Extra Vergin Olive Oil ५ चमचे
आक्रोड - ४-५
लसूण पाकळया - २-३
रेड चिली फ्लेक्स - १ चमचा
बाल्सामिक व्हिनेगर -२ चमचे
मिरी पूड - १ चमचा
साखर चवीनुसार
मीठ चवीनुसार
१. आकोड ची जाडसर पूड करून घ्या.
२. लसूण बारीक चिरून घ्या.
३. एका काचेच्या भांड्यात ऑऑ + बाल्सामिक व्हिनेगर + लसूण आक्रोड + साखर + मीठ+ रेड चिली फ्लेक्स + मिरी पूड सगळ एकत्र करा
४. हे मिश्रण मावे मधे १ मि. गरम करा.
ड्रेसिंग तयार
- हे ड्रेसिंग सॅलाडवर / पास्ता सॅलाड वर मस्त लागते.
- फ्रेंच ब्रेड/ बगेट स्लाईस करून त्यावर हे ड्रेसिंग घालून खाता येते. ब्रेड थोडा गरम करून त्यावर ड्रेसिंग घालायचं
- आवडत असेल यात शॅलेट (shallot) घालता येतो.
- पार्टीसाठी एक अॅपेटाइझर किंवा BBQ च्या वेळी ग्रिल चालू होईपर्यंत खायला उत्त्म प्रकार.
- ड्रेसिंग १ दिवस आधी करून चालते आणी फ्रिजमधे करून ठेवले तर लागेल तसे वापरता येते सॅलाड साठी
शॅलेट म्हणजे काय ग?
शॅलेट म्हणजे काय ग?
शॅलेट हा कांद्यासारखाच थोडा
शॅलेट हा कांद्यासारखाच थोडा कमी उग्र वासाचा प्रकार आहे. ही पहा जास्तीची माहीती http://en.wikipedia.org/wiki/Shallot
अरे, आपल्याकडे (देशात) असेच
अरे, आपल्याकडे (देशात) असेच कांदे मिळतात की!
बादवे, कृती आवडली..
चांगली आणि सोप्पी कृती आहे
चांगली आणि सोप्पी कृती आहे ड्रेसिंगची.
एकदम सोप्पी आहे. मुलांना पण
एकदम सोप्पी आहे. मुलांना पण खूप आवडते
मस्त! सॅलड हा आमच्याकडचा
मस्त! सॅलड हा आमच्याकडचा आवडता प्रकार!
पन्ना. आमच्याकडेपण पण मला हे
पन्ना. आमच्याकडेपण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण मला हे बगेट किंवा फ्रेश फ्रेंच ब्रेड वर स्प्रेड म्हणून जास्त आवडतं. मस्तच लागतं
हे व्हिनेगर आणायला हवं आता
हे व्हिनेगर आणायला हवं आता ट्रायल मारायला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद सायली. आणि हे
धन्यवाद सायली.
आणि हे भारतातही मिळेल असं वाटतय. पाहते आता.
फोटो मस्त सामी.
फोटो मस्त सामी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटोमुळे लवकर खावंसं वाटतंय.
फोटोमुळे लवकर खावंसं वाटतंय.
करून बघते. आमच्या इथे एक किलर
करून बघते. आमच्या इथे एक किलर गार्लिक ब्रेड मिळतो. त्याला टोस्ट करोन मस्त लागेल. वर चीज किसून.
>> माहितीचा स्रोत: स्वतःचे
>> माहितीचा स्रोत: स्वतःचे प्रयोग
हाहा.. हे सही होतं.. आणि अर्थात फोटो आणि प्रत्यक्ष ड्रेसिंगही..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आत्ताच सलाड खाल्लं तुझं हे
आत्ताच सलाड खाल्लं तुझं हे ड्रेसिंग घालून. अप्रतिम लागलं एकदम. नेहमीपेक्षा छान एकदम.. सावित्रीने धन्स सांगितलाय तुला.
धन्यवाद आता फ्रेंच ब्रेडबरोबर
आता फ्रेंच ब्रेडबरोबर खावून बघ