१ वाटी मूग डाळ (पिवळी)
१ मध्यम कांदा
३-४ लसुण पाकळ्या
२-३ हिरवी मिरच्या
१ च.च. काळा मसाला
१-१.५ वाटी आधणाचे पाणी
चवीपुरते मीठ
फोडणी करता तेल, मोहरी, जीरे, हळद
वरुन घालण्यासाठी कोथिंबीर
मूग डाळ धुऊन १५-२० मिनीट भिजत ठेवावी. कांदा नेहमीप्रमाणे चौकोनी चिरून घ्यावा. लसुण आणि हिरवी चिरुन घ्यावी. कढइत नेहमी पेक्शा थोडे जास्त तेलात जीरे, मोहरीचे फोडणी करावी. त्यात लसुण, हिरवी मिरची घालुन परतावे. लसुण सोनेरि रंगावर आला की त्यात चिरलेला कांदा घालुन परतावे. कांदा मऊ झाला कि हळद घालुन त्यावर भिजवलेली मुग डाळ घालून २ मिन परतावे.
कढइत आधणाचे पाणी आणि चवीपुरते मीठ घालून वरुन झाकण ठेवावे. डाळ मध्यम आचेवर पाणी पुर्णपणे आटे तोवर शिजवावी. डाळ शिजल्यावर वरुन काळा मसाला आणि भरपूर कोथिंबीर घालून वाढावे.
१. ही डाळ करताना पाण्याचे योग्य प्रमाण जमणे फार मह्त्वाचे आहे, नाहितर पार गचका होतो डाळीचा.
मी करताना आधि अर्धेच पाणि घालते आणि नंतर लागेल तसे पाणि टाकत जाते. डाळ चांगली शिजलेली तर हवी पण गचका नको व्हायला.
२. ही डाळ वरून कच्चे तेल, बरोबर ज्वारिची भाकरी/फुलके, ताकाची कढी, आंब्याचे लोणचे आणि कोबिची पचडी म्हणजे अगदी.... आहाहा.......
छान आहे प्रकार! आता करूनच
छान आहे प्रकार! आता करूनच बघते!
माझ्या ऑफिसमधले गुजरथी जैन
माझ्या ऑफिसमधले गुजरथी जैन लोक पण आणतात असली कोरडी डाळ. पण त्यात कांदा मिरची नसते. पण सुकी मिरची पवडर असते. छान लागते ति सुध्धा.
मला प्रचंड आवडतो ह प्रकार. हे
मला प्रचंड आवडतो ह प्रकार. हे मी एकदा तुरीच्या डाळीचे केले होते.
पियु मी टोमॅटोही टाकते. तुझी
पियु मी टोमॅटोही टाकते. तुझी रेसिपी छानच.
अशीच मसुराची डाळ पण करतात.
अशीच मसुराची डाळ पण करतात. आईकडे मुगाची अन मसुराची कोरडी डाळ नेहेमी होते.
इकडे सासरी सगळ्यांनाच गच्च गिलका झालेल्या डाळी अन भाज्या खायची सवय आहे, एकदोनदा ही डाळ केल्यावर अजून शिजायला हवी होती, कच्ची वाटतेय असं ऐकायला मिळाल्याने आमच्या घरी करणं बंद केलं मी. केलीच तर एकटीपुरती करते.
अरे वा, मी प्रतिसाद बघितलेच
अरे वा, मी प्रतिसाद बघितलेच नव्हते ईथले.
अरुंधती, करून बघितलीस की नाही?
वृषा, तुरीच्या डाळीच्या या प्रकाराला 'कचके' म्हणतात आमच्याकडे.
जागू, टोमॅटो टाकून नाही केली मी कधी. करून बघायला हवी. टोमॅटो तेलावर परतायचे की पाणि घातल्यानंतर टाकायचेत?
अल्पना, मसूरची डाळ छानच लागत असेल. पुढच्यावेळी मसूर डाळ वापरून करणार मी.