Submitted by कौतुक शिरोडकर on 26 September, 2008 - 01:32
बड्डेला तू गिफ्ट पप्पा आणशील काय ?
जे मी मागेन, ते तू मला, देशील काय ?
बोल ना....
बुटकेला भू..भू..एक
गोरी गोरी म्यॉंव
त्यांच्यासंगे करीन मी
रोज धावाधाव
शपथ सांगतो, काहीच मी फोडणार नाय
...जे मी मागेन...
आजोबा नि आजी
दूर गावाच्या घरी
कशी मग भेटेल मला
गोष्टीतली परी ?
घोडा घोडा करायची हौस फिटेल काय ?
...जे मी मागेन....
ताई नाही, दादा नाही
कुणाशी भांडू ?
खेळ्णी किती रे
पण नाही कोण भिडू
बाप्पाकडून छोटूकली बेबी मिळेल काय ?
...जे मी मागेन....
पप्पा तु रे ऑफिसला
मम्मी ती कामात
एकटा मी करू काय
मोठ्या या घरात ?
बघ ना टि.व्ही. माझ्याशी हा बोलतच नाय
...जे मी मागेन....
गुलमोहर:
शेअर करा
कौतुक
कौतुक कौतुकास्पद आहे कविता.
आभारी
आभारी आहे.
बहुतेक आपण दोघेचं इथे आट्यापाट्या खेळ्तोय. बाकी सगळे गुरूजींच्या क्लासला गझलाय नमः करताहेत. वाट पाहू.
(No subject)