आता मात्र ठरवलं... बास झालं.... जेव्हा आरश्यामधे ही स्वतःची प्रतिमा मावेनाशी झाली तेव्हा काहीतरी केलंच पाहिजे... अगदी ६० नाही पण निदान ७०/७५ पर्यंत खाली उतरलंच पाहिजे... (वजन हो..!!) अगदी चवळीची शेंग नाही पण निदान मटारची किंवा शेवग्याची शेंग तरी व्हायचा प्रयत्न केलाच पाहिजे.. तसही बरेच दिवसांपासून त्या कोपर्यावर उघडलेल्या हेल्थ क्लब च्या आत जाऊन "बघायचंच" होतं... एकदा ठरलं आणि तयारी पण जोरात सुरू झाली.. मॉल मधे जाऊन Nike चे t-shirts, Rebok ची track pant, Adidas चे shoes आणले.. (सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे ना !!), आयपॉड मधे गाणी भरली, recharge केला, Cover आणालं, हेल्थ कल्ब मधे जाऊन नाव नोंदवलं, nutrionist ची appointment घेतली आणि ह्या खुषीत येता येता फक्त १ पायनॅपल संडे खाल्लं..
प्रथम ग्रासे का काय म्हणतात तसं nutrionist नी सांगितलं नुसत्या व्यायामाने काय होणार "जिव्हानियंत्रण" हवं (हा आपला माझा शब्द... हल्लीच्या इंग्रजाळलेल्या मुलांना काय येणार असं शुद्ध मराठी) डाएट च्या नावाखाली दिवस भर उपवास (तरी सकाळी खाल्लेले २ पेढे आणि थोडे चिप्स सांगितले नाही instructor ला) २० मिनीटं ट्रेड मिल, त्यानंतर १५ मिनिटं स्टेपर, सगळी स्नायू हलवून टाकणारे स्ट्रेचेस आणि हे सगळं करूनही वर कोक, ज्यूस न पिता भयंकर रंगाचा बीट आणि गाजराचा रस... कसं व्हायचं आपलं????????????
********************************************************************
नियम :
१. शब्दमर्यादा २००० शब्द.
२. एक आयडी कितीही प्रवेशिका टाकू शकतो.
३. निकाल मतदानाद्वारे.
४. कथा तुम्ही हवी अशी फुलवू शकता. आजूबाजूची पात्र, लोकेशन(देश/परदेश), प्रसंग हे सगळं हवं ते घेऊ शकता.
५. कथेला logical end असावा.
६. कथेला शीर्षक असावे.
७. कथा प्रतिसादामध्ये लिहावी.
लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.
पूनम्,मजा
पूनम्,मजा आली!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुला स्वानुभव नसावासा वाटतो पण व्यायामाचा! कारण मांड्या भरून येणे हा प्रकार दुसर्या दिवशी होतो!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.
झ्याक
झ्याक लिवलय गो शिंडरेला, आता शिरियलच येउ द्या गंगीच्या मालकिणीच्या पराक्रमांची....
मला जाड
मला जाड व्हायचय!
"काय त्या छाताडाच्या फासळ्या न फासळ्या दिस्ताहेत, जरा व्यायाम करा!"
"जेव्हा बघाव तेव्हा अन्ग झाकलेल पोरिन्सारख! अरे तुमच्या वयाचे आम्ही होतो तर किती काम उरकायचो, काम करा काम, तब्येत आपआप सुधारेल"
"खातो की काय करतो रे तू? नुस्ता पाप्याच पितर"
नाही, ही "वचन" लिम्बीची नाहीत, तर लहानपणापासून अस्मादिकान्नी पालकान्कडून ऐकलेले बोधामृत हे! लिम्बी बोलत नसावी! पण नजरेत दिस्त ना!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तर खुप पुर्वीपासून अनेक वेळा केलेला जिम चा प्रयत्न पुन्हा एकदा करावयाचे ठरवले!
तब्बल साडेतीनशे रुपये भरून रितसर जिम मधे ऍडमिशन घेतली, तशी जिमवाल्यान्ची सक्ती नव्हती, पण पुर्वीच्या ऐकिव नि ठाशिव माहितीप्रमाणे सदाशीवपेठ हौदापासच्या कोपर्यावरच्या दुकानातून दोन लन्गोट विकत आणले! बुट, हाप चड्डी, टीशर्ट वगैरे तयारी केली अन सकाळी सकाळी सहा वाजता मोठ्या उत्साहात जिम मधे सजुन धजुन हजर झालो!
आता हे सान्गायला हरकत नसावी की हे जिम ना, डेक्कन जिमखान्यावरच्या सन्कृतीत बसणार नव्हत! त्यामुळे पुरुषासारख्या पुरुषान्नी अन्गभर कपडे घालून व्यायम करणे इन्स्ट्रक्टरला मन्जुर नव्हते. तेव्हा पहिल्याप्रथम चड्डी सोडून अन्गावरचे सगळे कपडे उतरविण्याची ऑर्डर सुटली! हो अगदी बुट पण वर्ज्य!
बोळकण्डीवजा एका जागेत कपडे काढून खुन्टाळ्याला अडकवले, बुट काढुन ठेवले, तिथेच एक पुणेरी सुचनावजा कागद भितीवर डकवुन ठेवलेला होता. "मुल्यवान वस्तुन्ची जबाबदारी आमचेवर नाही" अशा अर्थाची सुचना वाचून मनातल्या मनात माझ्याकडे असे काय काय "मूल्यवान" असू शकते याची उजळणी घेतली. फारस काही नव्हतच म्हणा!
मग अस्मादिक मुख्य हॉल मधे जाऊ लागले तर इन्स्ट्रक्टरने मधेच थाम्बविले
)
"हनुमानाला नमस्कार केलात?"
"नाही"
"मग करा की, वाट कशाची बघताय! इथला नियम हे, आल्यावर नि जाताना तसबिरीला नमस्कार करायचा"
मी बर म्हणल! मारुतीरायला नमस्कार केला, मी नीटपणे नमस्कार करतो हे की नाही ते बघत इन्स्ट्रक्टर थाम्बला होता
मुख्य हॉल मधे आलो
अस सार्वजनिक जागेत उघड्या अन्गाने वावरायची सवय नसल्याने अवघडून गेलो होतो. सारख सारख वाटत होत की सगळेजण माझ्याचकडे बघताहेत (अन गालातल्या गालात हसताहेत
मग मला वार्म अप होण्यासाठी जागच्या जागी पळणे, उड्या मारणे, उभेआडवे तिरके हातवारे करणे अस बराच वेळ करायला लागल!
तो वर मी चान्गलाच घामाघुम झालो होतो!
जरा कुठे श्वास घ्यायला थाम्बत नाही तो..... "अहो अस थाम्बायच नाही, आता किमान तीस जोर मारा"
अयाईग, करतो काय! रडत कुथत जोर मारले! उठुन उभा राहिलो
तोवर पुढली ऑर्डर.... आता बैठका मारा! जोरान्च्या दुप्पट
हो हो, इतक्या भरभर नाही, अगदी सावकाशीन मारायच्या! मिन्टाला एक बैठक होईल इतक स्लो करा!
बैठका पुर्या होईस्तोवर मान्ड्या नि पोटर्यात गोळे येवु लागलेले, जोरान्मुळे दन्डात नुकतीच जन्माला आलेली बेडकुळी उगिचच हालचाल करुन दन्ड दुखवून ठेवत होती
तिथुन मग आमची वरात डम्बेल्स नि काय काय इन्ग्रजी नावान्च्या मशिनरी पाशी फिरली
बरच काय काय वीस नि तीसच्या गठ्ठ्यामधे करवुन घेतल गेल!
असा तास गेला!
केव्हा एकदा इथुन सुटका होते याची वाट पहात तास गेला!
मग मला टॉवेलने अन्ग पुसायची नि कपडे घालायची परवानगी देऊन इन्स्ट्रक्टरने बैठकीला बोलावले!
"बोला, रोज काय काय खाता तुम्ही?"![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"काय, नेहेमीच घरचच जेवतो, ऑफिसात कॅन्टीनच खातो"
"तस नाही, बयाजवार सान्गा.. सकाळी उठल्यापासून्च"
"बर, सकाळी उठल्या उठल्या चहा घेतो"
"तोन्ड न धुताच?????"
"अहो मग बेड टी कसा घेतात? तसाच घेतो"
"तस चालणार नाही, आधी तोन्ड धुवायच, मग काय ते! अन इथुन पुढे चहाबिहा बन्द, दूध घ्यायच"
"कॉफी चालेल?"
"नाही, कॉफी पण नाही, दूधच, ते देखिल मी लिहून देतो ती पावडर टाकून"
"बर, मग ऑफिसला जातो, ऑफिसात एकदोनदा चहा होतो, जास्तीचा चहा मशिनवरचा घेतो"
"चहा बन्द म्हणजे बन्द, लक्षात ठेवायच नीट्पणे"
"बर, दुपारी साडेबाराच्या सुमारास कॅन्टीनला जेवतो" (खर तर गिळतो असा शब्द तोन्डावर आलेला तसाच गिळून टाकला)
"ते काय काय जेवता?"
"थोडा भात, आमटी, भाजी, एक चपाती, दही वाटी असली तर"
"बस्स??? येवढच? आजपासून दोन चपात्या सुरु करा, सन्ध्याकाळी काय?"
"सन्ध्याकाळी ना? मुड असला तर जेवतो, त्यात पुन्हा "तो" कार्यक्रम अस्ला तर मग जेवण नाहीच, नुस्तच चकण्यावर भागवतो!"
"चकण्यावर????" (लाज नाही वाटत? असा त्याने मनातल्या मनात विचारलेला प्रश्ण मला स्प:ष्ट ऐकू आला)
"हो ना, मग काय करणार, जेवण जातच नाही, तरी खाल्ल तर उलटी होते"
"हे पहा, आजपासून, नव्हे आत्तापासून हे कार्यक्रम चकणा वगैरे सगळ बन्द व्हायलाच हव, तुम्ही नॉन्व्हेज खाता का?"
"नाही, नाही म्हणजे तस क्वचित खातो, पण घरात नाही" (हाकलून देतील घरातून)
"हे बघा, तब्येत सुधारायची म्हणजे तुम्हाला वशाट देखिल खाव लागेल"
"अहो पण ते कस शक्य हे? घरात तर शक्यच नाही"
"मग बाहेर जावुन खा!"
"बाहेरच परवडत नाही"
"काय सान्गता राव? रस्तोरस्ती चायनीजच्या गाड्याहेत, हाप प्लेट लॉलीपॉप पुरे होतील सद्ध्या तुम्हाला, अन परवडतील सुद्धा"
"बर! बघतो जमल तर, अहो पण ते तिखट अस्तात, नॉन्व्हेज शिवाय दुसरा काहीच उपाय नाही का?"
"हे बघा, तुम्हाला खरच जर तब्येत सुधारायची असेल तर आम्ही सान्गतो तसच करा"
त्याने प्रिस्क्रिप्शन लिहून दिले! ते घेवुन घरी गेलो
लिम्बीला सान्गितले, उद्यापासून दुधाचा रतिब वाढवून घे, मी रोज दूध पिणारे!
कसाबसा ऑफिसला आलो, मायबोलीवर येण्यासाठी माऊस पकडून इन्टरनेट एक्स्प्लोररच्या आयकन वर क्लिक करायला गेलो
तो अगाईग, दन्डातून अन कोपरातून अशी काही कळ मारली ना, की बस्स!
अन मग दिवसभर उठता बसता कधी मान्डीत गोळा येतोय तर कधी मनगटात दुखतय अस होत होत कसाबसा दिवस ढकलला!
घरी येवुन धाडकन अन्थरुणावर कण्हत कण्हत पडलो!
लिम्बी न सान्गताच तेल नि बाम घेवुन आली!
त्या रात्री काय नि किती नि केव्हा जेवलो ते आठवत नाही पण दुसर्या दिवशी सात वाजता उठल्याचे स्मरते!
तेव्हापासून आजपोत्तर परत कधी त्या जिमची पायरी चढलो नाही!
माझ वय वाढत चाललय तरी वजनाचा काटा काही पन्नाशी ओलान्डणार नाही हे नक्की झाल!
हल्ली मी स्लिम असणच कस भारी, या विषयावरची पुस्तके वाचून माझ्या मनाचे समाधान करुन घेत अस्तो!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
लिंबुभाउ
लिंबुभाउ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
लिंबूदा!!
लिंबूदा!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पैल्याच दिवशी इतका व्यायाम!!
हल्ली मी
हल्ली मी स्लिम असणच कस भारी, या विषयावरची पुस्तके वाचून माझ्या मनाचे समाधान करुन घेत अस्तो!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
vote कुठे
vote कुठे करायचे ?
मायबोलीच्
मायबोलीच्या मुख्य पानावर गणेशोत्सवाची तसेच मतदानाची लिंक दिली आहे. तिथे जावुन सर्व स्पर्धांसाठी मत देता येईल.
मायबोली गणेशोत्सव २००८
>>
>> सगळ्यांना घराबाहेर हाकलण्याइतकी विमनस्कता आली की काय व्यायामानी!
एकदमच जमलीय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सॉल्लेड लिहीलीय पूनम.
>> चोहोबाजूंनी वाढलंय म्हटल्यावर चोहो बाजूंनीच दुखणार..
मंजू आपलं लीलाबाई
नुसतं वजन कमी करायबद्दल लिहा म्हटलं तर केवढे पदार्थ लिहीलेत आँ .. वाचूनच वाढलं वजन...
रोझी अगदी विशफुल थिंकिंग
सिंड्रेला सिद्धार्थ जाधवला नुसतं पाहिलं कीच हसू येतं तसं तुझ्या लेखातलं पहिलं वाक्य वाचताच तो ऍक्सेंट वाचूनच हसू आलं.
मंजु मस्तच
मंजु मस्तच गं ......
मला काट्यावर एकदम उडीच मारावीशी वाटली, पण म्हटलं नको, वजन उतरलं असलं तरी आपण अजुन overweight च आहोत
हहलोपो....... काटा मोडल्याचं चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर....
**************** तीळत
****************
तीळतीळ झिजलीस ना म्हणूनच.. तोळातोळा तरी झिजायला हवं होतंस>>>>>>>>>
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आहे.
**************** त्या
****************
त्या ५ दिवसात नीरजा मला आई न म्हणता 'लीलाबाई' म्हणूनच हाक मारत होती.>>>>>>.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे इमॅजिनरी आहे अस समजुन हसलोय हा मी.
बाकी तुझ्या लेखात व्यायामाच वर्णन कमी आणि खादाडीच्या भारी भारी पदार्थांचाच जास्त. मग कस होइल वजन कमी??![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
रोझि चि
रोझि चि कथा अगदि माझिच आहे अस वाततय
काय धमाल कथा आहेत एकेक
काय धमाल कथा आहेत एकेक![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages