पनीर जालफ्रेझी

Submitted by बस्के on 17 May, 2010 - 14:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पनीर १२ oz
मोठे कांदे २
टोमॅटो प्युरी ६ oz
हिरवी सिमला मिरची २
लाल सिमला मिरची १
बटर ३-४ चमचे. ( हेल्थ कॉन्शस नसाल तर मनसोक्त!)
४-५ लवंगा
६-७ मिर्‍याचे दाणे
दालचिनी पूड
वेलदोडा पुड चिमुटभर
थोडेसे bay leaves ( =तमालपत्र का?)
कसुरी मेथी
थोडा ठेचलेला लसूण
तिखट, मीठ चवीप्रमाणे.
मी थोडा तंदुर मसाला सुद्धा घातला चवीपुरता.
लाल खाण्याचा रंग हवा असल्यास. (प्युरीमुळे रंग येतोच, त्यामुळे नसला तरी चालेल.)

क्रमवार पाककृती: 

सर्वात प्रथम कांदा बारिक चिरून बटरमध्ये परतून घ्यावा.
व नंतर मिक्सर मध्ये वाटून त्याची पेस्ट करावी.
एकीकडे दुसरा कांदा व लाल-हिरव्या सिमला मिरच्या उभट चिरून घ्याव्यात.
पनीर मायक्रोवेव्हमधून थोडे शिजवून घ्यावेत व त्याचे आवडीप्रमाणे तुकडे करावेत. पनीर तळून सुद्धा घालता येतील पण नुसते असेच पांढरेशुभ्र सुद्धा छान दिसतात/लागतात!
खलबत्त्यात लवंग, मिरे, बे लिव्हज, कसुरी मेथी नीट पूड करून घ्यावेत.

बटर तापवून त्यात चिरलेला कांदा, लाल-हिरवी सिमला मिरची परतून-शिजवून घ्यावी.
ठेचलेला लसुण, कांदा व टोमॅटो प्युरी घालून नीट परतून घ्यावे.
पनीरचे तुकडे मिसळावेत.
त्यात लवंग-मिरे-बे लिव्हज-कसुरी मेथी पुड तसेच दालचिनी,वेलदोडा पुड घालावी
तिखट, मीठ व (असल्यास) थोडा तंदुर मसाला घालावा.
थोडसं एकत्र हलवून किती कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालून शिजवून घ्यावे.

एका डिशमध्ये पनीर जालफ्रेझी व पराठा/फुलका घेऊन आधी त्याचा फोटो काढावा, मग मनसोक्त हादडावे! Happy


वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी पुरावी.
माहितीचा स्रोत: 
संजीव कपुर, तरला दलाल, व इंटरनेटवरील ब्लॉग्स वाचुन बनलेली माझी रेसिपी. :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पनीर जाल्फ्रेझी मधे सगळ्याचे(कांदा,टमाटो, सिमला मिर्ची, पनीर) याचे लांबट तुकडे करतात ना?

माहीत नाही.
इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारची पनीर जाल्फ्रेझी खाल्लीय! (एके ठिकाणी तर पनीर बटर मसालाच जाल्फ्रेझी म्हणून वाढला! Angry तेव्हाच ही घरी करायचे निश्चित केले मी.)
मी टोमॅटो घातलाच नव्हता, आणि पनीरचे लांबट तुकडे खाण्याच्या दृष्टीने मला सोयीचे वाटत नसल्याने छोटे चौकोनी केले. बाकी कांदा, सिमला मिरची उभटच.

भरत, बरोबर आहे. मी ही पनीर जालफ्रेझीमध्ये पनीर, सिमला मिरची, इव्हन टोमॅटोचे लांब लांब तुकडे पाहिलेत.
बस्के, मस्त रेसिपी.

मागे एकदा मैत्रेयीनेही ही कृती लिहिली होती. ती पण छान खंग्री होती. जुन्या हितगुजवर आहे ती. हा पराठा विकतचा आहे ना बस्के!!!!

या काँबिनेशनचे काहीही केले तरी छानच लागेल. सिमला मिर्ची काढली आणि कांदा बारीक चिरून व पनीर किसून घेतले की पनीर भुर्जी झाली. पण जालफ्रेजी कोरडी असते. कांद्याचे वाटण व टमाटो प्युरी नसतात. आधी कांदा परतायचा, मग सिमला मिरच्या शिजवायच्या(आधी वेगळ्या वाफवून घेतल्या तर वेळ कमी लागेल. टमाटो आणि पनीर घातल्यावर जास्त शिजवू नये कारण ते तुकडे अखंड राहिले पाहिजेत.
गरम मसाला, हळद, मिर्ची पूड एवढे मसाले पुरे. आंबट चवीसाठी वाटल्यास व्हिनेगर घालता येईल.

तोंपासू, करते ह्या विकांतालाच Happy

मंजुडे, संजीव कपुरच्या माझ्याकडे असलेल्या पुस्तकातली जलफ्रेजी बरिचशी कोरडी टाईपचीच आहे त्यात कांद्याची ग्रेव्ही नाहीये

पण मला स्वत:ला ग्रेव्ही वाली आवडते Happy

होहो संजीवकंपुरच्या पनीर जालफ्रेझीत ग्रेव्ही नसते. ती भरतने लिहिल्यासारखी असते. तीही छान लागते.

अगं हो कविता. मी तीही छान लागते असं लिहीलं आहे. तीच छान लागते असं नाही. सगळ्याच भाज्या छान लागणारच, करणारीनुसार. Happy

नको बस्के- कशाला बदलतेस? जालफ्रेजी भाज्या म्हणजे काय, त्या शब्दांचा उगम काय याचा अर्थ कोणीतरी टाकेपर्यंत बदलु नकोस.

करणार्‍याला आणि खाणार्‍याला आवडल्याशी कारण. हे ग्रेव्हीवाले व्हेरिएशन अभारतीयांसाठी काढले असेल, लंडन मधल्या पंजाब्यांनी. मी पाहिलेल्या/वाचलेल्या आणि खाल्लेल्या जालफ्रेजी मात्र कोरड्याच होत्या.केलेल्या पण. तेव्हा ही पद्धत जरूर आजमावा. व्हिनेगर्/लिंबू रस किंवा अगदी आम्चूर यांनी एक छान आंबट चव येते. मला पण लांबट तुकड्यांपेक्षा चौकोनी तुकडे जास्त सोयीचे वाटतात खायला.(मोठा आ वासायला नको मग). मला पण ही ग्रेव्हीवाली करून बघायला आवडेल.

Jalfrezi is believed to be derived from Bengali word jhal (spicy food) and Urdu word parhezi, suitable for a diet or English word "fried" with urdu word "zee", meaning emphasis. Jalfrezi is either considered as a Bengali food, Mughal food or combination of both.

In Jalfrezi, marinated pieces of meat or vegetable are stir fried in oil to produce a relatively dry and thick sauce. often, green chilies, bell peppers, onion, tomato are added. (food-india.com)
This dish has its roots in the Calcutta region of India at the time of the British Raj. Like some of the other Indian dishes, jalfrezi isn’t a traditional Indian recipe, rather a popular indigenous cooking method. The literal meaning of the word Jalfrezi is “hot-fry” and entered the English language at the time of the British Raj in India. It’s now a firm favourite in Indian cuisine.(curriesonline.uk)

Jalfrezi (also jhal frezi, zalfrezi, and many alternative spellings) is a type of Indian curry in which marinated pieces of meat or vegetables are fried in oil and spices to produce a dry, thick sauce. It is cooked with green chillies, with the result that a jalfrezi can range in heat from a medium dish to a very hot one.[1] Other main ingredients include peppers, onion and tomato.[2](proz.com)

बस्के,
काल केली होती, मस्तच झाली. thank u.
हो आणि मी आधी खाल्लेली जालफ्राझी कोरडी होती. पण ही सुद्धा छानच. पार्टीसाठि पर्फेक्ट.

Pages