सर्व स्पर्धा संपल्या आहेत आणि आता मतदान. तुम्हाला कुठल्या प्रवेशिका आवडल्या ते खालील दुव्यावर जाउन कळवा. मतदानाची पद्धत दुव्याखाली दिली आहे.
मतदान २७ सप्टेंबर पर्यंत चालु राहील.
१. प्रकाशचित्र स्पर्धा मतदान
इथे सर्व प्रवेशिका तुम्हाला ८ पानांमध्ये दिसतील. प्रत्येक प्रकाशचित्राच्या वर १० तारे दिसतील. तुम्ही प्रत्येक प्रकाशचित्राला (सर्व प्रवेशिकांना) १-१० च्या मध्ये गुणांकन करू शकता. त्यासाठी त्या क्रमांकाच्या तार्यावर टिचकी मारा.
२. प्रवासवर्णन स्पर्धा मतदान
तुम्हाला सर्वात आवडलेली एक प्रवेशिका निवडा. यात नजरचुकीने एक प्रवेशिका द्यायची राहिली होती ती आता टाकली आहे. ज्यांना
फेरमतदान करायचे आहे त्यांनी वरच्या मतदानाच्या दूव्यावर जाउन मतदान करावे.
३. कथालेखनस्पर्धा (सुरुवात आमची, कथा तुमची) - सुरुवात क्र.१ मतदान
तुम्हाला सर्वात आवडलेली एक प्रवेशिका निवडा. बाकी २ कथालेखन सुरूवातीना प्रवेशिका न आल्याने एकाच सुरूवातीसाठी मतदान होईल.
तांत्रिक कारणामुळे मतदानासाठी संपूर्ण उखाणा किंवा चारोळी दाखवता येत नाही त्यामुळे मतदान करतांना फक्त सुरुवातीची एक ओळ दिसेल.
४. व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र.१ मतदान
मतदानापुर्वी चारोळ्या वाचण्यासाठी व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र.१ हा दूवा बघा.
५. व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र.२ मतदान
मतदानापुर्वी चारोळ्या वाचण्यासाठी व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र. २ हा दूवा बघा.
६. व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र.३ मतदान
मतदानापुर्वी चारोळ्या वाचण्यासाठी व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र. ३ हा दूवा बघा.
७. व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र.४ मतदान
मतदानापुर्वी चारोळ्या वाचण्यासाठी व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र. ४ हा दूवा बघा.
८. नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.१ मतदान
मतदानापुर्वी उखाणे वाचण्यासाठी नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.१ हा दूवा बघा.
९. नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.२ मतदान
मतदानापुर्वी उखाणे वाचण्यासाठी नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.२ हा दूवा बघा.
१०. नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.३ मतदान
मतदानापुर्वी उखाणे वाचण्यासाठी नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.३ हा दूवा बघा.
११. नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.४ मतदान
मतदानापुर्वी उखाणे वाचण्यासाठी नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.४ हा दूवा बघा.
पाककला स्पर्धेसाठी परिक्षक निकाल देतील.
मतदान २७ सप्टेंबर पर्यंत चालु राहील.
प्रत्येक आयडीला वरील सर्व स्पर्धांमध्ये (प्रकाशचित्र स्पर्धा वगळता) एक-एक मत देता येईल. उदा. एका आयडीला एकाच कथालेखनाला मत देता येईल, तसेच एकाच प्रवासवर्णनाला मत देता येईल. प्रकाशचित्र स्पर्धेत प्रत्येक प्रवेशिकेला मानांकन देण्याची सोय आहे.
जर आधी दिलेले मत बदलायचे असेल तर तसे ते बदलता येते. त्यासाठी परत एकदा 'मतदान' मध्ये जावुन हव्या त्या प्रवेशिकेला मत दिले तर आधीचे मत रद्द होवुन नवीन मत ग्राह्य धरले जाते. हा बदल फक्त मतदान चालु असलेल्या काळातच (२७ सप्टेंबर पर्यंत) करता येईल.
मतदान केल्याबद्दल धन्यवाद. आपल्याला यावर्षीच्या गणेशोत्सवाबद्दल आणि संयोजनाबद्दल काही सूचना, प्रतिक्रीया द्यायच्या असतील तर गणेशोत्सव प्रतिक्रीया या दूव्यावर अवश्य द्या.
-मायबोली गणेशोत्सव संयोजक
प्रकाशचित
प्रकाशचित्रासाठी व्होट सबमिटचे बटन दिसुन मग दिसेनासे होते व गोल गोल गोळ्यान्च्या जागी स्टार्स दिसु लागतात आणि व्होट सबमिट करता येत नाही!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कथालेखनस्पर्धेसाठी देखिल http://www.maayboli.com/node/3635 हीच लिन्क जी प्रवासवर्णनासाठी आहे, दिसते आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कृपया तपासाल का? की माझ्याच पीसीवर प्रॉब्लेम आहे?
...;
आपला, लिम्बुटिम्बु
प्रकाशचित
प्रकाशचित्राच्या तार्यांवर टिचकी मारली की तेवढे लाल होतात पण पुढच्या / मागच्या पानावर जाऊन परत तिथे आले की ते पुर्ववत कलरलेस झालेले असतात. मग मतदान झाले की नाही कसे समजणार?
कथालेखन
कथालेखन स्पर्धा मतदानाचा दुवा प्रवासवर्णन मतदानाच्या पानावर जात आहे.. कृपया तपासणार का?
क्षमस्व,
क्षमस्व, कथालेखन स्पर्धा मतदानाचा दुवा आता सुधारला आहे.
प्रकाशचित्राच्या तार्यांचा प्रश्न तपासत आहोत. तो सुटला की इथे कळवतो.
एक सहज
एक सहज निरिक्षण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या पाऊलखूणान्मधे मला "फक्त लेखन" या पेजवर देखिल माझ्या फोटोन्च्या पोस्ट्स वर हे स्टार्स दिसताहेत!
इतर सहभागी स्पर्धकान्च्या प्रोफाईलमधील "फक्त लेखन" या पेजवर गेल्यासही तसेच दिसते आहे
...;
आपला, लिम्बुटिम्बु
मतदानाची
मतदानाची अंतिम तारीख काय आहे?
एक आयडी किती वेळा मतदान करू शकतो?
भोगस मतदार
भोगस मतदार आले...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
संयोजक जरा
संयोजक जरा इकडे लक्ष द्याल का?
प्रवासवर्णन स्पर्धेत एकुण ४ प्रवेशिका होत्या, पण मतदानासाठी फक्त तीनच?
सतीश यांची "अंबोली" हि प्रवेशिका नाहि आहे.
पाककृतींस
पाककृतींसाठी कुठे मतदान करायचे ?
सिंड्रेला,
सिंड्रेला, पाककृती स्पर्धेसाठी परीक्षक नेमले आहेत...
ओह अच्छा.
ओह अच्छा. मतदानासाठी मुदत आहे का ?
उखाणा
उखाणा स्पर्धा मत कसे द्यायचे ? आता नवीन बोगस आय डि उघडले तर चालते का?
मी
मी "व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र.१ मतदान" ह्या प्रकारात काल मतदान केले होते. मतदान केल्यावर "Cancel Your Vote" दिसायला लागले. आज बघितले तर Vote दिसत होते व मी पुन्हा एकदा मतदान करु शकले. काल दिवसभरात काही बदल झाल्यामुळे असे झाले का ? की मतदानाचे पान बगलं ?
जागोमोहनप
जागोमोहनप्यारे,
उखाणा स्पर्धेत किंवा इतर कुठेही मत देण्यासाठी वर दूवा दिलेला आहे त्या-त्या दूव्यांवर टीचकी मारुन तुम्हाला सर्व स्पर्धेत मत देता येईल.
सिंड्रेला,
सगळ्यांना मतदान केल्यावर खाली शेवटी 'cancle your vote' असे दिसते. याचा अर्थ तुम्ही जे मत दिलय ते जर चुकुन दिले गेले असेल किंवा तुम्हाला ते रद्द करायचे असेल तर तिथे टीचकी मारुन करता येते. तसे केल्याने तुम्ही आधी दिलेले मत रद्द होवुन तुम्हाला नविन मत देता येते, थोडक्यात तुम्हाला तुमचे मत एका प्रवेशिकेला देण्या ऐवजी दुसरी प्रवेशिकेला द्यायचे असेल तर ते देता येते. तुम्ही एकापेक्षा जास्त वेळा एकाच स्पर्धेत मत दिले याचा अर्थ तुमचे पहिले मत आपोआप रद्द होवुन शेवटचे (latest) मत ग्राह्य धरले जाते. अश्या पद्धतीने तुम्ही हव्या तितक्या वेळा तुमचा निर्णय बदलु शकता.
संयोजक,
संयोजक, मतदानाची ही पद्धत असे तर मग प्रत्येक प्रवेशिकेला १० तारे असण्याचं प्रयोजन राहत नाही. मला वाटलं की मी प्रत्येक प्रवेशिकेसाठी १ ते १० तारे देऊ शकतो आणि मग प्रत्येक प्रवेशिकेला मिळालेले एकूण तारे मोजले जातील.
(आरोप, प्रत्यारोप, छिद्रान्वेषी सूचना, चुका काढणे, वाकड्यात शिरणे किंवा तत्सम कसलाही हेतू नाही. माझा झालेला गोंधळ फक्त सांगितला.)
परागकण
परागकण, प्र
परागकण,
प्रकाशचित्र स्पर्धेसाठी १० तारे आहेत. तिथे तुम्ही सर्व प्रवेशीकांना तुमचे rating देउ शकता. वर लिहिलं आहे ते ईतर स्पर्धांसाठी आहे.
नाव गुंफण
नाव गुंफण ४ वर मतदान करायला टीचकी मारली तर 'पान हरवले आहे का असे येतय सारखे?'
मला अजुनही
मला अजुनही पुढील प्रोब्लेम भेडसावतो हे!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
"प्रकाशचित्रासाठी व्होट सबमिटचे बटन दिसुन मग दिसेनासे होते व गोल गोल गोळ्यान्च्या जागी स्टार्स दिसु लागतात आणि व्होट सबमिट करता येत नाही"
त्यातुनही मी "शिश्टिमला" चकवुन सबमिटचे बटन दिसताक्षणी किरण साधून ज्या दोन चित्रान्ना व्होट करु शकलो, आता फक्त तेच तारे लाल लाल दिसतात!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
दोन चित्रान्व्यतिरिक्त मी अन्य कुणालाच व्होट करु शकलेलो नाहीये!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
मला अजुनही
मला अजुनही पुढील प्रोब्लेम भेडसावतो हे!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
"प्रकाशचित्रासाठी व्होट सबमिटचे बटन दिसुन मग दिसेनासे होते व गोल गोल गोळ्यान्च्या जागी स्टार्स दिसु लागतात आणि व्होट सबमिट करता येत नाही"
लिम्बुदा माझीपण तीच अवस्था आहे रे
अरे असे
अरे असे व्हायचे काही कारण नाही आहे.. काही संकदातच ते पिवळे तारे लाल होतात.. मी कालच सगळ्या प्रकाशचित्रांना माझे मत दिले आहे..
स्टार दिसणेच महत्त्वाचे आहे.. कारण ते स्टारच तुमचे मत ठरवतात.. सबमिटचे बटण नाही..
संयोजक मी जे म्हणतो आहे ह्यात चूक असेल तर योग्य पद्धत सांगा..
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे
गोल गोल
गोल गोल गोळ्यान्च्या जागी स्टार्स दिसू लागल्यावर सबमिटचे बटन देखिल गायब होते ना!
त्याचे काय करू? मी मोझिला, नेटस्केप वरुन देखिल प्रयत्न केला पण तसच होतय!
योग्या, बहुतेक स्पर्धकान्ना "वेगळी ट्रिटमेण्ट असावी"....!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
...;
आपला, लिम्बुटिम्बु
कालपासून
कालपासून जमतेय प्रकाशचित्रांना मत द्यायला. लगेचच मताचा परिणाम दिसतो तिथे.
लिंबू,
लिंबू, सबमिट बटणची गरज नाही आहे.. स्टार्स दिले की तिथेच तुमचे मत दिले गेले असल्याचे कळते.. तिथे rating आणि number of votes असे स्टार्स्च्या खालती दिले आहे.. आधीची number of votes आणि तू मत दिल्यानंतरचे number of votes चेक कर त्यात १चा फरक दिसेल.. तो दिसला याचा अर्थ तुझे मत ग्राह्य धरण्यात आले आहे....
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे
येस येस
येस येस हिम्या, जमल रे जमल! एकेक तारा कमी जास्त केला की आकडे बदलताहेत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद सान्गितल्याबद्दल!
(पण मग ते सबमिटच बटन दिसुन नाहिस का होत? माझ कन्फ्युजन झाल ना त्यामुळे)
...;
आपला, लिम्बुटिम्बु
हिमकुल
हिमकुल धन्यवाद! मी बघतो लगेच चेक करुन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिम्बुदा
अन अजुन एक
अन अजुन एक सुविधा हे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी जर स्पर्धक हे तर माझ्या पाऊलखूणान्मधे फक्त लेखन या सदरात देखिल मला माझ्याच चित्रान्ना मतदान करता येतय!
अन हा योग्या स्पर्धक हे, तर त्याच्या प्रोफाईलमधिल फक्त लेखन या सदरात गेल्यावर त्याच्या चित्रान्ना देखिल मतदान करता येतय!
हाये की नाही आयडीयेची गम्मत?
...;
आपला, लिम्बुटिम्बु
लिंबुटींब
लिंबुटींबु,
हिम्सकुल यांनी बरोबर सांगीतले आहे. सर्व प्रकाशचित्रांना मानांकन देतांना फक्त हव्या त्या क्रमांकाच्या तार्यावर क्लिक केले की त्याचा पिवळा रंग जावुन लाल रंग येतो. याचाच अर्थ तुमचे मानांकन त्या प्रकाशचित्राला दिले गेले आहे. त्यामुळे तसे लाल तारे दिसल्यावर अजुन कुठे क्लिक करण्याची आवश्यकता नाही.
मनस्वीनी,
आत्ताच परत एकदा तपासले, सर्व स्पर्धांच्या लिंक्स चालु आहेत आणि बर्याच लोकांनी मतदान केलेले आहे. तुम्हाला अशी अडचण यायला नको. पुन्हा एकदा मतदानाचा प्रयत्न कराल का आणि सांगणार का तीच अडचण येतेय का ते?
मायबोली गणेशोत्सव २००८
संयोजक
संयोजक आताच मी फोटोंच्या स्पर्धेसाठी मतदान करुन आलो. नुसते एकदा हव ते तारांकन दिल की झाल ना?? कारण मला तिथे व्होट सबमिट अस बटन दिसल नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बघणार का माझ मतदान झाल आहे की नाही???
अजुन एक म्हणजे तिथे तीन फोटो दिसत नाहिये.
एक मृन्मयी यानी टाकलेला एक टण्या बेडेकर यानी टाकलेला आणी एक काशी यानी टाकलेला.
त्यामुळे त्या तीन फोटोना अजुन व्होट केलेले नाही.
जरा प्लीज बघणार का ते का दिसत नाहियेत ते.
ही फोटोंना तारांकण देण्ञाची पद्धत मस्त आहे. खुप आवडली.
धन्यवाद
झकासराव, प्
झकासराव,
प्रकाशचित्रांना फक्त मानांकन द्यायचे आहे. वर लिहीलेल्या पोस्ट मध्ये याबद्दल सविस्तर माहिती आहे.
तुम्ही सांगितलेले प्रकाशचित्र मतदानासाठी आता उपलब्ध केले आहेत.
मायबोली गणेशोत्सव २००८