बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( १. पूर्वानुभव : आमचे अनोखे बेबीसिटिंग ) : http://www.maayboli.com/node/16311
बांधवगडचे व्याघ्रदर्शन (२. बांधवगडची पहिली संध्याकाळ ) : http://www.maayboli.com/node/16317
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ३. दुसर्या दिवशी सकाळीच "कथा सफल-संपूर्ण" ) : http://www.maayboli.com/node/16366
( फोटोंवर टिचकी मारली तर फोटो मोठे बघता येतील. )
तेव्हढ्यात आमच्या गाईडच्या वॉकीटॉकीने बीप केले. टायगर शो अनाउंन्स झाला होता !
जंगलात जाऊनही कधी कधी वाघ दिसत नाही. मग पर्यटक फारच नाराज होतात. त्यावर या अभयारण्यांनी शोधून काढलेला उपाय म्हणजे हा टायगर शो ! वाघाने शिकार केली की तो त्या ठिकाणी काही काळ निश्चित थांबणार असतो, किंवा भरपूर खाणे झाल्यावर अंग थंड रहावे या साठी तो पाण्यात जाऊन बसतो. या आणि अशा परिस्थितीत वाघ काही काळ का होईना एका ठिकाणी बराच काळ थांबतो. मग पर्यटकांना हत्ती वरून तेथे नेऊन हा बसलेला वाघ दाखवता येतो. यालाच टायगर शो म्हणतात. या टायगर शो मध्ये वाघ अगदी जवळून बघण्याची संधी मिळते.
जंगलात प्रवेश केल्यानंतर आपल्याला या शोसाठी नाव द्यावे लागते. आमच्या गाईडने हे आधीच केले होते, अन त्या नुसार आमचा नंबर आला होता. म्हणून आम्ही परत फिरलो अन वाघिणीला बघायला निघालो. जंगलात शिरल्यावर पहिल्याच फेरीत आम्हाला वाघ अगदी जवळून बघायला मिळणार होता. या टायगर शो मध्ये फक्त एकच मायनस बाजू असते ती म्हणजे असा वाघ फारशा हालचाली करत नसतो, तो एकतर झोपलेला असतो, किंवा आपले खाणे खात बसलेला असतो, त्याची हालचाल, त्याची ग्रेस फारशी पहाता येत नाही यात. पण वाघ खुपच जवळून अन स्पष्ट पहाता येत असल्याने या टायगर शोला खुप महत्व असते.
जीपवरून हत्तीवर चढून मग आत जंगलात जायचे असते. स्वाभाविकच हत्ती जंगलातल्या रस्ते नसलेल्या आतल्या भागात जातो, त्यामुळे 'अन-टच्ड' जंगलही आपल्याला बघायला मिळते. पण हे हत्तीवर चढणे जरा जिकीरीचे असते. आधी जीपच्या सीटवर उभे राहायचे. मग सीटच्या पाठीच्यावर पाय देऊन दुसरा पाय जीपच्या चौकटीच्या बारवर ठेऊन हत्तीवर लावलेल्या छोट्या शीडीवर चढून हत्तीवर स्वार व्हायचे. मला लिहायला जेव्हढा वेळ लागला त्याच्या अर्ध्या वेळात हे आरोहण करावे लागते. ही कसरत अवघड खरी पण वाघ बघायचा या उत्साहात करून जातो आपण.
तर आम्ही हत्तीवर बसलो. अन हत्तीने झाडाझुडपातून वाट काढत आगेकुच केले. माहूत झाडांच्या फांद्या बाजूला करत होता अन आम्हाला ही तसे करायला गाईड करत होता. आम्ही उत्सुकतेने इकडे तिकडे बघत होतो. आमचे नशीब फार जोरावर होते. इतका वेळ एका ठिकाणी बसलेली वाघिण थोडी पुढे निघाली होती. आमच्या समोर अगदी दहा फुटावर ती आम्हाला पाठमोरी दिसली ती अशी,
माहुताने हत्ती पुढे नेला, तिला आमची चाहूल लागली. तिने मागे वळून पाहिले,
पण आमचे तिच्या मागे येणे तिच्या दृष्टीने फारसे गंभीर नव्हते. ती पुढे चालू लागली. वाघाला जंगलचा राजा का म्हणतात ते आता कळले. काय दमदार पावले टाकत, ती जंगलची अनभिशिक्त राज्ञी चालत होती. आम्ही तिच्या मागे आहोत, नाहीत याची तिला काही फिकीर नव्हती. ना आम्ही तिचे सावज होतो, ना तिला आमच्याशी काही कर्तव्य होते, ना ती आम्हाला घाबरत होती. आम्ही जणू तिच्या दॄष्टिने अगदी किडामुंगीच ! मला वाटतं हाच तिचा अॅप्रोच आम्हाला थक्क करून गेला. ना कोणाची भीती ना कोणाला जवाब देणे, मस्त आपल्याच धुंदीत ती पुढे चालत होती .
१०-१२ फुटावर खाली खड्डा होता. त्यात थोडे पाणी होते. तिथे जाऊन ती बसली. आता ती खाली खड्यात अन आम्ही खड्याच्यावर असे उभे होतो. हत्तीच्या पायाखाली साधारण २-३ फुटावर ती. आमच्या पायाखाली साधारण ८- १० फुटावर ती बसली होती. आमच्या हत्तीने पाय हलवला. बहुदा खालचे झुडुप थोडे दबले असावे. आम्ही तिच्या डोक्याच्या अगदी जवळ असल्याने तिला थोडे "डिस्टर्ब " झाले. तिने थोडे वर पाहिले. अन मधल्या छोट्या झुडुपातून तिचा मी अगदी क्लोज अप घेतला तो असा,
हत्तीने आपला पाय अजून हलवला तशी ती उभी राहिली अन अगदी थोडी गुरगुरली अन तिने आमच्या नजरेला अशी नजर दिली.अगदी "आय टू आय कॉन्टॅक्ट" !
त्याबरोबर हत्तीने स्वतःच पाऊल मागे घेतले. जंगलचा कायदा हातात घ्यायला हत्ती थोडाच माणूस होता? हत्ती आता सुरक्षीत अंतरावर आला. अजून २ मिनिट आम्ही तिला न्याहाळत होतो. पण आता माहुताला घाई झाली, दुसरे पर्यटक त्याची वाट पहात होते. आम्ही परत फिरलो. माहुताला तीन तीनदा धन्यवाद देत आम्ही खाली जीपमध्ये उतरलो. आता जंगलात काही दिसत नव्हतं. तिच्या नजरेने आमचा पूर्ण ताबा घेतला होता. आम्ही परतीच्या वाटेवर लागलो.
( ....पुढे चालू.... )
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ५. दुसरी संध्याकाळ ) : http://www.maayboli.com/node/16598
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ६. कल्लू आणि बल्लू ) : http://www.maayboli.com/node/16679
मित्रमैत्रिणींनो खाली माझी
मित्रमैत्रिणींनो खाली माझी फ्लिकरवरची बांधवगडची लिंक देतेय. तिथे अजून काही फोटो दिसतील
http://www.flickr.com/photos/30544338@N03/sets/72157607623939705/
सही.
सही.
आरती, मस्त लिहीलंयस. आम्ही
आरती, मस्त लिहीलंयस.
आम्ही तिच्या मागे आहोत, नाहीत याची तिला काही फिकीर नव्हती. ना आम्ही तिचे सावज होतो, ना तिला आमच्याशी काही कर्तव्य होते, ना ती आम्हाला घाबरत होती. आम्ही जणू तिच्या दॄष्टिने अगदी किडामुंगीच !>>>>>ये हुई ना बात.
मस्त!
मस्त!
खल्लास...! कसला सही अनुभव आहे
खल्लास...! कसला सही अनुभव आहे हा. वाचतानाच काटा आला अंगावर्.....वाघ इतक्या जवळ्...बापरे बाप..!
काय नजर आहे त्या वाघिणीची!
काय नजर आहे त्या वाघिणीची! खिळवून ठेवणारी! खल्लास!
अल्बममधील इतर फोटोजपण अतिशय सुरेख! मला पाठीवर उताणी झोपलेली वाघीण आणि माकडाचे पिल्लू खूप आवडले!
मस्त
मस्त
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो
पुढचा भागही टाकलाय .
सुंदरच आय टू आय एकदम बेस्ट.
सुंदरच
आय टू आय एकदम बेस्ट.
काय सॉलीड ..... आय टू आय
काय सॉलीड ..... आय टू आय कॉन्टॅक्ट आहे. फोटु पहाताना टरकते आहे. प्रत्यक्ष दर्शन ?
सुपर्ब वर्णन! फोटो तर
सुपर्ब वर्णन! फोटो तर अप्रतिम!