शाही ब्रेड पुडिंग

Submitted by मेधा on 30 May, 2010 - 18:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

शिळा हाला(challah) किंवा ब्रिओश ( Brioche) ब्रेड
६ अंडी
अर्धा कप साखर
अर्धा कप मास्कारपोने चीझ,
दूध,
बदामाचे काप
बदामाचा इसेंस ( ऐच्छिक )

क्रमवार पाककृती: 

एका स्टिलच्या पातेल्यात अर्धा कप साखर करपवून घ्यावी व हे करपलेले मिश्रण ( कॅरमेल ) एका ९ इंच व्यासाच्या ओव्हनप्रूफ भांड्याच्या तळाला व कडांना एक इंच पर्यंत पसरवून घ्यावे. हे गोल भांडे थोडावेळ ( ३० मिनिटे पुरतील ) फ्रीझमधे ठेवावे.

एक दिवसाचा शिळा ब्रिओश किंवा हाला ब्रेड (किंवा अंडं घातलेला कुठलाही गोडसर ब्रेड ) च्या अर्धा इंच जाडीच्या स्लाइसेस कराव्यात.

एका भांड्यात ६ अंडी , अर्धा कप मस्कारपोने चीझ( किंवा साधं सॉफ्टन केलेलं क्रीम चीझ ) २ -३ टे स्पून साखर एकत्र फेटावं. २टिस्पून व्हनिला इसेंस किंवा आल्मंड इसेंस घालावा. त्यात हळू हळू अर्धा कप दूध घालून फेटावं. ब्रेडच्या स्लाइसेस एकेक करून या मिश्रणात २-३ बुडवून मग तळाशी कॅरमेल लावलेल्या भांडयात रचाव्या . उभ्या, रेडियल टायर सारख्या दिसतील अशा रचल्या तर छान दिसते हे पुडिंग. मग उरलेलं दुध, अंड्याचं मिश्रण या स्लाइसेसवर ओतून , प्लास्टिक रॅप लावून हे भांडं फ्रीझ मधे १०-१२ तास ठेवावं.
नंतर ३२५ डिग्री फॅ वर १५-२० मिनिटे बेक करावं
मग यावर थोडे बदामाचे पातळ काप भुरभुर्वून परत १५ ते वीस मिनिटे बेक करावं.

ओव्हन मधून काढल्यावर कडांना सुरी फिरवून घ्यावी अन मग एका प्लेट वर हे भांडं उपडं करावं. ( हे करताना सांभाळून, ओव्हन मिटस घालावे व हे काम सिंकपाशी करावे ).
सर्व्ह करताना पाय च्या करतो तशा स्लाइसेस कापून सर्व्ह करावे

प्रत्येक स्लाइस वर थोडे थोडे फ्रेश व्हिप्पड क्रीम घालून खावे .

वाढणी/प्रमाण: 
६-८ लोकांकरता
अधिक टिपा: 

ह्याची सर्व तयारी आधी करुन ठेउन पाहुणे आल्यावर शेवटचं बेकिंग केलं तर आयत्यावेळि फारशी धडपड न करता गरम गरम स्वीट डिश सर्व्ह करता येते.
ब्रंचला कोणी येणार असतील तर आदल्या रात्री सगळी तयारी करायची.

माहितीचा स्रोत: 
इकडून तिकडून वाचून अन स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शूम्पी, कर आणि फोटो टाक. मला करपलेल्या साखरेचा फोटो दिसल्याखेरीज करायचा धीर असणार नाहीये...रेस्पि टेम्टिंग आहे कमी फक्त क्रमवार फोटोची Wink

मला खात्री आहे की यू टुऊबवर साखर करपवण्याचा व्हिडिओ असेल. चेक करायला हवा. नेट वर साखर न करपवता करता येणारे ब्रेड पुडिंग च्या वेगळ्या रेसिपीज पण आहेत.

आमच्या इथे रझूज(razzoo's ) म्हणून एक केजन रेस्टॉरंट आहे तिथे अल्टिमेट ब्रेड पुडिंग मिळतं. पीच पिकॅन ब्रे. पु. विथ रम सॉस.... टोटली यम्मी कॅलरी बाँब!