Submitted by निंबुडा on 18 May, 2010 - 04:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
हिरवे चणे उकडून झाले की उरलेले पाणी
फोडणी साठी तूप, जिरं, कडिपत्ता, ठेचलेले आले, मिरची
बारीक चिरलेली कोथिंबीर
ताक (थोडेसे आंबट हवे)
साखर
मीठ
क्रमवार पाककृती:
चना चटपटी किंवा चण्याची भाजी करण्यासाठी आपण हिरवे चणे उकडून घेतो व बहुतांशी त्याचे पाणी फेकून देतो. तसे न करता मी माझे डोके लढवून हे कढण try केले.
कृतीः
१) चण्याचे पाणी + ताक + मीठ + थोडी साखर असे एकत्र करून ठेवणे. चण्याचे पाणी व ताक यांचे प्रमाण आपल्या अंदाजाने घेणे. चण्याचे पाणी ताकापेक्षा जास्त हवे. ताक जास्त आंबट असल्यास साखर जरा जास्त घालणे.
२) साहित्यात दिल्याप्रमाणे फोडणी करणे
३) फोडणीमध्ये वर बनवलेले मिश्रण घालून ढवळणे. जरा दाटसर होऊ देणे.
४) उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे
अधिक टिपा:
*अश्याच प्रकारे टोमॅटो चे सारही बनवता येते. फक्त चण्याच्या पाण्या ऐवजी उकडलेल्या टोमॅटो चा गर घ्यायचा.*
माहितीचा स्रोत:
स्वतः प्रयोग करून पाहिलेला प्रकार
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निंबुडे, आपल्या पारंपारिक
निंबुडे,
आपल्या पारंपारिक पाकृ प्रकारात देखील अस कढण करायची पद्धत आहे
मी आता पर्यंत मूग, मटकी, कुळिथाच अस कढण केलय. फक्त ते मी उकळवत नाही वरुन तूप जीर कढीपत्त्याची फोडणी मस्तच लागत
कुठलेही कडधान्य शिजवून
कुठलेही कडधान्य शिजवून घेतल्यावर राहीलेल्या पाण्यात ताक घालून खमंग फोडणी देऊन केलेलं कळण छानच लागतं. काही वेळेला तर मी शिजवलेलं कडधान्य दोन चमचे बाजूला ठेऊन देते आणि ते सरळ मिक्सरमधून वाटून घेऊन त्याचं कळण करते.
एखादा चमचा कडधान्य वाटून
एखादा चमचा कडधान्य वाटून कढंण/कळणाला लावले की जास्त छान लागतं. वाटी वाटी प्यायलं जातं.
हिवाळ्यात गुलगुलीत थंडीत असं
हिवाळ्यात गुलगुलीत थंडीत असं गरमागरम कळण वाट्यावाट्यांनी भुरके मारत प्यायला लई मजा येते!
>वाट्यावाट्यांनी भुरके
>वाट्यावाट्यांनी भुरके <
खरंच गं, अरु..........
>आपल्या पारंपारिक पाकृ प्रकारात देखील अस कढण करायची पद्धत आहे <
अगं कवे, आमच्याकडे नाही करत असा कुठलाच प्रकार......... मीच मग माझ्या मनाने try करून पाहिला. आधीपासूनच अस्तित्वात असेल तर मी लयंच हुश्शार