Submitted by supriya19 on 14 July, 2008 - 14:06
मी प्रथमचं माझ्या २ वर्षाच्या मुलीला घेउन भारतात जात आहे. २२ तासाचा प्रवास असल्याने खुप टेंन्शन आलयं. क्रुपया काही tips देउ शकाल का? तिला coloring ची आवड फारशी नाहि. पुस्तके नेईन मी. अजुन काही tips?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज्ञाती, येथे
ज्ञाती, येथे बघ
http://www.usairways.com/en-US/FAQs/newpolicy.html#lapchild
कार सीट चेक इन करून देतील फ्री. याबाबतीत अजून बर्याच एअरलाईन मधे तसेच नियम आहेत.
कार सिट आणी स्ट्रोलर नेता
कार सिट आणी स्ट्रोलर नेता येइल. (बेस गाडितच असु दे! गाडि मुव्ह करणार असाल तर , )कार सिट बेस शिवाय लावता येते.कार सिट आणी स्ट्रोलर विमानाच्या दाराशी द्यावे लागेल.
आपल्याला चेकईन मध्ये एकच बॅग
आपल्याला चेकईन मध्ये एकच बॅग अलाऊड असते की दोन असतात? लक्षात नाही.
------------------------------------------------------------------
आम्ही काँटीनेंटल ने जात आहोत..५० पाउंडच्या २ बॅग्स चेक इन (माणशी) करता येतात.
ज्ञाती कारसीट आणी स्ट्रोलर
ज्ञाती कारसीट आणी स्ट्रोलर गेट वर द्यायचा आणी बेस स्वतः जवळ ठेवायचा केबीन लगेज मधे.बेस पण चेक इन करता येतो पण इथे एक दोन जणांकडून तो हरवल्याचे ऐकले होते. मी आर्याला चार महिन्याची घेऊन गेले होते डोमेस्टिक फ्लाईटने तेव्हा असंच केलं होतं. एक्स्ट्रा चार्ज नाही लागत.
सॉरी डोमेस्टिक आहे लक्षात
सॉरी डोमेस्टिक आहे लक्षात नाही आले.
५० पाउंडच्या २ बॅग्स चेक इन
५० पाउंडच्या २ बॅग्स चेक इन (माणशी) करता येतात.>>> ते ईंटरनॅशनल ला. डोमेस्टिक ला बहुतेक एअरलाईन बॅग चेक-इन ला चार्ज करतात. साउथवेस्ट सोडून.
जेटब्लु ला पण डोमेस्टिक साठी
जेटब्लु ला पण डोमेस्टिक साठी १ बॅग चेक ईन अलाऊड आहे.
पुढच्या महिन्यात भारतात जायचे
पुढच्या महिन्यात भारतात जायचे आहे, एकटीनेच्.बरोबर ४ १/२ वर्शांची लेक आहे.मला काही प्रश्न आहेत,
-अम्ब्रेला स्ट्रोलर ची गरज आहे का?ती चालते भरपूर, पण नवीन ठिकाणी कशाची भीती वाटली की सरळ आई कडेवर चालू होते.
-ती दिवसासाठी नीट पॉटी ट्रेन्ड आहे, पण रात्री एकदा तिला उठवून न्यावे लागते.तिला रात्री पुल अप्स लावावे की जास्तीचे कपडे ठेवावेत् ?(ते तसेही ठेवीनच).म्हणजे मला चुकून जाग आली नाही तर..
-वरच्या टिप्स छान आहेत्.पण कोणी ह्या वयाच्या मुलांबद्द्ल पण अजून काही सांगू शकेल का प्लीज?
मला एक मुलीबरोबर प्रवासासाठी
मला एक मुलीबरोबर प्रवासासाठी म्हणून पोर्टेबल डीव्हीडी प्लेयर घ्यायचाय. कारमध्ये चार्ज करता येउ शकेल असा. कुणाला अनुभव असल्यास प्लीज सुचवा.
मी मागच्या थँक्सगिव्हींगला
मी मागच्या थँक्सगिव्हींगला घेतला फिलीप्सचा. चांगला आहे. प्रवासात खूप उपयोगी पडतो.
सव्वा वर्षाच्या पिल्लाला घेऊन
सव्वा वर्षाच्या पिल्लाला घेऊन कॅलीफोर्नीयातून भारतात जायचे आहे. तर मला एक प्रश्न आहे:
- प्रवासाचा लेग-ब्रेक-अप त्यातल्या त्यात सोईचा कसा पडेल? दुबईवरून : १६ तास दुबईला + ३ मुंबईला की लंडनवरून : १० तास लंडनला + ९ तास मुंबईला ? किंवा हाँगकाँग वरूनः १५ तास + ६ तास?
शिवाय मुंबैत रहात नसल्यामुळे, त्याच्यापुढे + ७-८ तास घरी पोचायला.
एकुण प्रवास जेव्हढा लहान
एकुण प्रवास जेव्हढा लहान तितके उत्तम
मधला ब्रेक आयडियली २ तासाचा हवा.
१० + ९ मला जास्त आवडतो.
माझ्या अनुभवाप्रमाणे तान्ह्या
माझ्या अनुभवाप्रमाणे तान्ह्या बाळाला १५-१६ तासाची फ्लाइट सोयीची पडते.
१-२ वर्षाच्या मुलांसाठी १०+९ बरे आहे. मध्ये २-३ तास हॉल्ट असेल तर खेळता येते. मग पुढच्या विमानातले सुरुवातीचे ३-४ तास निवांत जातात आपले.
आम्ही कायम लहान मुलांना घेउन
आम्ही कायम लहान मुलांना घेउन कोरियन ने आलो सॅ.फ्रा. वरून (एल ए वरूनही सर्विस आहे) - साधारण १३+९ पॅटर्न आहे, पण परतीचा वेळ आणखी कमी आहे (१०+८ बहुधा). कोरियनची सर्विस अत्यंत चांगली आहे - लहान मुलांशी वागणे वगैरे एकदम मस्त.
फक्त त्यांच्या फ्लाईटमधे "क्रिब्स" कमी असतात असे वाटले होते. खात्री करून घे पाहिजे तर आधीच. आणि दुसरे म्हणजे मुंबईत ती फ्लाईट साधारण १ का २ च्या सुमारास पोहोचते मध्यरात्री आणि परतीची ३/४ वाजता निघते पहाटे.
बर्याच दिवसांनी हा धागा वर
बर्याच दिवसांनी हा धागा वर काढतेय

भारत वारी करतोय १७ डिसेंबरला. वरचे सगळे पोस्ट्स वाचून ८०% शंकासमाधान झाले आहे.
तरी एक पिल्लू सोडते
बॅसिनेटची रिक्वेस्ट टाकूनही जर मिळाले नाही तर ६ महिन्याच्या बाळासाठी एअर इंडिया काही सोय करतात का? कोणाला काही अनुभव? एका मैत्रीणीने चक्क खाली झोपवले होते ब्लँकेट टाकून.
माझ्याबरोबर माझी मुलगी (५ वर्ष) आणि ६ महिन्याचा मुलगा असणार आहे. डायरेक्ट फ्लाईट आहे (१४ तास) पण मांडीवर घेऊन बसणे प्रचंड अवघड जाईल. जेवणार कसे आणि सगळेच प्रश्न पडलेत..
अजून काही टीप्स असतील तर नक्की सांगा आणि ते चिल्ड्रन मिल खरंच असं काही मिळतं का? ऑप्शन मधे दिसतंय. कोणी घेतलंय?
Pages