Submitted by जिप्सी on 25 June, 2010 - 06:41
हा विषय इथे देत असल्याबद्दल सर्वप्रथम क्षमस्व. पण या विषयाकरीता हाच विभाग योग्य असल्याने मी इथे लिहित आहे.
मी काढलेली काहि प्रकाशचित्रे मलाच फॉरवर्डेड मेल मधुन येत आहेत (अगदी शिर्षक आणि दिलेल्या कॅप्शनसहित). दुर्दैवाने मी त्यावर वॉटरमार्क आणि कॉपीराईट मार्क टाकलेले नव्हते . (मला स्वतःला वॉटरमार्क आणि कॉपीराईट मार्क टाकणे आवडत नाही, त्यामुळे फोटोचे मूळ सौंदर्य कमी होते हे "माझे" मत होते.) पण काही दिवसांपासुन मीच काढलेले फोटो मलाच मेलमधुन येताना पाहिल्याने आता हे टाकणे गरजेचे वाटु लागले आहेत.
गुलमोहर:
शेअर करा
योगेश... ह्याआधीच मी तुला
योगेश... ह्याआधीच मी तुला सांगितलं होतं.
कॉपी राईट नेम मी टाकतो पिकासा
कॉपी राईट नेम मी टाकतो पिकासा वापरुन ...पण तो क्रॉप करुन काढता येईल कोणालाही .. पण वॉटर मार्क कसा टाकायचा ??
प्रसाद. , फोटोशॉपमधे
प्रसाद. , फोटोशॉपमधे वॉटरमार्क च्या under बरेच option आहेत ते ट्राय करं.
http://www.all-things-photography.com/add-a-watermark.html
योगेश, अप्रतिम फोटो आहेत यार
योगेश, अप्रतिम फोटो आहेत यार !
योगेश, वॉटरमार्क आणि कॉपीराईट मार्क टाकण्यानी फोटोचे मूळ सौंदर्य कमी होते, हे मान्य केले तरी, ते टाकणे हे खूप आवश्यकच आहे.
माझा स्वानुभव सांगतो. माझी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. मागच्याच महिन्यातली गोष्ट आहे. मला एक फोन आला. फोनवरच्या व्यक्तिने मला सांगितले, सर आम्ही नुकतीच पिंपरी चिंचवड ह्या एरियात आमची नविन इव्हेंट कंपनी चालू केली आहे. तुम्ही काही कामं आउट्सोर्स करत असाल तर आमचा विचार करा. मी त्याला त्याच्या आत्तापर्यंतच्या कामाचं प्रोफाईल पाठवून द्यायला सांगितलं. त्याचा मेल आल्यावर मी ते प्रोफाईल बघताना ताड्कन उडालो.
त्याने त्याच्या प्रोफाईल मध्ये ६ शोज केल्याचं लिहीलं होतं, त्यातले ३ शोज आणि त्याचे फोटोग्राफस् हे माझ्या कंपनीने केलेले होते. जरा शोध घेतल्यावर कळलं त्याने माझ्या भावाच्या ऑर्कूटच्या प्रोफाईल मधून हे फोटो घेतले होते.
अरे बाप रे! शहाणे व्हा या
अरे बाप रे! शहाणे व्हा या अनुभवातून..
योगेश, माझाही सारखाच अनुभव
योगेश,
माझाही सारखाच अनुभव आहे. माझे ऑरकुट वर लावलेले काही फोटोज् एकाने परस्पर आपले म्हणुन वापरले होते. तेव्हापासुन मी वॉटरमार्क वापरतो आहे. वॉटरमार्क वापरताना सुद्धा तो असा वापरावा की crop करुन काढता येणार नाही. जे watermarks फोटोज् च्या खाली असतात ते सहज crop करुन काढता येतात म्हणुन मी watermark फोटो च्या मध्यावर लावतो. त्यामुळे फोटो चे मूळ सौंदर्य थोडेसे बिघडते हे खरे असले तरी तुम्ही opecity कमी करुन हा effect बराच कमी करू शकता. असा watermark फोटोत सहजी दिसत नाही पण शोधायचाच म्हटला तर सापडतो.
मित्रा, तुझ्या हातात नक्कीच
मित्रा, तुझ्या हातात नक्कीच काही जादू आहे. कसले सुंदर फोटो आहेत. फिनलंड आणि आता गड किल्ले, माळशेज. वा! एकदम झकास!!!
तू watermark टाकच, कारण इतके सुंदर फोटो अजून कोणी स्वताचे म्हणून खपवत असेल तर ते चांगले नाही.
धन्यवाद!!!! @सुर्यकिरण योगेश.
धन्यवाद!!!!
@सुर्यकिरण

योगेश... ह्याआधीच मी तुला सांगितलं होतं.>>>> हो रे, पण . . . . . . .
आणि धन्यवाद लिंक दिल्याबद्दल
@अमोल कुलकर्णी
योगेश, अप्रतिम फोटो आहेत यार!>>> धन्यवाद अमोल.
त्यातले ३ शोज आणि त्याचे फोटोग्राफस् हे माझ्या कंपनीने केलेले होते. जरा शोध घेतल्यावर कळलं त्याने माझ्या भावाच्या ऑर्कूटच्या प्रोफाईल मधून हे फोटो घेतले होते.>>>हे मात्र अतिच झाले आहे. कुठल्याही प्रकारे मूळ मालकाला क्रेडिट न देता स्वतःच्या नावावर खपवणे म्हणजे सरळ सरळ चोरीचाच प्रकार.
@दक्षिणा
पण आता मात्र नक्की.
अरे बाप रे! शहाणे व्हा या अनुभवातून...>>>हो दक्षिणा, मागच्या वेळेस आलेल्या अनुभवातुन नाही काही शिकलो
@चंदन
त्यामुळे फोटो चे मूळ सौंदर्य थोडेसे बिघडते हे खरे असले तरी तुम्ही opecity कमी करुन हा effect बराच कमी करू शकता. असा watermark फोटोत सहजी दिसत नाही पण शोधायचाच म्हटला तर सापडतो.>>>>> हो हेही करून पाहिले होते, पण मला स्वतःला कुठेतरी, काहीतरी खटकत होते. पुढच्या प्रचिवेळेस नक्कि करणार
@नरेन्द्र
मित्रा, तुझ्या हातात नक्कीच काही जादू आहे. कसले सुंदर फोटो आहेत.>>> धन्यवाद नरेन्द्र.
योगेश, परवाचे तुझे फोटोज
योगेश, परवाचे तुझे फोटोज बघितले तेव्हाच मला खरंतर आश्चर्य वाटलं. म्हटलं अरे वा ह्याच्याही फोटोजवर वॉटरमार्क यायला लागले तर.
अमोल वॉटरमार्क टाकणं खरंच
अमोल
वॉटरमार्क टाकणं खरंच गरजेचं आहे असं आता मलाही वाटतंय.
पाणिखूणला पर्याय नाही!
पाणिखूणला पर्याय नाही!
तुमच्या हातात जादु आहे, मी
तुमच्या हातात जादु आहे, मी आताच एकीला सांगितले कि योगेशचे फोटो बघ.
तुम्हि खरंच वॉटरमार्क टाका. तुमचे फोटो कोणी दुसरा कोणी वापरत असेल तर चुकिचे आहे.
योगेश....माळ्शेजचे तुम्ही
योगेश....माळ्शेजचे तुम्ही काढ्लेले फोटो मला पण आले आहेत मेल ने...
फोटो खरंच अप्रतिम आहेत....
मला असे वाटते, कि जर असे फोटो
मला असे वाटते, कि जर असे फोटो मेल मधून आलेच, तर त्या लिष्ट मधल्या प्रत्येकाला ठणकाऊन लिहायचे, कि हे आमच्या योगेशचे फोटो आहेत !!!
मी तुमच्या आधीच्या मताशी
मी तुमच्या आधीच्या मताशी जास्त सहमत आहे, निसर्गाच्या फोटोंवर वॉटर मार्क टाकू नये. मी तुमच्या जागी असतो तर परत आलेले फोटो बघुन अचंबीत झालो असतो, पण वाईट, दु:ख वाटले नसते.
हे सर्व फोटो निसर्गाचे (वहाणारे पाणी, शेती, फुले, सुंदर प्राणी, गड, किल्ले) आहेत. त्यात आपले योगदान किती तर बहुतेक ठिकाणी केवळ फोटो काढण्यापुरते मर्यादीत असेल (असे मी समजतो). फोटो काढतांना आपण कुठे निसर्गाची परवानगी घेतली होती?
शेती/ फुलांची बाग स्वत: तयार केली असेल, त्यात कष्ट घेतले असतील, मग त्या बागेला आलेल्या फुलांच्या फोटोसेशन वर आपला पुर्ण मालकी हक्क असेल.
कविता, लेख तयार करणे, आणि एका क्लिक ने फोटो काढणे यात मी फरक करेल. अर्थात वरचेवर दुसर्यांना e-mail ने पाठवणे (फोटो, कविता) गैर आहे, मी त्याचे समर्थन करणात नाही. शेवटी, फोटो तुमचे आहेत, आणि तुमचा पुर्ण हक्क बनतो त्याच्या वर पाण्याचा ठिपका सोडायचा अथवा नाही याचा. आपण क्षणभर का असेना लोकांना आनंद देण्यास कारणीभुत ठरतो आहोत याचा मला जास्त आनंद वाटला असता.
त्यात आपले योगदान किती तर
त्यात आपले योगदान किती तर बहुतेक ठिकाणी केवळ फोटो काढण्यापुरते मर्यादीत असेल (असे मी समजतो)<<< उदय, मग हे योगदान अमक्याचे आहे असे एखाद्याला नमूद करणे का जमू नये?
केवळ फोटो काढणे हे सोपे नाही, हे तूही कबूल करशील . दुसर्या कोणत्याही कलेप्रमाणे मेहनतीने आत्मसात केलेली ती एक कला आहे.
फोटो काढतांना आपण कुठे
फोटो काढतांना आपण कुठे निसर्गाची परवानगी घेतली होती? >>>>१००% सहमत!!!!
मेलमधुन आले याचे वाईट वाटत नाही, पण जर आपण काढलेले फोटो जर कुणी स्वतःच्या नावावर खपवत असेल तर?????
मी काढलेले फोटो काहींनी ऑर्कुटवर स्वतःच्या नावावर पब्लिश (अगदी कॅप्शनसहित) केलेले देखील सापडले आहेत
याच विषयावर आपल्या सॅमने मागे मला सांगितले होते:
"यावर दोनच पर्याय... वॉटरमार्क टाकायचा (शक्यतो टोचणार नाही पण दिसेल असा) किंवा इंटरनेटला दान केल्याप्रमाणेच उदार मनाने फोटो अपलोड करायचे (open source!!)"
मेलमधुन आले याचे वाईट वाटत
मेलमधुन आले याचे वाईट वाटत नाही, पण जर आपण काढलेले फोटो जर कुणी स्वतःच्या नावावर खपवत असेल तर?????
---- हे वाईटच आहे... दुसर्याची गोष्ट स्वत: चे म्हणुन सांगणे हे वाईटच.
सुरवातीला मी सुद्धा
सुरवातीला मी सुद्धा गडकिल्ल्यांच्या फोटोवर वॉटरमार्क टाकले होते पण जे गडाचे रचनाकार त्यांची नावे सुद्धा आपल्याला माहित नाहीत त्यावर आपली छाप का टाकावी किंबहून ती आपली पात्रता नाही या विचाराने दिले सोडून.
निसर्गाचे घटक , अन्य घडामोडी यांवर त्या वॉटरमार्क टाकणे मलाही पटले.