बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( १. पूर्वानुभव : आमचे अनोखे बेबीसिटिंग ) : http://www.maayboli.com/node/16311
कान्हाचा मस्त अनुभव पाठीशी होता. त्यामुळे पोस्ट दहावी सुट्टी जंगलातच जाऊन सेलिब्रेट करायची असा माझा अन माझ्या लेकाचा बेत होता. आता पुन्हा कान्हाला जायचं की दुसरे जंगल गाठायचे हे ठरत नव्हते. लेक कान्हासाठीच अडून बसला. मग फोलिएजमध्ये गेलो. तिथे सगळ्यांनी बांधवगडचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की दुसरी सगळी जंगलं पहा अन मग वाटलं तर पुन्हा कान्हाला जा. हे फारच छान वाटल्याने, पुन्हा कान्हाला जायच्या बोलीवर लेकाने संमती दिली.
फोलिएज ही पुण्यातली एक पर्यटक संस्था. आम्हाला दोन्ही वेळेस त्यांचा अनुभव खुप छान. लहान मुलांचे गृप ही ते घेऊन जातात. ( माझा त्यांची जाहिरात करण्याचा उद्देश नाही. फक्त माझा अनुभव सांगते आहे.)
तिची साईट ही www.foliageoutdoors.com )
सगळ्या जंगलात जायचे म्हणजे पुण्याहून खुप लांबचा प्रवास करावा लागतो. बरं उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात प्राणी अस्तात्,अन झाडी, गवत थोडे कमी असल्याने प्राणी दिसणे सोपे जाते त्यामुळे उन्हाळ्यातच हा प्रवास करावा लागतो. तरच तो कारणी लागतो.
बांधवगड म्हणजे मध्यप्रदेशातले अभयारण्य ! जबलपूरपर्यंत ट्रेनने जाऊन मग जवळजवळ ६ -७ तासाचा जीपचा प्रवास. बरं ट्रेनच्या वेळाही अशा की जीपचा प्रवास म्हणजे अगदी भट्टीतून तावून सुलाखून निघणार. पण काय करणार. काही मिळवायचं तर घाम गाळावाच लागणार ना
तर आम्ही बांधवगडला पोचलो तो पर्यंत संध्याकाळ झाली होती. पण तरी ही जंगलाला सलामी द्यायला हवी म्हणून सगळे एक फेरफटका मारायला निघालो. फोलिएजचे सगळे मार्गदर्शक फारच मदतखोर अन माहिती अगदी झाडं, पक्षी, प्राणी, किटक सगळ्याची तपशीलवार माहिती देणारे. या वेळेस आमच्या बरोबर होते, देवेन्द्र, अनघा , आदित्य होते. रिसॉर्टच्या दारातच छोटेसे तळे होते, अन त्यातल्या कमळांनी आमचे स्वागत केले.
गप्पा मारत थोडे पुढे गेलो अन तेव्हड्यात कोणीतरी डावीकडे लक्ष वेधले. जंगलचा रात्रीचा रखवालदार आमच्याकडे पहात होता.
थोडे पुढे झालो अन उजवी कडे नजर गेली. समुद्रावरचा सुर्यास्त, डोंगरावरचा सुर्यास्त पाहिला होता. पण मोकळ्या माळरानावरचा- देशावरचा सुर्यास्त प्रथमच बघत होते तो हा असा...
अंधार होत आला ,सगळेच थकले होते अन उद्या जंगलात जायचे तर सकाळी सव्वा चारला उठायचे होते. आम्ही परत फिरलो.
जंगलात जायचं तर काही गोष्टींची माहिती हवीच.
१. सहसा जंगलात जायच्या वेळा सकाळी ६.०० ते १०.३० अन संध्याकाळी ४.३० ते ६.३० अशा अस्तात. त्या त्या जंगला नुसार अन ऋतुनुसार यात बदल असतात. पण असे असले तरी पहाटे सव्वापाचलाच आपल्याला निघावे लागते. कारण जंगलाच्या पहिल्या गेटवर जीपच्या रांगा लागतात. त्यात आपली जीप पहिल्या ३-५ मध्ये असली तर चांगले पडते. जंगलात साधारणतः ३-४ रस्ते असतात. एकदा का माणसांची वरदळ वाढली की पक्षी, प्राणी जंगलात आत आत जातात. विषेशतः अस्वलं अन पक्षी . त्यामुळे पहिल्या गेटवर आपली पहिली गाडी असेल असे पहावे. त्यासाठी आपल्या जीपमधील सहसद्स्यांशी बोलून ठेवावे.
कान्हाला आमच्या याच सवयीमुळे आम्हाला पहिल्याच दिवशी अस्वल बघायला मिळाले होते
२. जंगलात जाताना आपले कपडे जंगलात सामावून जातील असे हवेत . जसे हिरवा, पिवळा, तपकिरी अन या रंगाच्याही मातकट शेड्स असतील असे पहावे. विषेशतः पक्षी निरिक्षणावेळी याचा फायदा होतो. अन कोणतीही सेंट्स, सुगंधी पावडरी ही वापरू नका, त्यानेही पक्षी, प्राणी लांब जातात. आमचे मार्गदर्शक तर आंघोळीही करू नका म्हणत
३. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जंगलात जायचे तर आपल्या तोंडावर आपला प्रचंड ताबा हवा. जरा जरी आवाज झाला तरी पक्षी, प्राणी लांब जातात. वाघही फार आवाज असेल तर आपली वाट बदलतो. त्यामुळे जंगलाच्या आत गेलं की आपल्या तोंडाला कुलुप लावायचं. याचा एक फायदाही होतो. आपण जंगल जास्ती चांगल अनुभवू शकतो. आपणही जंगलातले आवाज ऐकू लागतो, समजू लागतो
४. आपला गाईड आणि जीप चालक याच्यावर पूर्ण विश्वास टाकावा. ते तुम्हाला जास्तीत जास्त जंगल दिसावं असाच प्रयत्न करत असतात. पण शेवटी वाघ दिसणं - न दिसण हा केवळ नशीबाचा भाग असतो. अनेकदा प्रवासी वाघ दाखवा, वाघ दाखवा असा लकडा लावतात. मग तेही कंटाळतात. खरं तर वाघ नुसता तिथ्र आहे हा अनुभवही आपल्याला वेगळी अनुभुती देऊन जातो. कान्हाला आम्हाला एकदा असाच अनुभव आला होता, लिहिन पुढे कधी तरी.
(.....पुढे चालू )
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ३. दुसर्या दिवशी सकाळीच "कथा सफल-संपूर्ण" ) : http://www.maayboli.com/node/16366
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ४. टायगर शो ! ) : http://www.maayboli.com/node/16543
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ५. दुसरी संध्याकाळ ) : http://www.maayboli.com/node/16598
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ६. कल्लू आणि बल्लू ) : http://www.maayboli.com/node/16679
आरती, फोटो झकास आलेत. विशेषतः
आरती, फोटो झकास आलेत. विशेषतः शेवटचा सूर्यास्ताचा फोटो तर फारच सुरेख आलाय. काही सॉफ्टवेअर वापरून कॉपीराईट टाकता येतो का बघ त्त्यात. माबोवर मागे कोणीतरी माहिती दिली होती ह्यावर. प्रत्येक दिवसाच्या जंगलातल्या ट्रीपवर एक लेख करता आला तर पहा. वाचायला सोपं जाईल.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
जंगल यात्रा घडली.
जंगल यात्रा घडली.
सुंदर फोटो आणि अप्रतीम वर्णन
सुंदर फोटो आणि अप्रतीम वर्णन
जंगलयात्रा वर्णन व फोटो,
जंगलयात्रा वर्णन व फोटो, दोन्ही मस्त!
प्राणी दिसणे सोपे जाते
प्राणी दिसणे सोपे जाते त्यामुळे उन्हाळ्यातच हा प्रवास करावा लागतो. तरच तो कारणी लागतो. >>
"जंगल अनुभवणे" हा सुध्दा नितांत सुंदर अनुभव आहे.
सुंदर वर्णन आणि सुर्यास्त तर
सुंदर वर्णन आणि सुर्यास्त तर अह्हा...
मस्त चालु आहे लेखमाला
मस्त चालु आहे लेखमाला
धन्यवाद तुमच्या
धन्यवाद
तुमच्या प्रोत्साहनाने पुढचा भाग लिहितेय - पहिल्या दिवशीच "कथा सफल-संपूर्ण"
छान, मस्तच सफर घडतेय
छान, मस्तच सफर घडतेय
छान!
छान!
सुर्यास्त खुप म्हणजे खुपच
सुर्यास्त खुप म्हणजे खुपच सुंदर !!! वर्णन छानच
जंगलयात्रा, 'मंगल'यात्रा
जंगलयात्रा, 'मंगल'यात्रा
छान, मस्तच सफर घडतेय
छान,
मस्तच सफर घडतेय
आरती, वर्णन छान. टीप्स तर
आरती, वर्णन छान. टीप्स तर खूपच आवश्यक.
अफ़लातुन आहे हा सगळा अनुभव !!!
अफ़लातुन आहे हा सगळा अनुभव !!!