आंधळ्याच नशीब

Submitted by शानबा५१२ on 31 May, 2010 - 03:22

अंधा-या रात्री चालत होता एक आंधळा
भुकेले पोट व घेउन सुका गळा
रात्र की दीवस त्याला न कळे,कसे कळणार होते डोळे आंधळे,
रस्त्यावरच्या वाहनांची गती ना कळली,
गतिमान गाडी त्याच्या देहावर वळली.
"परमात्म्याने ही सजा का दीली?",
कळायच्या आत हे,त्याची प्राणज्योत विझली.
गेला मात्र स्वर्गात्,भेटला परमात्मा,
दु:खी होउन 'त्याने',सोडला धरतीवर आत्मा.
आंधळ्याची ती आत्मा होती तर डोळस,
पाहुन धरतीवरील दु:ख झाला दु:खाचा कळस.
असह्य झाल्या त्या वेदना,गेला तो वरती,
म्हणे "काय पाहु ती दु:खी व लोभी धरती"
परमात्मा म्हणे , "तु दु:खी खाली पण व वरती,
काय कामाची तुझ्या ती सुंदर,रम्य धरती?"

Note : हे अकलीचे तारे आम्ही ईयत्ता ८/९वीत तोडले होते.

गुलमोहर: 

चांगली कविता आहे.
पण नक्कीच बालकविता नाहीये.
८/९वि मधे अस काय घड्ल की तुम्हि हि कठीण विषयावरचि कविता लिहिलित?

कविता छानच आहे. पण एक गंभीर विषय आहे.
लहान मुलांच्या कविता आनंदी उत्साही अशा असाव्यात असे प्रामाणिक पणे वाटते.

@ सावली

हे वाचुन मी फक्त हसुच शकतो.

@ सुनिता

हो खर आहे पण होत काहीतरी की अशा कविता सुचतात.

मी मायबोलीवर नवीन आहे.....एखाद्या प्रतिसादाला उत्तर कस द्यायच ???

जस मिपावर देता येत