Submitted by तृप्ती आवटी on 21 June, 2010 - 13:44
एका मैत्रिणीशी बोलताना असे समजले की त्यांच्या घरी रीसायकलसाठी वेगळे बिन नाही कारण कोक आणि तत्सम पेयांचे कॅन्स, मिनरल वॉटरच्या बाटल्या फारसे घरात येत नाहीत. तेव्हा मला सांगायचे सुचले नाही पण कोकचे कॅन किंवा मिनरल वॉटरच्या बाटल्या ह्याशिवाय अनेक प्रकारचे डबे, बाटल्या, झाकणं रीसायकल होतात. तर तुम्ही नेहेमी रीसायकल करता त्या वस्तुंची यादी शक्य झाल्यास इथे द्या. जेणेकरुन इतरांना माहिती होइल.
** रीसायकलची खूण स्वत: तपासल्याशिवाय वस्तू त्या बिनमध्ये टाकु नका.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्याकडे २ निराळे बिन
आमच्याकडे २ निराळे बिन आहेत.
१. तू उल्लेख केलेली खूण असलेले डबे-बाटल्या-कॅन्स इ.
२. कागद - खोकी (पूर्ण उलगडून सपाट घडी करून), वर्तमानपत्रं, मासिकं, इ.
स्वाती, डिट्टो...
स्वाती,
डिट्टो...
गर्बर फूड च्या बाटल्या आणि
गर्बर फूड च्या बाटल्या आणि फॉर्मुलाचे डबे रीसायकल होतात का ?
_देसी/लोकल फ्रोझन फूडचे डबे.
_देसी/लोकल फ्रोझन फूडचे डबे. ह्यात फ्रोझन चटण्या, भाज्या, खवा, पनीर ह्या सगळ्याचे डबे पण येतात.
_अमेरिकन ग्रोसरीत मिळणारे रेडी टू ईट फूडचे डबे (सूप, इ.)
_ज्यूस/पाणी/कोक/इ. च्या बाटल्या
_शाम्पु, कंडिशनर, बबल बाथ, लिक्विड सोपच्या बाटल्या
_रेग्युलर, किड्स, बेबी योगर्टचे डबे
_दुधाचे कॅन
_कट फ्रूट, सॅलड मिक्सचे डबे
_नेसक्विक, कॉफी, चहाचे डबे
_बेबी फूड जार्स
२. कागद - खोकी (पूर्ण उलगडून सपाट घडी करून), वर्तमानपत्रं, मासिकं, इ. >>> हे आम्ही पण वेगळे टाकतो. (त्यासाठी २ घरांचा मिळून एक बिन घरमालकांनी दिलाय.)
प्रत्येक काउंटी आणि एरिया
प्रत्येक काउंटी आणि एरिया प्रमाणे पण रिसायकलिंग चे नियम बदलतात गं.
आम्ही जवळ जवळ ७०% रिसायकलिंग करतो. रिसायकलची खुण नसतानाही बर्याच गोष्टी रिसायकल करता येतात.
आमच्याकडे
१. कार्डबोर्ड बॉक्स
उदा. सिरियल बॉक्सेस्,केक मिक्स बॉक्सेस , स्मॉल कुकीज , वॅफ्ल्स , चीजकेक बॉक्सेस इत्यादी
खेळण्याचे बॉक्स, दुधाचा पॅक
२. कॅनस, प्लॅस्टीकचे दह्याचे डबे (स्वच्छ करुन), दुधाचा कॅन ,कोक बॉटल्स इत्यादी
३. ऑरिओ कुकीज सारखी कव्हर ,(Thin plastic), झिपलॉक सारख्या बॅग्ज, लेज वगैरे च्या बॅग्ज
4. पुर्वी पिझ्झा बॉकस घ्यायचे नाहीत . आता घेतात.
५. गार्डनिंग मधला जवळ जवळ सगळ्या वस्तु
६. न्युज पेपर्,मासिक , कागद
इत्यादी रिसायकल होत.
अजुन लिहिते नंतर.
ऑरिओ कुकीज सारखी कव्हर ,(Thin
ऑरिओ कुकीज सारखी कव्हर ,(Thin plastic), झिपलॉक सारख्या बॅग्ज, लेज वगैरे च्या बॅग्ज >>> हे मला माहिती नव्हते.
आपण जिथे राहातो तिथल्या सॉलिड
आपण जिथे राहातो तिथल्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट्च्या ऑफिसमधे काय रिसायकल करता येइल त्याची यादी मिळते.
आमच्या इथली यादी खालिल प्रमाणे-
Glass - food and beverage
Aluminum and Steel food and beverage containers
Corrugated cardboard and paperboard
Newspapers, inserts, magazines, catalogs, and any type of office paper
# 1 thru # 7 food and beverage plastic
Please make sure all material is clean and free of contaminates.
पूर्वी आमच्या इथे फक्त #१-#३ प्लॅस्टिकच रिसायकल करता यायचे आता रेंज वाढ्लेय. शिवाय
used motor oil, used oil filters, and used antifreeze पण ठरलेल्या केंद्रात देता येते. यार्ड वेस्ट (कापलेले गवत, झाडाच्या फांद्या वगैरे) आठवड्यतुन एकदा ट्रक येतो न्यायला. तसेच ई-कचरा रिसायकल करता येतो. त्याच्या साठी खास दिवस असतात.
काऊंटीच्या वेबसाईटवर माहिती
काऊंटीच्या वेबसाईटवर माहिती मिळेल. नेहमीच्या गोष्टींपेक्षा वेगळ्या म्हणजे बॅटरीज, एक्स्पायर झालेली औषधे इ. साठी. (याला रिसायकल म्हणता येईल का माहीत नाही, धोकादायक कचरा डिस्पोजल
)
प्लास्टीक कॅरी बॅग्जसाठी ग्रोसरी स्टोअरच्या बाहेरही बिन असते.
बॅटरी, पेंट कॅन, उरलेला पेंट
बॅटरी, पेंट कॅन, उरलेला पेंट वगैरे नेहमीच्या Recycle मधे चालत नाहीत. त्यासाठी वेगळे Center आमच्या इकडे आहे..
Computers, TV, DVD player वगैरे पण वेगळ्या Center ला जातात. पण आमच्याकडे Bulk Waste च्या वेळी ह्या गोष्टी घेतात...
बॅटरी, पेंट कॅन, उरलेला पेंट
बॅटरी, पेंट कॅन, उरलेला पेंट वगैरे नेहमीच्या Recycle मधे चालत नाहीत. >>Hazardous waste management चा वेगळा विभाग असतो बहुधा.
पिझ्झ बॉक्स etc recycle करू नका असे आमच्या इथ सांगतात. शक्यतो वर ज्याला खाण्याच्या चिकट गोष्टी लागलेल्या असतात त्या पण ह्यात येतात.
आम्ही जे जे रिसायकल
आम्ही जे जे रिसायकल करण्याजोगे असते ते रिसायकल करतो. ग्रोसरीच्या प्लास्टीक बॅग्स तसेच बॅटरीज रिसायकल करतो. माझा नवरा कारचं ऑईल स्वतः चेंज करतो. ते पण आम्ही रिसायकल करतो. गेल्या काही महिन्यांपासून रिसायकल ड्रॉप ऑफ एरीयात टेक्स्टाईल्स साठी वेगळा बिन दिसतो. काही जुने कपडे, टॉवेल गुडविलला देउ शकत नाही, ते तिथे नेउन टाकतो. कुठ्च्याही मटेरियलचे टेक्स्टाईल्स चालते; ते फक्त स्वच्छ धुतलेले आणि प्लास्टिक बॅगमध्ये नीट घालून टाकावे लागते.
एक्स्पायर झालेली औषधे इ.
एक्स्पायर झालेली औषधे इ. साठी. (याला रिसायकल म्हणता येईल का माहीत नाही, धोकादायक कचरा डिस्पोजल )<<<< नक्कीच धोकादायक. अशी औषधे क्रश करून कॉफी पावडर किंवा कॅट लिटर साठी जे मटेरियल येतं त्यात मिक्स करून ट्रॅश करावीत. किंवा अगदी सोपं म्हणजे जवळच्या फार्मसीत नेऊन द्यावीत. ते अतीशय काळजीपूर्वक त्याची विल्हेवाट लावतात. प्रत्येक फार्मसी मधे दर महिन्याला एक्सपायर झालेली मेडिसिन्स गोळा करून एका सेंट्रलाईज्ड ठिकाणी पाठवली जातात जिथे त्यांची योग्य ती विल्हेवाट लावली जाते. शक्यतो कचर्यात टाकू नका. हल्ली टीन एजर्स मध्ये ड्रग पार्टीजचं खूळ बोकाळलं आहे. आई वडिलांच्या मेडिसिन कॅबिनेट मधून किंवा मिळतील तिथून प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स चोरायची आणी पार्टीज करायच्या. फार धोकादायक प्रकरण आहे हे. आपल्या कडून कळत नकळत हातभार लावू नका.
आमच्या ऑफिस मध्ये पण रिसायकल
आमच्या ऑफिस मध्ये पण रिसायकल करण्यावर खुप भर दिला जातो पण त्यावरुन बरीच धांदल पण उडाली होती. त्यांनी चित्र वगैरे लाऊन सुद्धा कधी कधी नेमकं कळायचे नाही की काय कुठल्या बिन मध्ये टाकावे ते. सहसा
डिकम्पोज होणार्या वस्तु कचर्यात आणि बाकी रिसायकल असा नियम लक्षात आला.
त्यात मिक्स करून फ्लश करावीत
त्यात मिक्स करून फ्लश करावीत >> औषधं किंवा तत्सम द्रव्य फ्लश करु नयेत. कारण ते पाणी परत रिसायकल करुन आपल्यालाच प्यायला लागतं. शिकागो ट्रिब्युन मध्ये एक मोठा लेख पाण्यातील औषधांचे प्रमाण ह्यावर आला होता. त्या लेखाप्रमाणे अशी औषध लघवीतून जातात व पाणि रि फिल्टरेशन / रीसायकल मध्ये ती पूर्ण रीसायकल होत नाहीयेत. त्या वार्ताहाराने शिकालो लँड मधील अनेक सर्बब मधील पाणी टेस्ट करुन हा लेख लिहला होता.
जवळच्या फार्मसीत नेऊन द्यावीत हा पर्याय योग्य वाटतो किंवा हझार्डस मटेरियल मध्ये ती टाकावीत.
माय बॅड. ट्रॅशच लिहायचं होतं.
माय बॅड. ट्रॅशच लिहायचं होतं. चूक सुधारते आहे. रिनल एक्स्क्रीशन होणारी अनेक औषधं पाण्यात मिसळली जातात. रिफिल्टर होऊनही ट्रेसेस रहातात. मधे एक आर्टिकल वाचलं होतं. ओरल कॉनट्रासेपटिव्ह्स चे असे ट्रेसेस ओव्हर द ईयर्स पाण्यात मिक्स होणे हे इन्फर्टिलिटीच्या केसेस मागचं एक कारण म्हणून डिस्कस केलं होतं. चूक लक्षात आणून दिल्या बद्दल धन्यवाद.
सिंडरेला, एक चांगला फलक सुरु
सिंडरेला, एक चांगला फलक सुरु केलास तू.. धन्यवाद!
इथे सिंगापुरमधे सगळा कचरा एका ट्रकमधे भरुन मग ती कंपनीच त्यातून हव ते रीसायकल करतं. तसे वेगळे डबे/खोके ठेवले असतात काही ठिकाणी पण प्रत्येक ठिकाणी असे वेगळे डबे ठेवलेले नसतात. शिवाय कचरा फेकायला घरातच की OUTLET केले असते त्यामुळे कुणी जीना उतरवून खाली येत नाही. चहा कॉफीचे थर्माकोलचे ग्लास रीसायकल होतात का?
पुण्यामधे Raddi Depot नावाची
पुण्यामधे Raddi Depot नावाची संस्था आहे.
या संस्थेचे लोक (pick up schedule केल्यास) आपल्या घरी किंवा ऑफिस मधे येउन न्युज पेपर, मासिकं, पुस्तकं, दुधाच्या पिशव्या collect करुन NGOs ना देतात आणि या NGOs ते recycle करुन त्यापासुन पिशव्या बनवतात.
आपल्याला या रद्दीचे बाजार भावाप्रमाणे पैसे मिळतात किंवा आपण हि रद्दी NGO ला donate करु शकतो, त्याची receipt मिळते.
http://www.raddidepot.com/index.html
अरे हे फक्त अमेरिकेतल्या
अरे हे फक्त अमेरिकेतल्या लोकांसाठि आहे काय????![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असुदेत.... वरती दिलेली माहिती तुमच्या पुणेकर मित्रांना पाठवा