गोगलगाय (बडबड कविता)

Submitted by सावली on 15 June, 2010 - 20:38

गोल गोल गोगलगाय
पानावरून घसरत जाय.
शिंगं डोक्यावर आणि डोळे शिंगावर
का ग तुझ घर पाठीवर?
हात मी लावला कि हरवून जातेस
सांगतरी पुन्हा कधी बाहेर येतेस?
सांग ना माझ्याशी खेळतेस काय?
गोल गोल गोगलगाय

गुलमोहर: 

Happy म्हणायला छान आहे.... बोबड्या बोलांनी ही कविता कशी म्हटली जाईल कल्पना केली आणि खुद्कन हसू आले!

छान