दोन, अडीच इंचांची ही धूर काढणारी कांडी क्षणभरासाठी सगळे विसरायला लावण्याची क्षमता बाळगून असते हा शोध साहूला विसाव्या वर्षी लागला म्हणजे नवलच! खरे तर आजवर केव्हाच सिगारेट व विड्या ओढून जुना व्हायला हवा होता तो असल्या वातावरणात! पण त्या नादाला गेलेलाच नव्हता तो. आणि गोपीने त्याला आज हा नवा मंत्र दिला. दिला म्हणजे हेतूपुरस्पर नाही, आपोआप व नकळतपणे!
आजूबाजूला तीच तीच नग्नता, तेच तेच 'जन्मोजन्मी मी तुझीच आहे राजा' असे म्हणून एकाला मिठी मारून त्याचवेळी दुसर्याकडे आशेने पाहणे, त्याच त्याच दलदलीत भजी तळणारा भीम, श्रीकृष्ण टॉकीजवर सकाळी दहापासूनच सुरू होणारे बी ग्रेड मसाला चित्रपट, रोज कोणाचा ना कोणाचा तरी कानठळ्या बसवणारा आक्रोश, त्याच त्याच शिव्या ऐकून त्यांचा अर्थच नष्ट झालेला...
आणि या सगळ्यात विनाकारण येऊन पोचलेल्या साहूची आई गेलेली..
तब्बल महिनाभर साहू शांतपणे मुख्य खोलीत आईच्या जागी नुसता बसून असायचा. येणारे जाणारे पाहायचे, हळहळायचे, आपापल्या परीने समजावयचे.. साहू नि:शब्द!
पण डिस्कोची शान अशी घालवून चालणार नव्हते. वेलकमची स्नेहा हिंदी पिक्चरमधल्या नटीसारखी होती म्हणे! शालन सांगत होती. रोज बोली लागते. चक्क पाच पाच हजार रोकड घेऊन ग्राहक येत आहेत. स्नेहाला वेलकमवर महाराणीसारखी ट्रीटमेंट आहे. आणि डिस्को?? तुझी आई असती तर आत्तापर्यंत काहीतरी हालचाल केली असती तिने.
केवढा विरोधाभास! ज्या वातावरणात क्षणभर जिवंत राहावेसे वाटत नाही तेथे व्यावसायिक प्रगती करण्याचा मुद्दा होता हा! पण समर्थनीयच होता. शालनला आजवर आत्महत्या करणे जमलेच नव्हते. मग करायचे काय? शिक्षण नाही, अनुभव नाही. काम कसले करायचे? आणि कामाची लाज नसली तरीही धुणी भांडी करताना सुरक्षित वातावरणच असेल असे कुठे आहे?
शालन खिडकीत उभी राहिली तर अजून तिच्याकडे वळून वळून पाहणारे लोक होते. वयाच्या पस्तिशीत! ती ग्राहक स्वीकारत नव्हती बरेच महिन्यांपासून हा वेगळा भाग होता. तसेच, ती आता जवळजवळ डिस्कोची प्रमुखच झालेली होती. मात्र, सगळ्यांनाच माहीत होते, अगदी गजूसकट.. की साहू भानावर आला की तो डिस्को चालवायला घेणार! आणि त्याच क्षणाची सगळे वाट पाहात होते.
गजू नाही म्हंटले तरी प्रचंड दु:खात होता. त्याला दारूचे व्यसन लागले होते. बरेचदा तो पिऊनच आलेला होता. पिऊ नको असे म्हणायला एकतर त्याचे सख्खे कुणीही नव्हते आणि बुधवार पेठेत दारू पिऊन जायचे नाही तर काय गोमुत्र पिऊन जायचे? साधा हिशोब होता. शरीराची लवकरात लवकर नासाडी होईल तितके चांगले!
आणि शालन आणि गोपी साहूच्या आसपास बसलेले असताना शालनने आज साहूच्या डोक्यावरून हात फिरवत पुन्हा ब्रेन वॉश केला.
शालन - साहू.. दुख तो है.. लेकिन तू अकेला नही है जिसकी मां गुजरगयी.. तू अकेला नही है जिसके मां को ऐसी मौत मिली.. जिंदा तो रहनाही है.. मरण नाही येत तोवर जगणार हे सरळच आहे.. मग निदान खाऊन पिऊन व्यवस्थित तर जगायला पाहिजे..
तेवढ्यात रेखा तिथे येऊन बसली..
शालन - नुसते असे बसून काय होणार आहे? तुझी आई डिस्को चालवायची म्हणून तुला सगळे मान देतात. आत्तापर्यंत तू दुसरा कुणी असतास तर डिस्कोतून हाकलुन दिले असते. तुला माहितीय? मला मुंगूस भेटला होता काल!
खाडकन साहू, गोपी आणि रेखाने शालनकडे पाहिले.
शालन - मला म्हणाला अमजदभाई तुझे बीस हजार एकरकमी अन २५ % टक्के भाग देतील... डिस्को अमजदभाईसाठी चालव..
ही संकल्पनाच नवीन होती साहूला. मुख्य म्हणजे त्याला आता बर्यापैकी मराठी समजू लागले होते. स्वतःला बोलता येत नसले तरीही.
साहू - मतलब??
शालन - मतलब यहा का सारा फायदा अमजद लेलेगा
साहू - ऐसे कैसे लेलेगा?
शालन - कौन रोकेगा? तू? इस उमरमे?
साहूने मान खाली घातली. वर्षानुवर्षांचा गरीब स्वभाव आणि असमर्थता प्रकट झाली त्याच्या देहबोलीतून! शालन धडे घेण्यात पटाईत होतीच.
शालन - फिर यहा जो भी फायदा होगा.. सब अमजदका.. कोई रोक नही सकेगा.. ना मै.. ना ये गोपी.. ना तू.. और तू धंदाभी नही करता है और दलाली भी.. तुझे कायको पालेंगे फोकट?? राऊरकेला जाना पडेगा तुझे..
साहू - लेकिन.. डिस्को तो.. मै ही चलाऊंगा..
शालन - अच्छा? हे असे चालवणारेस डिस्को? मी होते म्हणून महिन्याभराचा हिशोब नीट ठेवलाय.. एखादी असती तर तुला लुबाडून केव्हाच तोहफा गाठले असते. असा मुलीसारखा कुढत बसतोस, रडतोस.. आणि डिस्को चालवणार म्हणे.. जमाईराजातल्या मुली हसतात तुला.. रंगमहालच्या मुली खिजवतात मला.. केदारी चौकाच्या पलीकडे तर पायही ठेववत नाही.. तो मुंगूस टपलेलाच असतो मला पटवायला.. तू म्हणत असशील तर.. तू फुकट राहा इथे कायमचा... मी चालवते डिस्को.. जग बाईच्या जीवावर.. सगळी बुधवार पेठच जगते तशी...
हळूहळू साहूचे डोळे फुलू लागले होते.
शालन - मग कधीतरी रमासेठ अन कबीर बरोबर अमजद येईल. दोघे गजूला धरून ठेवतील. अमजद इथेच तुझ्या डोळ्यांदेखत मला आत घेऊन जाईल. मग रेखाला. मग गोपीला... आणि.. शेवटी.. तुला..
साहू - ए....... शालन...
किंचाळून बोलताना पंधरा वर्षात पहिल्यांदा साहूने शालनला शालन अशी हाक मारली होती. रेखा आणि गोपी हादरले होते. आता मोठे भांडण होणार असा रेखाचा अंदाज होता. कारण तिचे रात का राजातील जुने संस्कार अजूनही तिच्या मनात असलेच विचार आणायचे मधून मधून! गोपीला वाटत होते की शालनला याने अशी हाक मारणे चांगले नाही..
शालन - दीदी? दीदी नही बोलेगा? आं?? इतनासा था इतनासा.. तेरी मां ग्राहक लेजाके अंदर सोती थी तब रात रातभर मेरे गोद मे सोता था तू.. आज मै नौकर होगयी यहांपर??
जे घडेल असे वाटले नव्हते .. अजिबात वाटले नव्हते... ते झाले..
शालनने डिस्को चालवणार्या रेश्माच्या मुलाच्या सर्वांदेखत कानफडात वाजवली.
शालन - शालन बोलता है शालन.. उमर क्या है तेरी?? आं??
आणि पहिल्यांदाच अतीव पश्चात्तापाने साहू शालनला बिलगला. आजवर आईच्या दु:खामुळे तिच्या मांडीवर डोके ठेवू अनेकदा रडला होता. पण आज खास तिची माफी मागण्यासाठी तिला बिलगला होता तो. शालनच्या अन गोपीच्या डोळ्यातून घळाघळा आसवे गळत होती. शालनची आसवे साहूच्या आसवांमधे मिसळत होती. आणि रेखा नि:शब्द होती. रडणे हा प्रकार न जमण्याला बरीच वर्षे झाली होती तिला!
बराच वेळाने साहू उद्गारला.. आणि ते वाक्य ऐकून गोपीच्या अंगावर काटाही आला आणि अभिमानही वाटला त्याला..
साहू - शालनदीदी.. मुंगूसको बात करनेके लिये बुला.. स्नेहा डिस्कोमे आयेगी कलसे...
स्नेहा डिस्कोत आली तर काय होईल याचा विचारच करवत नव्हता रेखाला! ही उर्वशी डिस्कोत सत्ता गाजवेल याबाबत तिला जराही शंका नहती. आणि शालन साहूच्या देहबोलीकडे अन आविर्भावांकडे बघताना तोषली होती. डिस्कोला नवा, दमदार मालक अन चालक मिळाला होता आज! साहू... रेश्मा... थापा..
गोपीने स्वतःची जळून अर्धी झालेली सिगारेट साहूच्या पुढे केली. जिच्याशी आईसारखे नाते आहे अशा शालनसमोर साहूने कसलाही विचार न करता बिनदिक्कत सिगारेटचा झुरका मारला. पिक्चरमधे दाखवतात तसा लगेच खोकला वगैरे आला नाही. मात्र हळूहळू धुरांच्या वलयासोबत साहूचे पिसासारखे हलके झालेले मन तरंगत तरंगत खिडकीबाहेर जाऊ लागले. आणि बसल्या जागी साहूने तीन सिगारेटी ओढल्या.
परिस्थितीने साहूमधे अविश्वसनीय बदल घडवून आणले होते. गरीब स्वभावाचा, विशेष बुद्धी नसलेला लहानसा साहू आता बुधवार पेठेतील वातावरणात वर्षानुवर्षे वावरल्यामुळे पक्का झाला होता.
मात्र! हा निर्णय खरोखरच अविश्वसनीय होता. खरोखरच! ज्या माणसाने इतर काही माणसांबरोबर आपल्या आईला लाथा बुक्यांनी मारून टाकलेले आहे त्याच्याशीच बोलणी करून त्याच्या कोठ्यावरची पुण्यासकट फोरास रोडही गाजवणारी मुलगी इथे आणायची? कुणाच्या जीवावर? एकट्या गजूच्या?
पण साहूपुढे बोलण्याचे धाडस गोपीलाही झाले नव्हते.
आणि त्या दिवशी जे घडले ते ऐकून.. पाहून.. रेखा, गोपी अन डिस्कोच काय... संपूर्ण बुधवार पेठ दचकली. क्षणभर निश्चल, नि:शब्द झाली.
साहू.. रेश्मा.. थापा... या व्यक्तीला नंतर कुणीही लाईटली घेऊ शकणार नव्हते. खरे तर.. त्याला निर्विवाद मास्टर समजणार होते बुधवार पेठेचा..
मुंगूस दोन तासानी डिस्कोवर आला तेव्हा जमाईराजा, रंगमहाल आणि अनेक वाड्यांमधील मुली, बायका अन कोठेवाल्या खिडकीतून बाहेर तोंड काढून अवाक होऊन डिस्कोकडे बघत होत्या. मुंगूस एकटा आला होता. त्याच्या दृष्टीने साहूला माहीतच नव्हते की साहूची आई कशी मेली! त्यामुळे तो निवांत होता. फक्त खूप खूप मागे एकदा त्याला साडी वगैरे नेसवून कबीरने आणले होते तेव्हा मुंगूस खूप हासला होता. मुंगूस अन कबीरने एकदा ललितावर जबरदस्ती केली होती हेही साहूला माहीत नसल्याचे मुंगूस जाणून होता. उलट साहूच्या लहानपणी त्याला भजी, चहा देणारा मुंगूस केव्हाही साहूसमोर उभा राहायला दचकायचे कारणच नव्हते.
गजूला स्पष्ट सूचना होती साहूची. मधे बोलायचे नाही आणि मी सांगीतल्याशिवाय काहीही हालचाल करायची नाही.
मुंगूसला 'डिस्को अमजदभाई केवढ्याला घेतील' असे विचारायला, प्राथमिक चर्चा करायला साहू अन शालनने बोलावले आहे असे निरोप मिळाला होता त्यामुळे तर मुंगूस एखाद्या राजाच्या थाटातच आत आला होता.
मुंगूस समोर येऊन बसला. अख्खे डिस्को आपल्या बापाचे आहे अशा आविर्भावात तंगड्या वगैरे पसरून विडी पेटवली. शालनकडे पाहून डोळा मारून हासला. शालनने गेल्या दोन तासात स्वतःला असे काही बनवले होते की भल्याभल्यांची नीयत खराब होईल. अत्यंत पारदर्शक साडी नेसून ती 'मुंगूस जणू आपल्यालाच बघायला आला आहे' असा भाव करून त्याच्यासमोर बसली होती. तिच्या हालचालींनी मुंगूससारखा याच विश्वात वर्षानुवर्षं बरबटलेला किडाही घायाळ होऊ लागला होता. संवाद सुरू होण्यापुर्वी मनातील विचार शालनला बोलून दाखवणे अत्यंत आवश्यक वाटले त्याला.
मुंगुस - अभीभी .. ढीली नही पडी तू... अं?? सब वैसा का वैसा.. ग्राहक लेती है?? मैने सुना नही बहोत दिनसे.. बोल.. बोलती है तो बोलीभी लगवाके दिखाऊंगा..
शालन मुरका मारून नाही म्हणाली.
शालनदीदीबाबत असले उच्चार साहूला ऐकवणे शक्यच नव्हते. शालनच्या आजच्या उत्तान रुपाकडे साहूला पाहावेसेही वाटत नव्हते. पण इतक्यातच मुद्यावर येण्यात अर्थ नव्हता.
साहू - कैसे हो मुंगूस?
मुंगूसचाचा वरून मुंगूस असे आपले डिमोशन झालेले क्षणात खाडकन जाणवले मुंगूसला. चेहरा थंड करत साहूचा अदाज घेत तो बसून राहिला. साहूने एकदम खर्जातल्या आवाजात का बोलावे त्याला समजत नव्हते.
साहूची नजर कोवळी असणे शक्यच नव्हते. पंधरा वर्षे, तीही जडणघडणीची पंधरा वर्षे या ठिकाणी काढली होती आजवर त्याने! पण मुंगूसला स्वतःबाबत गर्व होता आणि साहूबाबत तुच्छता!
मुंगूस - बोल.. डिस्कोका क्या भाव लगारहा है??
साहू - तुम क्या लगाते हो भाव??
आणखीन एक टोचणी! 'आप' वरून 'तुम'! मुंगूस आता अधिक गंभीर झाला. त्याने पाहिले, गजू कोणतीही हालचाल न करता मान खाली घालून बर्यापैकी लांब बसलेला आहे. धोका आहे.
साहूने ते जाणले.
साहू - गजूचाचा.. आप स्टेशन जाकर रिझर्व्हेशन करके आईये..
गजूला मेसेज समजला. तो उठून सरळ खाली निघून गेला आणि दारात उभा राहिला. आता तो असल्याचे मुंगूसला समजणे शक्य नव्हते.
मुंगूस - कही.. जा रहा है क्या?
साहू - बॉम्बे..
मुंगूस - क्युं?
साहू - राऊरकेलाकी ट्रेन वहासे निकलती है..
मुंगूस - राऊर.. ओह ओ.. तो .. वापस जा रहा है गाव?? हमेशा के लिये??
साहू - डिस्कोकी बोली क्या है??
मुंगूस - अब बेचनेवाला तू है.. मै क्या बोलू?
साहू - पच्चीस सालसे यहा झक मार रहे हो क्या?
मुंगूस - बात ठीकसे कर... दवे कहते है मुझे दवे.. ये सामनेका रंगमहाल मैने बेचा था उस जमानेमे..
साहू - बेचा था ना? .. तो डिस्कोका भाव बताओ...
मुंगूस - क्या क्या है यहा??
साहू - ये दो मंझिल.. सोला कंपार्टमेंट, तीन बडे कमरे.. नीचे और उपर दो दो बाथरूम.. और.. शालनदीदी और गोपी छोडके बारा लडकिया और गजूचाचा..
मुंगूस - अडतालीस हजार...
साहू - काहेके??
मुंगुस - हर लडकीके तीन हजार... बिल्डिंगसे हमको क्या लेना देना? चाहो तो लडकीया वेलकमपे भेजदो?
साहू - तो.. सिर्फ लडकियोंकीही बोली लगती है..
मुंगूस - सवालही नही.. ये बिल्डिंग तो गंगाबाईकी भी नही थी.. बिल्डिंग बेचनेवाला तू कौन है??
साहू - तो... बिल्डिंग किसकी है??
मुंगूस - करंबेळकर करके कोई था पुराने जमानेमे.. उसका तो खानदानभी मरके चालीस साल हुवे है... गंगाबाई भी नही जानती थी के पेपर किसके नाममे हुवे बादमे..
साहू - मेरे नाममे हुवे...
ताडकन मुंगूस उभा राहिला.
मुंगूस - क्या बात करता है?? ** समझता है मुझे??
साहू - तुम खुदको जो समझो वो समझो.. पेपर बॅन्क के लॉकरमे है.. कल सुबहा दिखासकता हूं..
मुंगूस - जगहा कितनेकी??
साहू - अब तुम तो रंगमहाल बेचनेवाले खिलाडी हो.. तुमही बताओ..??
मुंगूस - बारा...
साहू - गोपी... वकील लेके आ..
मुंगूस - बारा लाख मंजूर है??
साहू - सिर्फ बारा लाख नही..
मुंगूस - तो फिर??
साहू - एक रात.. वेलकमपे..
खदाखदा हसू लागला मुंगूस!
मुंगूस - स्साले.. ... झरीना...??? या स्नेहा???
साहू - स्नेहा..
मुंगूस हसतच होता.
मुंगूस - स्नेहाका बुखार पुरे बुधवारको चढबैठा है.. क्या सौदा है.. बारा लाख अडतालीस हजार और स्नेहाके साथ एक रात! ..
साहू - मंजूर है??
मुंगूस - अमजदभाईसे बात करनी पडेगी..
साहू - दो ग्राहक खडे है बाहर..
मुंगूस - तो बेच दे उन्ही को फिर? इतना जल्दीमे है तो..
साहू - ठीक है.. जाओ तुम..
जड पावलांनी मुंगूस उठला होता. आपल्या इगोमुळे उगाचच चांगला सौदा हातचा जात आहे हे त्याला जाणवले.
मुंगूस - दोपहर मे आऊं क्या? बात करके?
साहू - आना है तो आओ.. मेरा सौदा उससे पहिले होगया तो भरोसा नही..
मुंगूस - बस क्या? येभी कोई बात है?? आं?
साहू - जप्ती देरहे होगे तो सौदा रखता हू खुला..
मुंगूस - क्या जप्ती.. ??
साहू - एक तो तुम खुद.. या फिर स्नेहा..
मुंगुसचा अंदाज होता की हा दहा हजार वगैरे अॅडव्हान्स मागेल बुकिंगसाठी! ही असली हिंदी पिक्चरसारखी मागणी करेल असे त्याला वाटलेच नव्हते. तो पुन्हा कुत्सित हसू लागला.
मुंगूस - बेटे... मुझे तो बात करनेके लिये जानाही पडेगा.. और स्नेहा तो यहा पैर भी नही रखसकती.. वो बोलीवाली लडकी है वेलकमकी..
साहू - मेरी मां भी थी.. बोलीवाली.. उसको तुम्हीने यहांसे निकाला था.. तुम कुछभी कर सकते हो.. मै जानता हूं..
मुंगूस या स्तुतीने हुरळला तरी रेश्माच्या विषयाने जरा गंभीर झाला. खोटे तरी वाईट वाटले हे दाखवणे आवश्यक होते.
मुंगूस - बेचारी रेश्मा.... मदद करनेकेलिये गयी वहा.. और खुदही मरगयी.. बहुत बुरा हुवा साहू..
साहू - हां... बहुत बुरा हुवा...
मुंगूस - देख... मुझे तो बात करनेके लिये जानाही पडेगा.. और ये ऐसे सौदे इतने आरामसे ऐसे फटाफट नही करते बेटा.. टाईम लगता है.. तू भी जरा सोच कुछ कम कर सकता है क्या.. दस एक लाखतक.. और मै भी अमजदभाईसे बात करता हूं..
साहू - गजूचाचा... वेलकमपे जाके मुंगूसका पयाम दे दे ना.. बोलना स्नेहाको यहां बुलाया है.. डिस्कोका सौदा हो रहा है... स्नेहा आनेपर बात करनेके लिये मुंगूस वेलकमपे चला जायेगा..
मुंगूस - (खाली दारात गजू आहे हे पाहून घाबरून) पागल है क्या? अमजदभाई नही मानेंगे..
साहू - और गजूचाचा.. साथमे शालनदीदी और रेखाकोभी लेजाईये.. हमारीभी जप्ती उनके पास रहेगी.. स्नेहाके सामने...
शालन आणि रेखाची स्नेहाशी काही तुलनाच नव्हती. स्नेहा दिवसाला पाच हजार कमवत होती. शालन एकही गिर्हाईक स्वीकारत नव्हती अन रेखा बुधवार पेठेला अन बुधवार पेठ रेखाला कंटाळलेली होती.
शालन आणि रेखाला घेऊन साहू जिना उतरला अन हळू आवाजात गजूशी काहीतरी बोलला अन परत वर आला. ते तिघे निघून गेले.
मुंगूस - कुछ.. ऐसा वैसा तो.. नही है ना दिलमे..??
साहू - क्या ऐसा वैसा??
मुंगूस - नही.. ये क्या चल रहा है सब..?? जप्ती क्या.. बोली क्या?? आं??
साहू - तुमको अभी जाना है तो चले जाओ... गजूचाचा और शालनदीदीको भेजदो वापस..
किमान मिनीटभर मुंगूस विचार करत होता. पटण्यासारखे नव्हते. पण सौद्याची इतकी घाई अजिबात असण्याची शक्यता नसली तरी शालनसारख्या बाईला साहू वेलकमवर अमजदच्या विळख्यात पाठवेल हे अविश्वसनीय होते. रेखाचा विशेष प्रश्न नव्हता. पण शालन कोठा चालवण्यातही तरबेज होती आणि या वयात मागणीही आली असती तिला बर्यापैकी! त्यात पुन्हा शालन अन रेश्मा जवळच्या होत्या हे सगळ्यांनाच माहीत होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनेक वर्षे अमजदचा शालनवर डोळा होता हे सर्वज्ञात होते.
मुंगुसने मनातच ठरवले. धोका तरी काहीही नाही. शालन एकदा तिकडे गेली की आपण सुरक्षित झालो. इथे आपल्याला कुणी काहीच करणार नाही शालन तिकडे असताना. त्यात पुन्हा अमजदभाईला सौदा मंजूर असला तर जर डिस्कोच त्याचे होणार असेल तर एक रात्र स्नेहाबरोबर साहू आला वेलकमवर तर काहीच फरक पडत नव्हता. आणि सौदा मंजूर नसेल तर निदान शालनला तरी वेलकमवर खेचणार होताच अमजदभाई! रेखा तर याची प्रेयसीच आहे. म्हणजे तिला अन शालनला परत आणण्यासाठी हा जीवाचे रान करणार!
मुंगूस - गजूके कानमे क्या बोला तुमने??
साहू - यही के भाई को बोलना बारा लाख और स्नेहाके साथ नाईट ऐसा सौदा है..
मुंगूस - ........ दस लाख ना?
साहू - बारा..
मुंगूस आता फारच निवांत झाला.
आणि इकडे तिघे तीन दिशांना पांगले होते. गजू वेलकम समोरच्या चहावाल्याकडे बसला होता. रेखा फरासखान्यावर तिचा एक ओळखीच हवालदार होता त्याच्याकडे गेली होती आणि....
.... आणि भर सकाळी तर्र होऊन सलोनीला मिठीत घेऊन आपल्या खोलीत कुरवाळत बसलेल्या अमजदसमोर अचानक अनेक वर्षांपासून त्याला हवी असलेली शालन प्रकटली होती..
चेहर्यावरच्या खरे वय अस्पष्टपणे दाखवणार्या एखाद दोन किरकोळ खुणा सोडल्या तर ...
द मोस्ट डिझायरेबल वूमन.. शालन
तिच्या पारदर्शक कपड्यांमधून आतवर पोचणारी आपली नजर तशीच ठेवून अवाक झालेला अमजद म्हणाला...
अमजद - मेरी जान..??? तू यहां?? अभी??
रेश्माशी शतृत्व असल्यामुळे आपले शालनशीही शतृत्वच आहे हे तिच्या बेभान करणार्या देहाकडे बघताना अमजदच्या लक्षात राहिलेले नसले तरीही सलोनीच्या व्यवस्थित लक्षात होते. सलोनी मधे पडली.
सलोनी - अय.. अंदर कैसे आगयी? बाहर बैठ.. किसने बुलाया तुझे??
एरवी या प्रश्नांवर शालनने सलोनीच्या श्रीमुखात भडकावली असती. पण आज वेगळे नाटक करायचे होते. शालनने रडका चेहरा करून मान खाली घातली अन पदराने डोळे टिपल्यासारखे केले.
ते पाहून अमजद पलंगावरून उठला अन तिच्या जवळ गेला.
अमजद या माणसाला इतक्या जवळून शालनने यापुर्वी एकदा किंवा दोनदाच पाहिले होते. डोंगरासारखा समोर उभा असलेला अमजद बघून क्षणभर तिच्या पायाखालची वाळू सरकली. याच माणसाने रेश्माला मारले हे आठवल्यावर ती आणखीनच घाबरलीही व संतापलीही! पण चेहरा मात्र रडवेलाच ठेवून ती उभी होती.
तेवढ्यात शालन आल्याची बातमी समजलेला कबीर धावत आत आला आणि अमजदने त्याला बोटांनीच जायची खूण केली. स्त्री असली तरी शालन घात करणारच नाही याबाबत कबीरला संदेहच होता. तो हळूहळू बाहेर गेला आणि दार लोटून बाहेरच चार पावलांवर बसला. मात्र! सलोनीचा जळफळाट सुरू झाला होता. आत्तापर्यंत सलोनीच्या रुपाच्या प्रत्येक डिटेल्सची भरभरून स्तुती करणारा अमजद एका क्षणात सलोनीला विसरला होता आणि त्याने शालनला जवळ ओढून घेतले होते. शालनने अमजदच्या छातीवर डोके टेकवले अन ती मुसमुसू लागली. अमजदने तिच्या पाठीवरून हात फिरवून अंदाज घेतला. बहुधा शालन कायमची वेलकमवर येण्याच्या विचाराने आलेली असणार! काही ना काहीतरी प्रॉब्लेम झालेला असणार डिस्कोवर! बहुधा साहूशी पटलेले नसणार! खाली झुकून अमजदने शालनचे तोंड वर केले अन तिच्या डोळ्यात डोळे मिसळले. आत्ता तरी हिला आपला आधार फार आवश्यक आहे असा भास निर्माण करायलाच हवा. मात्र सलोनीला हे दृष्य बघवत नव्हते. अमजद आणि सलोनी दोघेही पुरूष व स्त्रीची प्रातिनिधिक उदाहरणे होती. सुंदर स्त्रीला पाहून भाळणारा पुरुष अन दुसर्या स्त्रीमधे आपला पुरुष गुंततो आहे हे पाहून जळफळाट होणारी स्त्री!
सलोनी तिथे येऊन उभी राहिली.
सलोनी - काय गं? तू कशी काय इथे?
शालन अमजदला अधिकच बिलगली. अमजदचा आता स्वतःवरचा ताबा सुटायला लागला होता. त्याने शालनच्या पाठीवर दोन्ही हात ठेवून तिला आणखीन जवळ घेतली.
सलोनी - अय **.. इथे कशी काय आत्ता सक्काळची?? आं? तुझ्याशी बोलतीय ए ****
त्वेषाने सलोनीने शालनला अमजदपासून दुर करायचा प्रयत्न केला. शालन काही स्वतःहून दूर होईना अन अमजद सलोनीकडे पाहून म्हणाला..
अमजद - दस मिनीट बाहर रूक.. हमे बात करने दे....
अपमान अपमान! नुसता तडफडाट झाला सलोनीचा! सरळ आहे. शालन सावळी असली तरीही याही वयात सलोनीपेक्षा जास्त बोली लागण्यासारखी होती. त्यात डिस्को चालवू शकते म्हणजे वेलकमवर सलोनीच्या वरताण होणे तिला सहज शक्य होते. आणि अमजद पागल झालेला सरळ दिसत होते.
सलोनी - ये **** है.. इससे बात मत करीये.. *** करेगी ये ..
अमजदने थंड नजरेने सलोनीकडे पाहिले. त्याला राग आलेला पाहून मात्र ती घाबरली अन बाहेर गेली. जाताना तिचा अपमानीत चेहरा पाहून अमजदला काहीही वाटले नाही.
अमजद - आजा.. आजा इधर.. क्या हुवा?? अं? मेरे होते हुवे किसलिये रोती है तू?
शालन अमजदच्या पलंगावर त्याच्या शेजारी झोपली पण अजून मुसमुसत होतीच!
अमजद - अरे क्या हुवा??? बोलेगी भी? बोल..
शालन - बेचदिया..
अमजद - बेचदिया? ... क्या बेचदिया??
शालन - मुझे..
अमजद ताडकन उठून बसला.
अमजद - तुझे बेचदिया? मतलब?? किसने??
शालन - साहू..
अमजद हसायला लागला.
अमजद - वो क्या तुझे बेचेगा..
शालन - आप मजाकही कीजिये..
अमजद - किसको बेचदिया मेरी जान??
शालन - मुंगूस..
अमजदला ते नाव ऐकून किमान दोन तास नुसत्या उड्याच माराव्याशा वाटायला लागल्या. हे ट्रॅन्झॅक्शन परस्पर कसे काय झाले अन मुंगूसला इतकी अक्कल कधी आली हे त्याला समजेना! अत्यानंद झाला होता त्याला! पण तो दाखवणे योग्य नव्हते.
अमजद - मुंगूसको बेचदिया मतलब??
शालन - मुंगूस डिस्कोपर आया है.. मुझे यहां भेजा उसने..
अमजद - क्युं??
शालन - डिस्को बेचरहे है...
अमजद - डिस्को?? कौन बेचरहा है?? किसको??
शालन - साहू बेचरहा है..
अमजद - साहूका परदादा नही बेच सकता.. जमीन करंबेळकरकी है..
शालन - खरीदलीथी रेश्माने .. वो आदमीको ऐसे इलाकेमे जमीन नही चाहिये थी..उसने रेश्माको बेचदी थी
अमजद - अरे वो आदमी मरके जमाना होगया.. कितने लोगोंने कोशिश की डिस्को खरीदनेकी.. सरकारजमा होगी वो बिल्डिंग बादमे.. तुमको और हमको ** बना रहा है वो... जाके बोल मुंगूसको.. कोई सौदा नही करेगा..
शालनने खूप विचारमग्न चेहरा केला. आता अमजदचे लक्ष पुन्हा तिच्या जवळून दिसणार्या शरीरावर स्थिरावले. त्याने तिला पुन्हा झोपवून तिच्यावर ओणवा होत म्हणाला..
अमजद - लेकिन तू आयी है तो अब जा मत.. रानी बनेगी रानी.. आजा..
त्याला अजिबात राग येणार नाही अशा पद्धतीने त्याला हलकेच दूर करून शालन म्हणाली..
शालन - आपको हर बात मजाक लगती है लडकीकी.. मैने पेपर खुद देखे है जगहके... वकील कोठेपे आया था एक साल पहिले..
शालनच्या रुपाचा प्रभाव क्षणात पुसला गेला. विचारमग्न चेहर्याने अमजद उठून बसला. आता शालन मागून अमजदच्या पाठीवर डोके टेकत म्हणाली..
शालन - मुझे तो.. यहा आने के सिवा चाराही नही है..
अमजद - क्युं?
शालन - मुझे उसने मुंगूसको बेचदिया है सिर्फ तीन हजारमे.. मै तो आज रातके डेढ हजार कमासकती हूं.. अब मुंगूस मेरा क्या हाल करेगा???
अमजद - मुंगूस?? वो *** क्या करेगा? देखेगाभी नही तेरी तरफ..
शालन - आप अभीभी मजाकही कर रहे है.. मालिक होगा अब वो मकानका..
अमजद खूप वेळ हसला. नंतर म्हणाला..
अमजद - जबसे तेरी उमर बढरही है.. तू औरही जादा मालामाल हो रही है और तेरा दिमाग चलना बंद होगया है
शालन फुरंगटून बाजूला सरकली.
अमजद - अरे शालन.. मुंगूस ऐसे सब सौदे वेलकमके लिये करता है... मेरे लिये..
शालन - आप खुष रहिये गलतफहमीमे.. मुझे यहा रखरहे है या नही इतनाही कहिये..
अमजद - तुम तो अभी हमेशा यही रहोगी.. बॅग लेनेकेलिये भी वापस जानेकी जरूरत नही है.. लेकिन.. गलतफहमी मुझे नही.. तुझे हो रही है.. तू यहां धंदा नही करेगी.. मौसी बनजायेगी.. और सिर्फ मै और तू.. और कोई नही बीचमे..
शालन - गलतफहमी आपहीको हो रही है सर... डिस्को मुंगूस खुद खरीद रहा है.. आपके लिये नही..
धबधबा कोसळावा तसा अमजद हसत होता हे वाक्य ऐकून! कबीरसुद्धा पुन्हा डोकावून गेला.
शालन उदासवाणी बसली होती.. मृतवत थंड आवाजात ती म्हणाली..
शालन - मुंगूसकेलिये रामन और अण्णाने पैसा खडा किया है.. बारा लाख जगहके और अडतालीस हजार बारा लडकियोंके .. उसमे मै भी हूं.. इसके बाद मुंगूस डिस्कोपे बैठेगा.. दलाली नही करेगा.. और रामन और अण्णा सब बाकीका देखेंगे... फायदा बाटलेंगे..
सलग पाच मिनिटे अमजद पेग ढकलत शुन्यात बघत विचार करत होता. हळूहळू मुद्दा पटत होता. पटण्यासारखाही होता. मुंगूस स्वतःची प्रगती बघणारच! रामन अन अण्णा या जोडीला बेकार होऊन बराच काळ झाला होता. एकदम डिस्कोसारखी उडी त्यांनी मारणे म्हणजे भलतीच प्रगती होती ती!
हरामखोर आहे मुंगूस! त्या भोलाला दूर करून आपण मुंगूसला जवळ केले. आजवर काय नाही केले त्याच्यासाठी! प्रत्येक प्रकरणातून वाचवले. हवी ती मुलगी घेऊन जातो. दलाली नाही मिळाली तरी इथेच खातो. भरोसा नाही! कुणाचाही भरोसा नाही या दुनियेत!
अमजदच्या डोक्यात मोठे साळसूद भाव येत होते. स्वत तोच विश्वासास पात्र नव्हता. पण आत्ता मुंगूसचा त्याला भयानक राग आला होता. काहीही झाले तरीही मुंगुसने हे प्रपोजल आपल्यासाठी साहूशी डिस्कस करायला हवे होते हे वारंवार त्याच्या मनात येत होते. स्वतःचसाठी करायचे असेल तरीही आपल्याशी बोलल्याशिवाय करायला नको होते. त्या डिस्कोवर आपली गेले कित्येक वर्ष नजर आहे हे साल्याला माहीत आहे. मुंगूस खलास! आता या ***चे नाव घेऊ द्यायचे नाही वेलकमवर कुणालाही. भोला! ....आजपासून आपला अधिकृत माणूस भोला! मुंगूस आला की त्याला अशी अद्दल घडवायची की बास! आपल्याच तुकड्यांवर जगून आपल्याशीच गद्दारी करतोय!
शालन अमजदच्या उघड्या पाठीवरून आपली बोटे अलगद फिरवत होती. मधेच त्याच्या कानात ती गुणगुणली.
शालन - आप .. नाराज होगये??
आत्ता अमजदला जाणवले. आपण चेहर्यावरून इतके गंभीर वाटायलाच नको होते.
अमजद - तुम.. किसलिये आयी हो फिर? यहांपर??
फार सुरुवातीला विचारायला हवा होता तो प्रश्न मुर्खाने आत्ता विचारला होता.
शालनने आपली जीभ अमजदच्या कानावरून फिरवली अन म्हणाली..
शालन - अभीतक .. खयालमे नही आया??
अमजदने तिला किंचित दूर केले. शालन मनातच हादरली. काहीतरी चुकतंय खरं! अमजदची ही प्रतिक्रिया अजिबात अपेक्षित नव्हती.
आता तिने आव्हान स्वीकारले. अमजदकडे खोटे दुर्लक्ष करून ती उठली अन उभी राहून म्हणाली..
शालन - मुंगूस.. मुंगूस साडे बारा लाख रुपये खडे करता है..
अमजद दुखावला गेला हे तिला कळले..
अमजद - मतलब??
शालन - और.. वेलकममे कोई और नही है जो डिस्को खरीदसकता है..
अमजद - बोलती बहोत है तू.. जा अब..
शालन - मै सोच रही थी के आप अगर डिस्को खरीदलेंगे तो..
अमजद - .... तो??
शालन - तो मै वही रातभर बैठकर डिस्को चलाके आपको पैसा लाके देती थी और.. सुबह यहांपर अपनी जान हाजिर करती थी आपके सामने..
प्रस्ताव फारच सुंदर होता तिचा! आणि मुंगूस डिस्कोवर यायच्या आधी झालेल्या चर्चेत हा प्रस्ताव सुचवायचे तिला साहूनेच सुचवले होते.. साहूचे डोके फार सॉलीड चालले होते.. अजूनपर्यंत तरी सगळे काही ठरल्यासारखेच होत होते..
आणि मुख्य म्हणजे गेली दहा मिनीटे अमजद जो विचार करत होता त्यापेक्षा कितीतरी आकर्षक प्रस्ताव शालनने मांडला होता. डिस्कोसाठी दिलेले साडे बारा लाख दोन, तीन वर्षात वसूल! त्यानंतर नुसताच फायदा! परत डिस्को हे आपल्या सुखसोयी अन विलासांसाठी एक वेगळेच ठिकाण! वर परत शालन सकाळपासून दुपारी चारपर्यंत तरी इथेच.. आणि सर्वात मुख्य म्हणजे.. बुधवारात आपल्याइतके सामर्थ्य कुणाकडेच नाही.
अमजदने शालनच्या डोळ्यात डोळे मिसळले. कुठेही अप्रामाणिकपणा वाटत नव्हता.
अमजद - लेकिन.. डिस्को तो.. चलता ही नही.. फालतू लडकिया है सब कहते है...
निदान अमजद प्रस्तावावर सिरियसली विचार करतो आहे हे सुखावणारे होते. शालन आता उभी राहूनच बसलेल्या अमजदच्या जवळ आली.
त्याच्या खांद्यावर आपले हात रेलून खाली झुकत म्हणाली..
शालन - फालतू लडकिया महिने का चोबीस हजार मुनाफा दिलवाती है.. आपकी मर्जी होजाये तो.. यही मुनाफा सत्तरहजार हो जायेगा..
वेलकमला दर महिन्याला लाखभर रुपये सुटत होते सध्या! झरीना, कंचन आणि स्नेहा या तिघीच मुळी ऐशी हजारापर्यंत नेत होत्या कमाई!
अमजद - कैसे?
शालन - झरीना या कंचनको आप वहांसे बैठनेके लिये बोलदेंगे तो..
हाही विचार वाईट नव्हता. आपल्याच मालकीची इमारत आहे म्हंटल्यावर इथली एखादी चांगली मुलगी तिकडे बसली तर डिस्कोही चांगले चालणार होते.
अमजदला हळूहळू ते सगळेच प्रस्ताव फार आकर्षक वाटायला लागले. आणि त्याहून आकर्षक वाटायला लागले तोंडासमोर उभ्या असलेल्या शालनच्या ढळलेल्या पदरामागचे यौवन.. जे बरेच वर्षांपासून त्याच्या डोळ्यांत सलत होते.
तिच्या कंबरेला विळखा घालून अमजदने तिला खेचली आणि खट्याळ आणि समाधानी चेहरा करत शालन स्वतःच आपले कपडे सैल करू लागली. साहूची युक्ती बहुतांशी संपत आलेली होती आणि शालन बहुतांशी निर्वस्त्र झाली तेव्हा सलोनी आत डोकावत होती..
सलोनीने दार धाडकन आपटलेले पाहून अमजद जोरात हासला आणि शालनने त्याच्या मर्दानी हास्यावर फिदा झाल्यासारखे दाखवत प्रेमाची बरसात सुरू केली..
नाटक! हे नाटक अत्यंत अवघड होते. तीन तास भरत नाट्यमंदीराच्या स्टेजवर नटसम्राटचे किंवा कसलेतरी ऐतिहासिक किंवा पौराणीक डायलोग्ज म्हणताना भलेभले चुकतात.. पण अख्खा उमेदीचा काळ पुरुषांना भुलवण्यात व त्यांच्यावर भाळण्याचे नाटक करण्यात माहीर असलेल्या शालनला माहीत होते.. समोर असलेला पुरुष कामेच्छेने हळूच चोरून बुधवारात आलेला चांगल्या घरातील तरुण नाही.. बुधवार पेठेचे उसूल कोळून प्यायलेला अमजदभाई आहे.. ज्याने रेश्माला खलास केलेले आहे..
एक क्षणही अमजदला वाटले नाही की शालनच्या क्रिया प्रतिक्रियांमधे कृत्रिमता आहे.. हे खरे नाटक.. आतमधून मळमळत असताना.. स्वतःचाच तिरस्कार वाटण्याइतकी परिस्थिती असताना हसत हसत त्या परिस्थितीला सामोरे जाणे.. हे खरे नाटक..
आणि बघता बघता शालनही त्या नाटकात नकळत रमून गेली.. हे नाटक आहे हे विसरून गेली.. गेले कित्येक महिने तिने शरीरविक्रय बंद केलेला होता.. त्यातही... आलेच गिर्हाईक तरी चार नोटा फेकून जाताना आपल्याकडे ढुंकूनही बघणार नाही असली माणसे सगळी.. मात्र अमजद!
अमजदबरोबर कोणताही प्रत्यक्ष व्यवहार नव्हता.. फक्त एक मोठा प्रस्ताव मांडला होता.. अमजद तिला भोगल्याबद्दल नोटा फेकणार नव्हता.. आणि कित्येक वर्षे अमजदच्या मनात शालन होती... आज अमजदने त्या सगळ्या वर्षांची वासना पूर्ण करताना शालनलाही वेगळ्याच जगात नेले.. मात्र...
तासाभराने शालनला जाणीव झाली.. हे बरोबर नाही.. हा माणूस नालायक आहे.. जगण्याच्या लायकीचा नाही..
मनात आग अन शरीरात सुखावणार्या वेदना घेऊन ती उठली अन कपडे करून जायला निघाली.. जाताना पुन्हा अमजदचे हलकेच चुंबन घेऊन म्हणाली..
शालन - एक दहा हजार द्या... आगाऊ म्हणून देते साहूला..
अमजद - पाच हजार दे दे.. रातमे लादुंगा बाकी.. तू आरही है ना रातमे?? वेलकमपे??
शालन - ये भी कोई सवाल है?? लाईये .. पाच तो पाच...
अमजदने कुठूनतरी शंभरच्या पन्नास नोटा काढून तिच्या हातात ठेवल्या.
शालन उठून जायला निघाली.. आणि... दारातच थांबली अन मागे वळली..
अमजदची नजर अजूनही नुकत्याच भोगलेल्या धुंद करणार्या शरीराला चिकटलेली होती..
शालन - झरीना और कंचन ... सो रही होगी क्या?? या...
अमजद - .... क्युं??
शालन - एक बार डिस्को दिखादेती उनको... जिसे पसंद आयेगा उसे रखुंगी..
अमजद - सलोनीको पूछ.. मेरे खयालसे सो रही होगी दोनो..
शालन - और वो.. कोई.. ये भी है ना.. स्नेहा करके..
अमजद - स्नेहाभी सो रही होगी.. देखले.. बाहर सलोनी है..
शालन दार उघडून बाहेर आली. चारच फुटावर अत्यंत जळजळीत चेहरा करून दाराकडे बघणारी सलोनी उभी होती.. शालन जणू आपण मालकीणच आहोत अशा आविर्भावात म्हणाली..
शालन - स्नेहा को बुला.. कबीर.. जाओ स्नेहाको बुलाओ..
या वाक्याचा अर्थच समजत नव्हता दोघांना.. स्नेहाको बुलाओ काय?? अमजदभाई मूर्ख झाला का काय? स्नेहाला कशाला बोलवायचे हिने??
पण अमजदला वचकून होते दोघे.. आत जाऊन त्याला क्रॉस क्वेश्चन करणे चांगले झाले नसते...
कबीरने स्नेहाला उठवून आणले.. स्नेहाला येतानाच त्याने सांगीतले होते..
एकेकाळी बुधवार पेठ तुझ्याहीपेक्षा जास्त गाजवलेली शालनबाई आलेली आहे बाहेर.. तुला बोलवतीय.. अमजदभाईंना भेटून तुझ्यासाठी थांबलीय..
धक्का बसलेली अन घाबरलेली स्नेहा बाहेर आली अन दोघी एकमेकांना बघतच बसल्या..
ही बाई आपल्या वयाची असेल तेव्हा काय दिसत असेल असा विचार स्नेहाच्या मनात येत होता..
आणि पाच पाच हजाराच्या बोली आठवड्यातून दोन दोन का येत असतील हे स्नेहाकडे बघून शालनला आत्ता कळत होते...
शालन - चल.. डिस्को एक बार देख ले.. पसंद आता है तो जगह बदल.. नही तो आ इधर वापस..
तिच्या स्वरातील अधिकार अर्थातच सलोनी अन कबीरला दुखवून गेला. सलोनी सरळ आत गेली.
सलोनी - ये.. ये *** स्नेहाको डिस्को ले जा रही है?
अमजद - .... हं.. भेजदे उसको.. और सर मत खाया कर मेरा.. ठीक है????
डायलॉग कबीर अन स्नेहालाही ऐकू आला होता. स्नेहा सरळ शालनजवळ येऊन थांबली. बाहेर आलेल्या सलोनीकडे बघत शालन म्हणाली..
शालन - तुझे भी लेजाती.. लेकिन तुझमे जादू नही रही अभी.. गिर्हाईक पछतायेगा...
जळते लाकुड तोंडावर बसावे तसे ते शब्द आले सलोनीच्या कानांवर.. थिजून उभ्या राहिलेल्या त्या दोघांना तसेच सोडून अन बाकीच्या मुलींची उघडलेली तोंडे तशीच ठेवून स्नेहाचा हात धरत शालन वेलकममधून बाहेर पडली आणि..
स्नेहाचे लक्ष नाही असे बघून हळूच चहाच्या दुकानात लपलेल्या गजूच्या डोळ्यात लांबूनच डोळे मिसळून लाजरे हास्य चेहर्यावर आणत केदारी चौकाकडे चालत निघाली.
तोहफा...!!! तोहफा आणि वेलकमच्या आणि सगळ्याच इमारतींच्या सगळ्या खिडक्यांमधून त्या दिवशी फक्त बाहेर आलेली आणि थक्क झालेली मुंडकी लगडलेली दिसत होती. समोरच्या दृष्यावर विश्वास बसत होता. वाघाच्या गुहेत जाऊन एका शेळीने दुसरी जिवंत शेळी वाघासमोरूनच पळवली होती...
स्नेहा ही काय चीज आहे हे बाहेरच्या लोकांना.. जे बोली लावू शकणार्यातले नव्हते त्यांना.. आजच बघायला मिळत होते...
आणि गजू म्हातार्या चहावाल्याच्या गालावर हात फिरवून हसत म्हणत होता.. 'काय आजोबा.. यंदा पाऊस बिऊस हाये का न्हाय???'
लक्ष्मी रोड क्रॉस करताना सामान्य नागरिकही वयाने लहान अन सौंदर्याने महान असलेल्या स्नेहाकडे वळून वळून बघत होते...
आणि जेव्हा श्रीकृष्ण टॉकीजच्या गल्लीत ही जोडी आली..
तीही गल्ली भांबावून या दृष्याकडे पाहू लागली..
डिस्को! ते डिस्को डिस्को म्हणून सगळे सांगतात ते हेच.. स्नेहा कुतुहलाने विचार करत डिस्कोच्या पायर्या चढत होती...
साहू - आजा स्नेहा.. मै साहू हूं.. साहू... रेश्मा.. थापा.. ये शालनदीदी है.. यहांकी मेन मौसी.. ये गोपी है.. हमारा दोस्त है ये.. मुंगूसको तो तू जानतीही है.. आजसे तू यहांपे रहेगी..
शॉक लागावा तसा ताडकन उभा राहिला मुंगूस.. इकडे तिकडे बघत म्हणाला..
मुंगूस - ..क्क्या??
मागून गजू आला. त्याने मुंगूसची मान पकडली.
गजू - क्या?
मुंगूस - अरे?? अरे ये हमारी लडकी है.. छोड..
साहू उठला. मुंगूसच्या सण्णकन थोबाडात लावत म्हणाला..
साहू - मेरी मा.. रेश्मा.. डिस्कोकी थी.. तूही लेगया था ना वेलकम उसे??
एकंदर परिस्थितीने हादरलेला मुंगूस 'बघून घेईन' अशा थाटात बाहेर निघतानाच रेखा त्या हवालदाराला घेऊन आत आली.
रेखा - ये है साब वो.. मुंगूस.. एक तो दलाली करता है और लडकिया भगाता है.. अब ये स्नेहा यहांकीही है और उसे खरीदके ले जाना चाहता है..
शालन हातातल्या नोटा फेकत म्हणाली..
शालन - पैसे लेके आया था.. ये देखिये पाच हजार..
हवालदाराला आधीच फूस लावलेली असल्याने चांगलाच दमात घेऊन मुंगूसला त्याने तिथेच धुतला आणि घेऊन निघाला फरासखान्यात.. काहीतरी नवीन लफडे मिळाले की आठ पंधरा दिवस बरे जातात असा त्याचा सरळ व्यवहार होता... फारच सुंदर सुरुवात झाली त्याच्या या व्यवहाराची.. मुंगूसची पाठ वळल्या वळल्याच रेखाने हवालदाराच्या मागच्या खिशात पाच च्या पाच हजार कोंबले अन त्याच्याकडे मिश्कीलपणे बघत ओठांचा चंबू केला. हवालदार भलताच खूष झाला अन वरात गल्लीतून निघाली. मुंगूस सारखाच थपडा खात होता.
सगळी गल्ली बघत होती..
वेलकमचा दलाल पकडला गेला आणि.. वेलकमची हिरॉईन स्नेहा डिस्कोला आली..
असल्या बातम्या पसरायला वेळ लागत नाही तिथे.. एकच तासाने .....
चवताळलेल्या अमजदने लाथ घालून एक टीपॉय मोडला होता.. सलोनी त्याच्याकडे छद्मीपणे पाहात होती... आणि कबीरच्या चेहर्यावरील 'सायबाला याड लागलंय' स्वरुपाचे भाव पाहून अमजदने कबीरच्या तोंडात भडकावली होती.
जबरदस्तीने डिस्कोत जाणे शक्यच नव्हते. कारण मुंगूसवर केलेल्या पोलीसकेसमधे स्नेहा डिस्कोचीच मुलगी असल्याचे अन जबरदस्तीने वेलकमवर नेण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवला होता. आता सगळे पुराव्यानिशीच सिद्ध करावे लागणार होते आणि त्यात 'तेरी भी चूप मेरी भी चूप' हीच पॉलिसी बरी पडणार होती.
साहू.. रेश्मा.. थापा..
साहूचा पहिला वार पडला होता अमजदवर! आणि महिन्यात डिस्कोचा फायदा चोवीसवरून पन्नास हजारावर पोचला होता.. मात्र... आयुष्यात आज पहिल्यांदाच... साहूला स्वतःचा अत्यंत तिटकारा वाटत होता..
केवळ एक लहान मुलगी सुंदर आहे म्हणून तिला वेलकममधून फसवून आपण इथे आणले आणि तिच्या कमाईवर आता स्वतःचे राहणीमान उंचावायचे आणि शौक करायचे.. आजवर निदान वयाने मोठ्या बायका तरी होत्या.. आपली आईच होती... आज आपण ...
.... आज आपण हे काय केले?? अमजदवर वैयक्तीक सूड म्हणून हे असं...???
आज आयुष्यात पहिल्यांदा.. स्वतःला स्वतःच्या वाटणार्या तिरस्काराला धुण्याचा प्रयत्न करण्यासाठी...
साहू.. रेश्मा.. थापा.. यांनी शालनदीदीसमोर मदिरापान केले होते...
आणि त्याचवेळेस .....
बाहेरच्या खोलीत कुणीतरी सुटण्याची धडपड किंवा आवाज करत आहे असे त्याला भासले..
कुणीतरी शालनदीदीला म्हणत होते..
तो - कहां है गंगाबाई..
शालन - वो **** मरके चार साल हो गये..
तो - और इस्माईल??
शालन - इस्माईल.. वो पहलेही गुजरगया *****.. तुम.. इतने सालोंके बाद??
तो - हां! तू ... शालन है ना? अभीभी वैसीही लगती है..
शालन - ये कौन है..??
तो - भांजी है मेरी.. सोला साल की है.. कोठा कौन चलाता है फिर अब? तू??
शालन - नही.. कोई और
तो - इसको बॉम्बेसे बीस हजारकी बोली है.. यहां बोली लगानेके लिये किससे बात करते है अब???
शालन - साहूसे...
तो - ये कौन है?? लडकी है या लडका??
शालन - लडका..
तो - कौन है ये??
शालन - रेश्माका लडका..
बाहेर एक सुनसान शांतता पसरलेली समजली आतमध्ये साहूला.. तेवढ्यात शालनदीदीने आवाज दिला..
शालन - साहू.. ये लडकी लेके आया है देख.. भानू.. जो तुझे यहा लाया था पंधरा साल पहिले...
ग्रेट पन्च. पुन्हा निशब्द
ग्रेट पन्च.
पुन्हा निशब्द केलात राव.
मस्तच. साहूने चांगलाच बदला
मस्तच. साहूने चांगलाच बदला घेतला.
आता त्या भानूच काय होणार ? चांगलीच अद्द्ल घडवेल साहू.
पु.ले.शु
कथा सुस्साट चाललीय...
कथा सुस्साट चाललीय...
gr8 .......
gr8 .......
जबरदस्तच
जबरदस्तच
छान.....
छान.....
अल्टिमेट ! लगे रहो.
अल्टिमेट ! लगे रहो.
हम्म्म...चांगली चाललीये
हम्म्म...चांगली चाललीये कथा...येऊदे पुढचा भाग लवकर!
निशब्द
निशब्द
बेफिकिर, मस्त, १ च नम्बर.
बेफिकिर,
मस्त, १ च नम्बर.
आता भानू ला धुवुन काढा चांगला
आता भानू ला धुवुन काढा चांगला ..
पुन्हा निशब्द केलात छान....
पुन्हा निशब्द केलात
छान....
शेवटचं वाक्य पुढच्या
शेवटचं वाक्य पुढच्या एपिसोडची उत्कंठा ताणण्यास एकदम पुरेसं ठरतं....
पुनश्च अप्रतिम लेखन.
डॉ.कैलास
सर्वांना
सर्वांना अनुमोदन........
पु.ले.शु
भानु परत आला. अब तेरा क्या
भानु परत आला.
अब तेरा क्या होगा भानु !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
'सायबाला याड लागलंय'
'सायबाला याड लागलंय'
ओह! कथेने ईथे फारच मस्त मोड
ओह! कथेने ईथे फारच मस्त मोड घेतलाय.