Submitted by मृदुला on 25 May, 2010 - 15:58
कुंड्यांमध्ये मिरचीची रोपे लावली आहेत. साधारण १ महिन्याची आहेत. सगळ्या रोपांना ६ ते १० पाने आली आहेत. अचानक काही रोपांची पाने सुकून गळून पडू लागली आहेत. अगदी नव्या पालवीतली छोटी पानेही गळाली आहेत एक दोघांची. ही कीड असावी की मी ऊन / पाणी कमी/जास्त देते आहे?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कीड दिसते आहे का? दिसत नसेल
कीड दिसते आहे का? दिसत नसेल तर कीड नसावी. पाणी कमी पडणे, हवेतली humidity कमी होणे, सूर्यप्रकाश कमी पडणे यामुळेही होऊ शकते. कुंडीतली माती नीट भुसभुशीत आणि पाणी नीट ड्रेन होते का पहा.
पाणी कितीवेळा घालता, किती
पाणी कितीवेळा घालता, किती घालता?
माझ्या मते पाणी जास्त आणि
माझ्या मते पाणी जास्त आणि उन्ह कमी झालेल आहे. मिरचीला उन्ह खुप लागत. consistent ८०/८५ च्या वर Temp गेल कि भरपुर मिरच्या लागतात.
पाने उलटुन बघ बारिक कीड दिसते
पाने उलटुन बघ बारिक कीड दिसते आहे का. मिरची बहुतेक लवकर बळी पडते कीडीला - असे माझे दोन वर्षाचे निरिक्षण आहे.
अर्थात लालु आणि सीमाने बेसिक्स सांगितले आहेत ते लागु पडतातच मिरचीला.
काही पानांवर फिकट पिवळे ठिपके
काही पानांवर फिकट पिवळे ठिपके आले आहेत. पण काही बिनठिपक्याचीच कोमेजून चालली आहेत.
मी एक कुंडी ऑफिसमध्ये ठेवली आहे, आणि तिच्यातल्या रोपाचीही पाने कोमेजू लागली आहेत. (म्हणजे किडीचा संसर्ग घरच्या कुंड्यांना झाला म्हणावे तर ऑफिसातल्या रोपाला पण कसा काय झाला?)
ऊन - बर्यापैकी आहे.
खरं म्हणजे गेल्या आठवड्या उन्हाळा वाढला आणि तेव्हापासूनच पाने कोमेजू लागली आहेत.
पाणी साधारण दोन दिवसांनी देते. कुंडीतली माती ओलसर दिसली नाही तर आधीही देते कधी कधी.
उन्हाळ्यात दोन दिवसांनी
उन्हाळ्यात दोन दिवसांनी म्हणजे जास्त अंतर वाटतय मला.
मी इंग्लंडात आहे! तपमान २० ते
मी इंग्लंडात आहे! तपमान २० ते २५ आहे इथे.
मिरचीच्या जोडीला बरीच कोथिंबीर लावली आहे. ती जोमाने वाढते आहे.
असो. सल्ल्यांबद्दल आभार. रोपे पूर्ण जळून वगैरे गेली नाहीयेत. तग धरून आहेत अजून, त्यामुळे बरे आहे.
मला ही युकेतली साईट मिळाली.
मला ही युकेतली साईट मिळाली. http://www.annavalleychillies.co.uk/
इथे वाढीसाठी टिप्सही आहेत.
http://www.annavalleychillies.co.uk/shop/page/2?shop_param=