तोंडली २ कप
वाटणासाठी
- खोबरं १ वाटी
- कडीपत्ता १०-१२ पानं
- चिंच ( आवडीप्रमाणे)
- गुळ
- कोथिंबीर
- गोडा मसाला
- मीठ
१. प्रथम एका तोंडल्यांचे २ काप अशी तोंडली चिरून घ्या
२. प्रेशर कुकरमधे चिरलेली तोंडली आणी १/४ कप पाणी घालून शिजवून घ्या.
३. वाटणासाठी दिलेले सगळे साहित्य मिक्सरमधून वाटून घ्या.
४. पातेल्यात फोडणी करून त्यात जीरं, हळद लाल तिखट घालून त्यात वाटलेला मसाला घाला.
५. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्या.
६. नंतर त्यात तोंडली घाला आणी जरूरी पुरते पाणी घालून उकळा.
७. भाजी एकजीव झाली की त्यात चिरलेली कोथिंबीर घाला.
१. तोंडल्यात शिजवताना जास्त पाणी घालू नये.
२. चिंच नसेल तर आमचूर पावडर घाला.
३. तिखट हवं असेल तर वाटताना हिरवी मिरची घालू शकता.
४. कांदा तेलावर परतून त्यात मसाला व तोंडली घालून पण भाजी छान होते.
गरम गरम भाकरी/पोळीशी खायला छान लागते.
पार्टीसाठी ग्रेव्हीवाली भाजी सगळ्यांना आवडते
सही दिसतोय गं.
सही दिसतोय गं.
सायलीमी, सगळं लिहुन
सायलीमी,
सगळं लिहुन घेतलयं....(तोंडली ही भाजी पुण्यात आल्यानंतरच पाहिली)
या आठवड्यात मिळेल अशी अपेक्षा !
.
.
तोंडली कुकरला शिजवली तर खुप
तोंडली कुकरला शिजवली तर खुप शिजत नाहीत का? डायरेक्ट मसाल्यात शिजवली तर कसे होईल?
मस्तच दिसतेय. करुन नक्कीच पाहीन.
तोंडली कुकरला शिजवली तर खुप
तोंडली कुकरला शिजवली तर खुप शिजत नाहीत का? >>> नाही शिजत जास्त.
मसाल्यात शिजवून पण चालेल. पण कुकरमधे शिजवली तर नंतर मसाला छान मुरतो.
छान वाटतिए, वाटण घालून कधी
छान वाटतिए, वाटण घालून कधी केला नाही तोंडल्याचा रस्सा.
करून पाहीन.