ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड रोल

Submitted by अंजली on 20 June, 2010 - 22:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ मोठे बटाटे
१ टे. स्पू बारीक चिरलेली कोथिंबीर
१/२ लिंबाचा रस
६-८ ब्रेड स्लाईसेस

वाटणासाठी
१ इंच आलं
४ मोठ्या लसूण पाकळ्या
३-४ हिरव्या मिरच्या
१ टि. स्पू. धने
१ टि. स्पू. जीरे
१ टि. स्पू. बडिशेप

कव्हरसाठी:
१ कप डाळीचं पीठ
१ मोठा चमचा तांदळाचं पीठ
१ टि. स्पू. तिखट
१/२ टि. स्पू. हळद
चिमूटभर हिंग
१ छोटा चमचा आलं लसूण पेस्ट
चवी प्रमाणे मीठ

हिरवी चटणी:
एक छोटी कोथिंबीरीची जुडी
मूठभर पुदिना पानं
१-२ पाकळ्या लसूण
१/२ इंच आलं
३-४ हि. मिरची
१ टि. स्पू. जीरे
१/२ टि. स्पू. अनारदाणे (असल्यास)
पाव लिंबाचा रस
चवीप्रमाणे मीठ

तळायला तेल

गोड चटणी
बारीक चिरलेला कांदा
बारीक शेव

क्रमवार पाककृती: 

हिरव्या चटणीसाठी दिलेले साहित्य बारिक वाटून घ्या. चटणी बाजूला ठेवा.
डाळीच्या पीठात सर्व साहित्य घालून भजींच्या पीठाप्रमाणे सरबरीत भिजवून घ्या पण खूप पातळ करू नका.
बटाटे उकडून, सोलून, खिसून घ्या.
वाटणासाठी दिलेले सर्व पदार्थ बारिक वाटून थोड्या गरम तेलात परतून घ्या. त्यातच हळद घाला.
बटाट्यामधे तेलात परतलेले वाटण, मीठ, बारिक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
ब्रेडच्या कडा काढून (ऐच्छिक) स्लाईस लाटण्यानं लाटून घ्या.
ब्रेडला हिरवी चटणी लावून बटाट्याचे सारण एका कडेला ठेवून दुसरी बाजू त्यावर घडी घालून पॅटीस सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करून घ्या.
डाळीच्या पीठात बुडवून तळून घ्या.

तळलेल्या पॅटीसचे तिरके काप करून घ्या.
त्यावर मीठ, धने-जीरे पूड, तिखट घालून थोडी गोड चटणी घाला.
कांदा घालून वरून बारीक शेव घाला.

वाढणी/प्रमाण: 
६ ते ८ पॅटीस
माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

स्वप्नाली,
डाळीच्या पीठाच्या लेयरमुळे बटाटेवडे जेवढे तेलकट होतात, तेवढेच तेलकट हे पॅटीस होतात. तळल्यानंतर पेपर टॉवेलवर काढायचे, त्यामुळे जास्तीचं तेलही काढलं जातं

.

मस्त!
समहाऊ, घरी तळणं वर्षातून दोन ते चार वेळा होतं मोजून - पुढच्या वेळेस प्लॅन करेन तेव्हा ह्याचा विचार करेन नक्की!