सोनियाचा दिवस आजी.... (तुमचे मत/प्रतिक्रिया)

Submitted by mansmi18 on 9 November, 2009 - 15:15

नमस्कार,

आज सोन्याने नवा उच्चांक गाठला. $११०० प्रति आउन्स..(रुपयांच्या हिशेबात अंदाजे १७२३३ रु तोळा...)
इ.स २००५ मधे $४६० प्रति आउन्स असलेले सोने आज जवळपास दुपटीने वाढले आहे. डॉलरचे अवमुल्यन, भारतात वाढत असलेली मध्यमवर्गाची आर्थिक सुबत्ता अशी बरीच कारणे दिली जात आहेत.
अमेरिकेचे डेफीसीट पाहता डॉलर मधे काही बळ येण्याची शक्यता (नजीकच्या काळात तरी) कमीच वाटतेय.

काय वाटते तुम्हाला? इथुन पुढे आणखी वाढेल का हा बुडबुडा आहे आणि कुठल्याही क्षणी फुटेल? (क्रूड तेल १४० वरुन ७० वर आले तसे)?

सगळ्यांच्या मताचे स्वागत्..(जाणकारानी विस्तृत लिहिलेत तर माझ्या सारख्या अज्ञजनाना मदत होइल).

धन्यवाद..

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१११० झाले हो.. आख्खा भारत MCX वर short position घेउन बसलाय. मी पण चांदी विकलीय Sad

पण येइल खाली हळुहळु....

माझ्यामते जो पर्यत शेअरमार्केट अस्थिर आहेत, Trend दाखवत नाही... मंदी नाहीशी व्हायची चिन्ह दिसत नाहीत... डॉलरचे अवंमूल्यन थांबत नाही... तोपर्यत सर्वजण संपत्ती सोने कमोड्टी मध्येच साठ्वणार कारण याघडीला आणि नेहमीच सोने हेच Purchaing Power maintain करते...

सामान्यांनी ह्यात आता शिरू नये... त्यांनी पहिले शेअरमार्केट/म्युचलफंडमध्ये पैसे गुंतवावे... आणि अतिरिक्त पैसे सोनामध्ये गुंतवा... कारण सोनामधील गुंतवणूक हि Purchaing Power maintain/ Portfolio balance करण्यासाठी असते... फायदा कमवण्यासाठी नाही... हा पण काहीना फायदादेखील होतो Happy

काल ब्लूमबर्ग वर ऐकलेली नवीन माहिती:
बर्नांकी काकानी सांगितलेय की २०१० मधे इंटरेस्ट रेट वाढण्याची शक्यता कमी आहे/अजिबात नाही त्यामुळे डॉलरची घसरण सुरुच राहिल. चीन किंवा इतर देशानी डॉलर अ‍ॅसेट कमी करुन पर्यायी सोने घ्यायचे ठरवले..समजा १% घ्यायचे ठरवले तरी $५०० बिलियन चे सोने ते खरेदी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या भावावर परिणाम व्हायची शक्यता आहे. डीसेंबर मधे प्रॉफीट टेकींग मुळे भाव कदाचित खाली जातील पण भविष्यात किंमती चढ्याच राहण्याची शक्यता..
त्या तज्ञाच्या मते $१८००-$२६०० (इन्फ्लेशन अ‍ॅड्जस्टेड) होउ शकते.
(पण तयार सोन्या ऐवजी गोल्ड ईटीएफ मधे गुंतवावे अशी एक सुचना केली आहे).

आजचा रेट - $११४४/आउन्स..

सोन्यात याक्षणी नविन गुंतवणुक करणे खूप रिस्की होईल. सोन्याचे भाव वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे.. जगभरातील central banks, (जसे की भारताची reserve bank of India, चीन इत्यादी) भरपूर सोने खरेदी करत आहेत. यामागेसुद्धा बरीच कारणे आहेत.. जसे की $ ची अस्थिरता, आर्थिक मंदीचे सावट/जखमा, गुंतवणूकीत विविधता इ.

हा short term trend ठरु शकतो.. म्हणुन सध्यातरी यापासुन थोडे लांब राहिलेलेच बरे.. Happy

Gold nosedives on heavy selling
5 Dec 2009, 1704 hrs IST, PTI

Gold prices nosedived by a whopping Rs 500 per ten grams to Rs 17,600, the steepest fall ever since the yellow metal started its record How to invest in gold breaking journey here, on aggressive selling triggered by a sharp plunge in its prices in the overseas markets.

http://economictimes.indiatimes.com/Gold-suffers-biggest-fall-dips-below...

आता खरोखरच सोन काहितरी अचाट किंमत दाखवेल अस वाटत आहे. युरो घसरत असताना ($ च्या तुलनेत) सोन वाढ्तय ... safe heaven..... Happy

Gold will always glitter
सोन्याच्या किंमती आत्ता परत वाढायला सुरू होतील, युरो घसरतय्च, पण आत्ता भारतीय बाजारात सोन्याची मागणी वाढू शकते, कारण लग्नाचा मोसम सुरू झालाय, तसेच आधिकाधीक लोक सोन्याकडे केवळ भावनिक ठेवा म्हणून न बघता उत्पन्न देणारी गुंतवणुक म्हणून पाहतायत.

http://moneyblogs.outlookindia.com/default.aspx?ddm=10&pid=2938&eid=24

Gold has traditionally been the refuge of those who mistrust the coin (or paper) of the realm - whether they are marginal farmers in the dust bowls of India, industrial workers in Korea, or the 'wolfpack' of the finance markets decried by a Swedish politician. Obama and his European counterparts would do better listening to them than designing instruments to shock them.

सोन्याने $१२४४ चा आकडा गाठल्यावर सोन्याला पुन्हा झळाळी मिळाली. त्यामुळे सोने आत्ताच घ्यावे का भाव थोडे खाली येऊदेत (केव्हा आणि किती खाली येईल कुणाला माहित??) मग घेऊ अशा शंका निर्माण झाल्यात. ज्यांनी सोन्यात आधीच गुंतवणुक केलीय त्यांना 'सोनियाचा दिवस अजी' ही भावना असेलच Happy

कुणी जाणकार या विषयी आधिक माहिती देऊ शकाल का?

रेडीफ संकेत स्थळावर काही चांगली माहिती दिलीयः

किंमती वाढण्याची काही कारणे :-
१) गोल्डमन सॅचेचा घोटाळा उघडकीस आला.
२) ग्रीसचे संकट ओढवले, व हा धोका इतर युरोपिअन देशात पसरू नये म्हणून युरोपीय संघाने १ट्रीलीअनचे बेलाऊट पॅकेज दिले.
३) या पॅकेज मुळे युरोपीय संघाचा वित्तिय तुटवडा दुप्पट झाला.

या कारणांमुळे डॉलरला मागणी आली व त्यामुळे फेडरल बँकेला आत्ता जास्त डॉलर्स छापावे (प्रिंट) लागतील. यामुळे डॉलर थोडा दुर्बल होऊन स्थिर मालमत्तेमध्ये मागणी वाढेल व त्यात सोने असेल.
सध्या असलेल्ल्या कर्जामुळे हे संकट अजून काही वर्षे चालूच असेल असा अंदाज आहे.

अशा घटनांमुळे करंसीची (रोख्यांची???) मागणी कमी होऊन सोन्याला मागणी वाढायची चिन्हे आहेत.
साधारणपणे डॉलर व सोने यांचे व्यस्त संबंध असतो, पण सध्या डॉलर पण मजबूत होताना दिसतोय व सोन्याला पण मागणी वाढलीय त्यामुळे हा संबंध सध्यातरी मागे पडलाय.

आत्ता गुंतवणुकीचे काही पर्याय म्हणजे फिजिकल सोने घेणे, जसे की दागिने, बिस्किट्स, नाणी इ. अथवा ETF स्वरुपात विकत घेणे.

पूर्ण माहिती:
http://business.rediff.com/slide-show/2010/jun/02/slide-show-1-bcrisis-w...

जमेल तितकी आणि जमेल तसे विकत घ्या आणि सोबत ठेवा... सोन्याचे आणि जमिनीचे भाव खाली जाणार नाहीत..

हा थोडे इकडे तिकडे ठीक आहेत पण जास्त खाली जायचे नाहीत..

आणि तेलाच्या किमती सुद्धा खाली जाणार नाहीत... Happy अजून भर-भर वाढणार नक्की...

गोल्ड मध्ये गुंतवणूक करण्याचे २ options आहेत.
१)गोल्ड ETF - it is used for trading(less comission/and charges)
२) गोल्ड मनी account - http://goldmoney.com?gmrefcode=1goldsilver1 (Long term)
मी २ वषा पासुन long term purchase साठी वापरत आहे.

Pals25 तुम्ही विपुत विचारलेल्या प्रश्नाचे इथे उत्तर देतो आहे.
सोने विकून चांदीची खरेदी करावी? - होय. मी कालच सोने विकून चांदीची विकत घेतली आहे.(ओसामा factor मूळे फक्त चांदीच का पडली माहित नाही.(and Oil)). Osama factor.jpg

$50 ला थोडा resistance आहे पण २-४ week मधे $५० क्रोस होईल. एकदा का $५० क्रोस की no resistance.
by mid July gold $1650-1700 and silver $55-60

चांदीचा profit ratio compared to gold is very high, so go for silver at the moment.

मला माहिती हवी आहे.... आज सोन्याचा भाव १० ग्रॅम ला ३०,००० रु. झाला आहे. तर सोन्यात गुंतवणुक करणे किती योग्य ठरेल? अजुन भाव वाढण्याची शक्यता आहे का?

please, मला कुणी द्या ना माहिती..... सोन्यात आता गुंतवणुक करणे किती योग्य आहे? अजुन वाढतील का सोन्याच्या किंमती?

>>> please, मला कुणी द्या ना माहिती..... सोन्यात आता गुंतवणुक करणे किती योग्य आहे? अजुन वाढतील का सोन्याच्या किंमती?
फिझिकल सोन्यात का ईटीफ मध्ये? ट्रेडींग साठि का लाँग टर्म साठी?

फिजिकल सोने घेण्याचाच विचार आहे. जसे की नाणी ....... पावसाळ्यात सोन्याच्या किंमती कमी होतात असे सर्व म्हणतात ते कितपत खरे आहे?

@ विद्याक, सोन्याच्या किंमतीचा आलेख नेहमी चढताच राहिला आहे. जर तुम्हाला लाँगटर्म साठी ईन्वेस्टमेंट करायची असल्यास सोन्याच्या नाणींमधे जरूर ईन्वेस्ट करा. खरेदी करताना बैंक, पोस्ट ऑफीस, ऑनलाईन सेलर्स आणि विश्वास ठेवण्यासारखे ज्वेलरी स्टोअर्स अशा जास्तीत जास्त ठिकाणी किंमतीची चौकशी करूनच खरेदी करा
( कुठे स्वस्तात मिळाली तर आम्हाला देखिल जरूर सांगा Wink )

हो जशी बँक मध्ये वगैरे दर-महिना गुंतवणुक करतो तशीच गुंतवणुक सोन्यात केली तर छानच.. अन विशेषत: नाण्यांमध्ये चांगलीच.

सुरेश१, प्रसिक , भावना.... धन्यवाद! प्रसिक, स्वस्तात नाणी मिळाली तर जरुर कळवेन....स्वस्तात म्हणजे किती स्वस्तात पाहिजेत???

Pages