स सर्टिफिकेशन

Submitted by रंगासेठ on 26 July, 2010 - 07:59

नमस्कार, मी सध्या युनिक्स/लिनक्स सर्टिफिकेशन करण्याच्या विचारात आहे. यासाठी मदत हवीय.
मी याआधी कुठलेही सर्टिफिकेशन केले नाहीय, पण जॉब मार्केट मध्ये सर्टिफिकेशनला मागणी आहे व मी युनिक्स वर काम करतोय म्हणून यात एखादे सर्टिफिकेशन करावे असे ठरवलेय. मूळ हेतू हा आहे की युनिक्स/लिनक्स बद्दल आणखीण माहिती करून घेणे जेणेकरून कामात फायदा होईल व सर्टिफिकेशन केल्याने जॉब मार्केट मध्ये भाव वाढू शकेल. Happy

१) सध्या सोलारिसचे "SCSA" आणि रेडहॅटचे "RHCE" सर्टिफिकेशन उपलब्ध आहेत. यात उजवं-डावं कसे ठरवायचे? का दोन्ही चांगले आहेत? यात पण अ‍ॅडव्हान्स लेवल्स असतीलच.
२) अशा सर्टिफिकेशन साठी पुण्यात कुठे क्लासेस आहेत काय? का फक्त ब्राउशर घेऊन स्वतःच्या रिस्क वर सर्टिफिकेशन करायच?

याबद्दल आणखीण माहिती असेल तर कृपया नक्की प्रतिसाद द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगासेठ नमस्कार,
पहिले म्हणजे एखादा टेक्-फोरम जॉईन करा, आणि तिकडे माहिती विचारा. मायबोली मध्ये टेक्निकल डीटेल्स जास्त मिळतीलच अस नाही. मी सध्या जावाचे सर्टिफिकेशन करतोय, त्यासाठी जावारँच नावाचा बेस्ट फोरम आहे.

फक्त ब्राउशर घेऊन स्वतःच्या रिस्क वर सर्टिफिकेशन करायच?>>>
माझा तर हाच मार्ग आहे, मी प्रथम फोरमवरुन माहिती घेऊन, e.g., books, mock-exam, etc. विकत घेतली आणि preparation केले.

तसच डम्पपण मिळतील पण त्याचा फायदा फक्त exam passing पुरता, ईंटरव्युमध्ये टाय टाय फिश Wink

तुम्हाला ऑल-द-बेस्ट !!!

रेडहॅटचे "RHCE" सर्टिफिकेशन करण्यासाठी पुण्यात शेतकी कॉलेजपाशी एक इन्स्टिट्यूट आहे. नाव विसरले. दर्जा काही खास वाटला नव्हता.

धन्यवाद सर्वांना Happy
गौतम, तुम्ही म्हणताय तसं एखादं टेक-फोरम जॉइन करीन.

अभि_नव, लिंक बद्दल धन्यवाद.

युनिक्सवर आपण काय काम करता हे कळाले तर प्रतिसाद देणे सोपे राहील.....

गौतमला अनुमोदन.....

सर्टीफिकेशन डम्प्सच्या आधारे होवु शकेल परंतु माहीती आणी त्याद्वारे ज्ञान मिळविण्यासाठी अर्थातच अभ्यासाची आवश्यकता आहे.....

रेडहॅट साठी एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश (काही प्रमाणात प्रात्यक्षीक माहीती मिळवण्यासाठी) + सिबीटी - कॉम्पुटर बेस्ड ट्रेनिंग (अगदी बेसीक्स पासुन उत्तम माहीती मिळविण्यासाठी) हा पर्याय वापरु शकता....

SCSA बद्द्ल लवकरच कळवेल....

तोपर्यंत लिनक्स वरील कुठल्याही प्रकारच्या माहीतीसाठी अतीशय उत्तम असा एक फोरम

http://www.linuxquestions.org/

स्पेसीफीक लि़ंक - http://www.linuxquestions.org/questions/linux-newbie-8/rhce-235661/

ऑर्कूट कम्युनीटीज सुद्धा अश्या माहीतीसाठी फार उपयुक्त जागा आहे.....

चिमणराव, मी पहिली दोन वर्ष थोडसं स्क्रिप्टिंग केलय आणि नंतरची २ वर्षं साधं युनिक्स फाइल्स मध्ये डेटा एंट्री सारखं काम करतोय :-(, नुसतं या अनुभवावर, बाहेर कुणी विचारत नाहीयेत.
हे सर्टीफिकेशन करण्याचा हेतू म्हणजे आधिकाधिक माहिती मिळवण, घरच्या लॅपटॉपवर प्रॅक्टिस करत प्रॅक्टिकलचा अनुभव घेणं इ. आहे.

रंगासेठ,
अहो पण सध्या युनिक्स वाल्यांना डीमांड तर आहेच..
मी ३ वर्षापुर्वी २ वर्षे काम केलय पण आता जास्त आठवत नाही ..

रंगासेठ,

तुम्ही सर्टिफिकेशन ला मागणी आहे म्हणता पण तुमचा अनुभव नसेल तर नुसत्या सर्टिफिकेशन चा जॉब मार्केट मधे फारसा उपयोग होत नाही. दोन समान उमेदवार असतील तर सर्टिफिकेशन वाल्याला प्राधान्य मिळते एवढेच.

मी सजेस्ट करेन की हा नुसता डेटा एंट्री चा जॉब असेल तर इथेच स्क्रिप्टिंग मधे चान्स मिळतो का पहा किंवा मग दुसरा एखादा स्क्रिप्टिंगचा जॉब (थोड्या कमी पगारावर मिळाला तरी) पहा. एकदा अनुभव मिळत गेला की तुम्हाला सर्टिफिकेशन सोपे होइलच वर जॉब मार्केट मधे तुम्ही जास्त सेलेबल व्हाल.

जर सर्टिफिकेशन करायच नक्की केले असेल तर सीड इन्फोटेक किंवा अशा ठिकाणाहुन करा जिथे तुम्हाला प्लेसमेंट साठी मदत करतात.

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

>>इथेच स्क्रिप्टिंग मधे चान्स मिळतो का पहा किंवा मग दुसरा एखादा स्क्रिप्टिंगचा जॉब (थोड्या कमी पगारावर मिळाला तरी) पहा. एकदा अनुभव मिळत गेला की तुम्हाला सर्टिफिकेशन सोपे होइलच वर जॉब मार्केट मधे तुम्ही जास्त सेलेबल व्हाल.<< बरोबर, तसं आहेच, थोडसं स्क्रिप्टिंग करतोयच.

पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. Happy प्रगती कळवेनच.