Submitted by मृण्मयी on 9 June, 2008 - 19:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी कडधान्य (मुग, उडिद किंवा चणे), मोड आणून सोलून
हळद चिमुटभर
तिखट अर्धा चमचा
मीठ
१ पळी तेल
हिंग
१ छोटा कांदा
आलं, लसूण, हिरवी मिरची, ओला नाराळ एकत्र वाटून. (नारळ्: वाटून १डाव होईल इतपत आणि आलं लसूण १ TBsp , हिरव्या मिरच्या तिखट जसं हवं त्या प्रमाणे)
कोथिंबीर्-धूउन चिरलेली
गरम मसाला (घरी असेल तो घालावा. वेगळा करून वाटायला नको)
आंबटपणाला टोमॅटो. (नसल्यास कोकम. पण चिंच किंवा कैरी नको)
क्रमवार पाककृती:
तेल तापवून हिंग घालावा.
चिरलेला कांदा आणि सोललेलं कडधान्य घालावं
कांदा पारदर्शक झाला की हळद तिखट मीठ घालून परतावं.
यावर आलं लसूण मिरची खोबर्याची गोळी घालावी.
भरपूर कलसल्यावर आधणाचं पाणी घालावं. (साधारण अडीच वाट्या)
वाढणी/प्रमाण:
१ माणसापुरती
अधिक टिपा:
** उकळी आल्यावर टोमॅटो आणि कोथिंबीर घालावी.
कडधान्य मऊ शिजेपर्यंत बिरडं ताटली ठेवून उकळू द्यावं.
माहितीचा स्रोत:
आईची पध्दत
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी आज आयुष्यात पहिल्यांदा
मी आज आयुष्यात पहिल्यांदा केलं मुगाचं बिरडं. पण मी ही आणि शोनूची एकत्र पद्धत वापरली. म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे मूग आणि कांदा एकत्र भाजला. वाटण पण याच पद्धतीने (हिरव्या मिरची व्यतिरिक) केले. पण लाल तिखट आणि गरम मसाला वगळून मालवणी मसाला घातला.
मॄ, आईला खूप खूप धन्यवाद!!! खाल्ल्यावर हाताचा वास पण घेत रहावा वाटतेय इतके अप्रतीम झालेय
फोटो टाकू?
>>फोटो टाकू? नेकी और पूछपूछ ?
>>फोटो टाकू?
नेकी और पूछपूछ ?
(No subject)
मिनोती, अगदी ला गा ला फोटो.
मिनोती, अगदी ला गा ला फोटो.
कशाला टाकलात हो फोटो मी
कशाला टाकलात हो फोटो![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मी अत्यंत बेचव सँडवीच खाऊन आलोय आत्ताच
जले पे उसळ
मिनोती, मस्त आलाय फोटो! ऋयाम,
मिनोती, मस्त आलाय फोटो!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ऋयाम, अरे उसळ नाही बिरडं
कृपया हे पहावे :
कृपया हे पहावे : http://www.maayboli.com/node/16995![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज करून पाहिलं बिरडं. मस्तच
आज करून पाहिलं बिरडं. मस्तच झालयं.
हा आजचा बेत. बिरडं, पोळ्या, पोह्याची मिरगुंडं आणि लसूण्-सांडगी मिरची तळून आणि सोलकढी.
सायो, मस्त बेत आहे ग. पण ती
सायो, मस्त बेत आहे ग.
पण ती मुगाची उसळ दिसते आहे. बिरड्याला रस्सा असतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर्च, बेत माझ्याकडे होता ग
आर्च, बेत माझ्याकडे होता ग तो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रस्सा होताच बिरड्याला पण वाढताना कमी वाढलाय नं म्हणून दिसत नाहीये
लहानपणी मी देखिल हि भाजी
लहानपणी मी देखिल हि भाजी खाल्ली आहे, thx for sharing
करुन पाहते उद्याच. मूग आणि
करुन पाहते उद्याच. मूग आणि कांदा एकत्र कधी भाजला नाहिये. इंट्रेस्टिंग वाटतय.
धन्यवाद मृ.
मिनोती/सावनी- दोघींचेही फोटु मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी काल या पद्धतीचा मसाला
मी काल या पद्धतीचा मसाला वापरून अख्ख्या मुगाची उसळ केली. सोबत भाजलेले पाव नि शेव, कोथिंबीर, कांदा. अप्रतिम लागत होती खरंच. धन्स मृ. फोटो टाकलाय.
मधुरिमा मस्तचं! शेव पण भाजतात
मधुरिमा मस्तचं! शेव पण भाजतात का? म्हणजे तळलेले शेव भाजायचेत का?
नाही बी. 'पाव भाजलेले आणि
नाही बी. 'पाव भाजलेले आणि शेव, कोथिंबीर, कांदा' असं आहे ते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)