अतुल्य! भारत भाग - ७ : आग्रा

Submitted by मार्को पोलो on 1 July, 2010 - 04:37

चिरंतन प्रेमाचे प्रतिक ताज महल,
सौंदर्याचे प्रतिक ताज महल,
मानवनिर्मित सर्वश्रेष्ठ कलाकृती ताज महल,
जगातील सात आश्चर्यापैकी एक ताज महल,
प्रेमात पडल्यावर असे काहीबाही विचार मनात येतात. काही वर्षांपुर्वी जेव्हा मी हिच्या प्रेमात पडलो होतो (डोक्यावर, असे लोक सांगतात. मला नीटसे आठवत नाही) तेव्हा मलाही असे काहिसे वाटायचे. त्यामुळे राजस्थानच्या ट्रिप वरुन परत येता येता ताज महल पहायचे ठरविले.
ताज महल यमुनेच्या तिरावर स्थित आहे. ताज महाल मोगल सम्राट शहाजहांन ने त्याच्या आवडत्या राणी मुमताझ महल ची आठवण म्हणून बांधला. (मी का ही बडबड करतो आहे. सर्वांना माहित आहे हे) ह्याचे बांधकाम १६३२ ला सुरू झाले आणी १६५३ ला पुर्ण झाले. हा पुर्णपणे संगमरवरात बनला असुन ह्यासाठी लागणारा दगड राजस्थानातुन आणण्यात आला होता.
टिप १ : शुक्रवारी ताज महल बंद असतो. दिल्लीतील कार वाले ही माहीती तुम्हाला सांगत नाहीत कारण त्यांचे भाडे बुडते.
टिप २ : ताज महल बघुन बाहेर आल्यावर खुप जणांना ताज महल ची प्रतिकृती घेण्याचा मोह अनावर होतो. ईथे जर का तुम्ही दुकानात शिरुन भाव करायला सुरुवात केलीत आणी जर का तुम्ही मागत असलेला भाव दुकानदाराला पटला नाही तर त्याच दुकानदाराचा एखादा लहान मुलगा तुम्हाला मागुन येऊन धक्का मारतो आणी ती प्रतिकृती तुमच्या हातुन खाली पडुन फुटते आणी झक मारत त्याची दुकानदार मागेल ती किंमत तुम्हाला द्यावी लागते. त्यामुळे"खाया पिया कुछ नही, ग्लास तोडा बारा आना" अशी तुमची गत होते. तेव्हा सावधान.

प्रवेशद्वार

-
-
-
ताज महल

-
-
-
एक प्रयत्न

-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-

संगमरवराची जाळी

-
-
-


-
-
-

ताज महल ची मागील बाजू

-
-
-


-
-
-
मिनाराचा क्लोज अप

-
-
-


-
-
-

-
-
-


-
-
-

ताज महलचे प्रवेशद्वार, आतल्या बाजूने...

-
-
-

यमुना


-
-
-

आग्र्याचा किल्ला:
हा किल्ला "लाल किल्ला" म्हणून पण ओळखला जातो. हा भुईकोट किल्ला आहे. हा ताज महल पासुन २.५ किमी लांब आहे. हा किल्ला ९४ एकरांवर बनलेला असुन तटबंदिची ऊंची ७० फूट आहे. हा किल्ला लाल दगडापासुन (Red Sandstone) बनलेला आहे. ही एके काळी हिंदुस्तानाची राजधानी होती. हुमायुन, अकबर, जहांगीर, शाह जहांन आणी औरंगजेबाने येथे राहुन हिंदुस्तानावर राज्य केले.

प्रवेशद्वार

-
-
-


-
-
-


-
-
-

प्रवेशद्वाराचा पॅनोरमा

-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-


-
-
-
किल्ल्यावरून दिसणारा यमुनेच्या तिरावरील ताज महल

-
-
-
सिकंदरा:
सिकंदरा येथे अकबराचे थडगे आहे. सिकंदरा आग्र्यापासुन ६ किमी वर आहे. ह्याचे बांधकाम अकबराने ईसवीसन १६०० मध्ये सुरु केले आणी अकबराचा मुलगा जहांगीर ह्याने ते १६१३ मध्ये पुर्ण केले.


-
-
-


-
-
-


-
-
-

ईस्माइल प्लिज... Happy

-
-
-
-------------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः

आगामी आकर्षण - राजस्थान (उदयपुर, चित्तोडगढ़)
टिप : राजस्थान हा भाग बराच मोठा असल्यामुळे २-३ भागांत विभागुन प्रदर्शित करणार आहे.

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 

चंदन, लाजवाब.. आजपर्यंत मी कधी ताजमहल पाहीला नाही पण आता भरभरून पाहीला रे. खरचं प्रतिताजमहाल होणे अशक्य. !

तिसरा फोटो तर क्लास !

इन्शाअल्लाह ! ये मोहब्बत तो खुदाई से भी बढकर है,
खुदा भी देख के हैरान, धरती पे स्वर्गसी येह कोनसी जगह है..

लै भारी!

मागच्या वर्षी मी अन चंपी ने केलेली ताजमहल वारी ची आठवण आली. धन्यवाद.

एका वारीने मग भरले नाही. पुन्हा जाणार आहोत! Happy
____

दिल्ली-आग्रा प्रवासात ढाब्यावर मोल्-भाव करुनच माल घ्यावा- कंडक्टर ने दिलेली सुचना. मी रोटी, पराठा, पाणी बाटली ची किंमत विचारली, पण एक छोटी वाटी दही कितीला? हे विचारायचे विसरलो. त्याची किंमत सर्वात जास्त लावली Happy म्हणे यु. पी. त दही टंचाई आहे! मथुरे शेजारी Happy

बस ने गेलात, तर बसवाला ढाब्यावर दोन तास अन ताजमहल ला ४५ मिनिटे थांबवतो फक्त. खाजगी गाडी नेणे उत्तम.

बसवाला एका 'राजस्थली' एम्पोरीयम समोर गाडी नेतो. या राजस्थली चा राजस्थान सरकारच्या 'राजस्थली' शी संबंध नाही.(सरफरोश वाले!:) ) मला हे आतील एका सेल्स गर्ल शी बोलताना लक्षात आले, अन मग आम्ही खरेदी थोडक्यात उरकली. मोठ्या वस्तु असतील तर ५०% अ‍ॅडव्हान्स द्या अन मग वस्तु कुरियर ने पाठवु मग्च ५०% नंतर व्हीपीपी ने द्या, असे सांगितले जाते. त्यावर विश्वास ठेवु नका. ही ही माहिती एका सेल्स गर्ल चीच! (मी तिला फक्त ह्या दुकानाचा राजस्थान सरकार च्या-राजस्थली शी काय संबंध एवढेच विचारले, ती हसली, अन मग हे सगळे सांगितले.)
_____
ताज अप्रतीम आहे, पण ज्या प्रदेशात आहे, तो कु-वर्णनीय आहे! Sad प्रवासात खुप काळजी घ्या.

नेहमी प्रमाणेच जबरी फोटो...

ताजमहाल काय किंवा लालमहाल काय .. आतून पण किती व्यवस्थित ठेवले आहेत.. नाहीतर इकडची काही चांगली ऐतिहासिक ठिकाणे आत गेल्यावर सगळीकडे नुसते तण वाढलेले असतात.. Sad

मस्त Happy

ताजमहालचे एकढ्या वेगळ्या कोनातून फोटो कधी बघितलेच नव्हते. एक एक रुपरंग छानच टिपलेय. यापूर्वी खुप लांबून घेतलेले फोटोच केवळ बघितले असल्याने, त्याचा भव्यपणा आधी कधी जाणवलाच नव्हता. (दिल्लीच्या आठ दहा वार्‍या केलेल्या असूनही, मी ताजमहाल अजून बघितलेला नाही.)

अप्रतिम फोटो ... (पंजाब/दिल्लीची सगळी कसर भरुन काढलिस Happy )

अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम.........
अगदी नेहमी प्रमाणे खुपच छान. फोटों मधुन भारत दर्षण होत आहे. पुढचा पार्ट पण लवकर येऊ द्या.

अप्रतिम फोटो.
हे सगळं कधी बघायला मिळणार ह्याची चुटपुट वाटायला लागलीये. राजस्थानच्या वर्णनाची नी फोटोंची वाट बघतेय आतुरतेने.

फोटो खासच! मी दिल्लीवारीत ताजमहाल खूप घाईघाईत पाहिला होता, अजिबात मजा नाही आली! आणि आग्र्याचा किल्ला भर रणरणत्या उन्हात पाहिला.... तिथे सारा वेळ सावली आणि गारवा शोधण्यात गेला! शिवाय का कोण जाणे, दोन्ही ठिकाणी चीयरफुल्ल नाही वाटले! पण आज हे फोटो पाहताना मजा आली! थँक्स! Happy

चंदन फोटो बघताच नकळत उद्गार आले "व्वाह!!!!!
शब्दच नाही तुझं कौतुक करायला. मी स्तब्ध झालोय हे सौंदर्य पाहुन.
खरंच डोळ्याचं पारण फेडलस मित्रा. खुप खुप धन्यवाद!!!!!

फोटो पाहुन अनिल भारती यांचे गजानन वाटवे यांनी गायलेले गीत आठवले

बादशहाच्या अमर प्रीतिचे
मंदिर एक विशाल
यमुनाकाठी ताजमहाल

मूर्तिमंत झोपली प्रीत अन्‌
मृत्यूचे ओढून पांघरुण
जीवन कसले महाकाव्य ते
गाईल जग चिरकाल

नि:शब्द शांती अवतीभवती
हिरे जडविले थडग्यावरती
एकच पणती पावित्र्याची
जळते येथ खुशाल

हळूच या रसिकांनो येथे
नका वाजवू पाऊल ते
दिव्य दृष्टिला होईल तुमच्या
मंगल साक्षात्कार

मस्त फोटोज !!
हे तुमच्या परंपरेला साजेसे फोटो ! Happy

राजस्थानच्या फोटोंची वाट पाहतीय! ( कदाचित मलाही झब्बू देता येईल त्याला! Happy )

चंदन लाजवाब. ताजमहालचे फोटो बघून पुढे काही बघूच नये असं वाटलं, पण नाही लाल किल्ला आणि सिकंदराचे फोटोही सहीच. रच्याकने, तिसर्‍या फोटोत कसला प्रयत्न केलायत? छान आहे.

माबोकर मंडळी,
सुंदर, सुंदर प्रतिसादांबद्दल शतशः धन्यवाद.
शुभंकरोती,
तुझा झब्बू अफलातून आहे.

Pages

Back to top