३/४ कप मैदा ( सेल्फरायजिंग )
१/२ टीस्पून बेकिंग सोडा (सेल्फरायजिंग मैदा वापरल्यास आवश्यकता नाही.)
१/४ टीस्पून बेकिंग पावडर (सेल्फरायजिंग मैदा वापरल्यास आवश्यकता नाही.)
१/२ टीस्पून मीठ (मूठभर खारवलेले बदामतुकडे घातल्यास मीठ नको.)
१/२ कप बटर किंवा मार्गारीन (खोलीच्या तापमानाला आणून, मऊ करून)
१/२ कप पीनट बटर. (क्रंची नको)
१/२ कप साखर
१/२ कप ब्राउन शुगर
१ अंडं
१ टीस्पून व्हॅनिला अर्क
१ कप क्विक कुकिंग ओट्स
* एका मोठ्या भांड्यात साखर सोडून सगळे कोरडे घटक एकत्र करावे.
*वेगळ्या भांड्यात बटर, पीनट्बटर, अर्क, अंडं आणि साखर व्यवस्थीत एकत्र करावं. फार फेसत बसावं लागंत नाही.
* कोरडे घटक या मिश्रणात घालून नीट ढवळून एकत्र करावे.
* तेलाच्या हाताने झकास लाडू वळून हलका दाब देऊन कुक्या कराव्या.
*३५० डिग्री फॅ. ला ओव्हनमधे १० मिनिटं बेक कराव्या.
*चॉकलेट चिप्स घालता येतात.
* चमचाभर ओटमील कमी करून त्याऐवजी बदामाचा ओबडधोबड चुरा घालून चांगली चव येते.
फोटो बघून तोंडाला पाणी
फोटो बघून तोंडाला पाणी सुटतयं.
माझ्याकडे 'ब्राउन शुगर' नाही.
(दुकानात विचारलं तर त्यांनी दाऊद कडे चौकशी करण्याचा सल्ला दिला. :अरेरे:)
नाहीतर मी पण पीनट्बटर-ओटमील कुकीज बनविला असता.
वा! काय सुंदर दिसतायेत.
वा! काय सुंदर दिसतायेत.
रैना, मुटेजी धन्यवाद! मुटेजी,
रैना, मुटेजी धन्यवाद!
मुटेजी, हरकत नाही. ब्राउनशुगरशिवाय करा.
यम्मी ... बघुनच सही वाटतयं.
यम्मी ... बघुनच सही वाटतयं. नक्की करुन बघेन.
सहीच. पीनट बटर खपवते आता.
सहीच. पीनट बटर खपवते आता. नाही तर भारतात जाताना एका मैत्रिणीसाठी नेणार होते
कसल्या मस्त दिसताहेत ग!!
कसल्या मस्त दिसताहेत ग!!
मृण्मयी, वा! काय दिसताहेत!
मृण्मयी, वा! काय दिसताहेत! सध्या आम्ही रोज ओटमील कूकीज् च खातो, पण विकतच्या. एक सांग, पीनट बटर ला काही पर्याय? का साधं बटरच वाढवावे, चव बहुतेक थोडी वेगळी लागेल ना!
मृ, मी काल केल्या ह्या कुकीज.
मृ, मी काल केल्या ह्या कुकीज. मस्त झाल्या
मी पिठात कोको पावडरपण घातली. सगळं मिश्रण ढवळून झाल्यावर चॉकलेटचिप्स पण घातले.
दोन्ही कूकीज छान दिसताहेत. मी
दोन्ही कूकीज छान दिसताहेत. मी नुसता कोको घालून केल्या होत्या. आता अश्या पण करीन
गंगाधर, demerara sugar विचारा, मुम्बईत मला D-Mart मधे मिळाली Blue Bird brand
ह्या विकेंडला परत केल्या ह्या
ह्या विकेंडला परत केल्या ह्या कुक्या. आमच्याकडे हिट आहेत एकदम.
राखी, कुकीज भारी
राखी, कुकीज भारी दिस्ताहेत!
सुजाताच्या मल्टीग्रेन कणकेच्या, स्मार्ट बॅलन्स बटर सबस्टिट्यूट वापरून केलेल्या कुक्या झकास होतात. त्यामुळे आता सेल्फरायझिंग मैदा, बटर सगळं बंद झालं.