आनंद, उत्साह, धांदल, धावपळ, थट्टा मस्करी, स्पर्धांमधली चढाओढ आणि बरोबरच श्लोक, घोषणा, स्वरचित आरत्या, नैवेद्य, प्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम हे सगळं घेऊन येणारा गणेशोत्सव बघता बघता संपून गेला आणि मागे राहिली एक वेगळीच हूरहूर. आता उरले दोनच पण महत्त्वाचे कार्यक्रम. एक म्हणजे स्पर्धांच्या निकालासाठीचे मतदान व निकाल आणि दुसरं म्हणजे आभार प्रदर्शन.
गणेशोत्सवातल्या स्पर्धांना, अवांतर गोष्टींना तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना भरघोस दाद तसेच प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्व मायबोलीकरांचे संयोजकांतर्फे मनःपूर्वक आभार! असाच लोभ दरवर्षी राहील ही आशा.. नव्हे खात्रीच आहे...
लिखित-श्राव्य सांस्कृतिक कार्यक्रम हे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य.
डॉ. वीणा देव, डॉ. अनिल अवचट, श्रीमती सिंधूताई सपकाळ, शेफ विष्णू मनोहर, श्री. आनंद मोडक, श्री. शंकर महादेवन, श्रीमती साधना सरगम, श्री. सुधीर गाडगीळ ह्या सर्व मान्यवरांचे खास मायबोलीकरांसाठी दिलेल्या वेळाबद्दल तसेच चिनूक्स ह्यांचे ह्या सर्व मान्यवरांना मायबोलीकरांच्या भेटीसाठी घेऊन येण्याबद्दल हार्दिक आभार!
आपल्या खास शैलीतल्या कथांची कथामाला गणेशोत्सवाच्या निमित्तीने वाचकांसाठी सादर केल्याबद्दल, मायबोलीकर लेखिका शोनू ह्यांचे आभार!
गणपती किंवा गणेशोत्सव ह्या विषयाला अनुसरून गणेश तत्त्व ह्या विषयावरील लेखमाला, गणेशोत्सवाविषयीचे लेख आणि गणेशाच्या आगमनाचे स्वरचित गाण्याच्या माध्यमातून केलेल वर्णन आपल्यापर्यंत आणल्याबद्दल अनुक्रमे आयटी गर्ल, संदिप चित्रे, संघमित्रा आणि जयावी ह्या मायबोलीकरांचे मनःपूर्वक आभार..!
माणूस असण्याचा अभिमान वाटावा असा एक वैज्ञानिक प्रयोग नुकताच सुरू झाला आहे. तो म्हणजे LHC. ह्या प्रयोगाविषयी साध्यासोप्या शब्दात माहिती देणारी लेखमाला गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून सुरू केल्याबद्दल मायबोलीकर स्लार्टी ह्यांना शतश: धन्यवाद!
दरवर्षीच्या गणेशोत्सवात असणारा सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम म्हणजे गद्य STY. ह्यावर्षीच्या गद्य STY ची चटकदार सुरुवात लिहिल्याबद्दल मायबोलीकर श्रध्दाके ह्यांचे आभार.
संयोजकमंडळापैकी आम्ही सर्वच जण मायबोली गणेशत्सवात पहिल्यांदा काम करत होतो. ही संधी आम्हाला दिल्याबद्दल ऍडमिन ह्यांचे आभार तसेच लागेल तेव्हा मदत, मार्गदर्शन, प्रेमळ सूचना आणि मुख्य म्हणजे अनुभवातून शिकलेल्या चार गोष्टी आम्हाला सांगितल्याबद्दल २ ज्येष्ठ मायबोलीकर लालू आणि समीर ह्यांचे ही खास आभार.
गणेशोत्सवाच्या संयोजनामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हातभार लागला आहे पण अनावधानाने इथे उल्लेख राहून गेला आहे अश्या सर्वांनाही संयोजकांतर्फे धन्यवाद!
संयोजक मंडळ नवीन असल्याने काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील किंवा काही गोष्टी अधिक चांगल्या पध्दतीने देखील करता आल्या असत्या. त्याबद्दल चूक भूल देणे घेणे.
काय आवडलं, काय नाही आवडलं किंवा आणखीन काय करता आलं असतं ह्या बद्दलची आपली मतं, सूचना, विचार आम्हांला नक्की कळवा. पुढच्या वर्षीच्या संयोजकमंडळाला त्याची निश्चित मदत होईल.
स्पर्धांच्या मतदानासंबंधीचा तपशील बघण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी बघा मायबोली गणेशोत्सव मतदान. धन्यवाद!
उत्तम
उत्तम आयोजनाबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद.
***
Has the LHC destroyed the world yet?
(If you are not satisfied, please check out the source code.)
LHC : एक मार्गदर्शिका
संयोजक
संयोजक मंडळातील सर्वांचेच मायबोली गणेशोत्सव २००८ च्या यशस्वी संयोजनाबद्दल अभिनंदन!!
चिनूक्स, शोनू, आयटी गर्ल, संघमित्रा, संदिप, जयूताई ह्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय सुंदर रीत्या सादर केले.
प्रकाशचित्र स्पर्धा, चारोळी आणि उखाणे गुंफण स्पर्धा ह्या सर्वांना मिळालेला भरभरून प्रतिसाद कथा स्पर्धेलाही मिळाला असता तर बहार आली असती. गद्य आणि पद्य STY नेहमीप्रमाणेच छान. पुन्हा एकदा मायबोली गणेशोत्सवातील सहभागी मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन.
संयोजक
संयोजक मंडळातील सर्वांचेच उत्तम आणि यशस्वी आयोजनाबद्दल मनापासुन आभार आणि अभिनंदन!
माझा हा मायबोलीवरचा पहिलाच गणेशोत्सव त्यामुळे जेव्हढ्या अपेक्षा होत्या त्यापेक्षा कितीतरी पटीने त्या पूर्ण झाल्या.
गणेशोत्सवातील सहभागी सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन व आभार!
उत्कृष्ट
उत्कृष्ट पद्धतीने गणेशोत्सव साजरा करुन आम्हाला त्यात सहभागी होण्याची सन्धी दिल्याबद्दल ऍडमिन, सन्योजक यान्चे आभार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि समस्त मायबोलीकरान्चे अभिनन्दन!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
दणक्यात
दणक्यात झाला गणेशोत्सव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संयोजकांचे,आणि सहभाग घेणा-यां सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
अतिशय
अतिशय सुंदर आयोजन.
अगदी गणेशाच्या प्रतिष्ठापनेपासून, मायबोली-गणेशोत्सवाच्या मुख्यपृष्ठापासून सर्व काही प्रसन्न वाटत होतं. अगदी आरती झाल्यानंतर दिव्याच्या ज्योतीवरून हात फिरविल्यावर वाटतं तसं छान, उबदार.
अभिनंदन रे सर्वांचं..
अभिनंदन
अभिनंदन सर्वांचंच.
खूप छान झाला गणेशोत्सव..
संयोजक आणि
संयोजक आणि सहभागी झालेल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि खूप खूप कौतुकही! गणपती बाप्पा मोरया!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
गणेश
गणेश उत्सवाची मज्जा, धमाल मायबोलीच्या स्वरुपात आमच्या सर्वान बरोबर साजरी करण्या साठी
संयोजकांचे मनापासून आभार.
गणपती बाप्पा मोरया!
तुषार
खूपच छान
खूपच छान गणेशोत्सव. यशस्वी संयोजनाबद्दल संयोजक मंडळाचे अभिनंदन !!! विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार्या माबोकरांचे विषेश आभार. प्रत्येक कार्यक्रमाबरोबर ह्या माबोकरांची पण थोडक्यात ओळख करुन दिली असती तर छान झाले असते.
सर्वच
सर्वच उल्लेख असलेल्या आणि नसलेल्याही संयोजक मंडळींचे अभिनंदन आणि आभार. यावर्षी छायाचित्रांचा सुखद पाउस दिसला. नाव गुंफण स्पर्धेतली धम्माल उधळण आणि चारोळी स्पर्धेतल्या असलेल्या आणि नसलेल्या ( म्हणजे स्पर्धेत ) खुसखुशीतपणाने गणेशोत्सव सजला. कथा पुर्ण करा मधे आता ही स्पर्धा वाया जाते की काय असे वाटत असतानाच काही जणांनी ऐनवेळी तिला सावरले.
इथे फक्त एकच सुचना करावीशी वाटते की या स्पर्धेतल्या जवळपास सर्वच कथा साधारणपणे एकच शेवट येईल अशा होत्या. जर एखादी सर्वसाधारण सुरुवात केली असती तर कदाचीत आणखी प्रतीसाद मिळाला असता आणि वेगवेगळे शेवटही वाचायला मिळाले असते. अर्थात सर्वच कथांमधे विषयांतर न करताही भरपुर वेगळेपणा वाचायला मिळाला. त्याबद्दल त्या स्पर्धेत लिहीणार्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन
बाकी सर्वच एकदम सुंदर.
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
मस्तच झाला
मस्तच झाला गणेशोत्सव. संयोजक मंडळाचे अभिनंदन!
छान झालं
छान झालं सर्व. अभिनंदन!
सुरेख झाला
सुरेख झाला गणेशोत्सव! अभिनंदन संयोजक मंडळी! सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम अणि स्पर्धांनी कार्यक्रमात रंग भरला! खूप मजा आली!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि, या उत्सवात लिहिण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून आभार.
यावर्षीचा
यावर्षीचा गणेशोत्सव आतापर्यंतच्या सगळ्या वर्षांमधला सर्वोत्तम होता. एकदम सुरेख आयोजन, विविध कार्यक्रम, नवीन प्रकारच्या स्पर्धा, चांगले वैविध्य असणारे विषय, उत्तम शीर्षकं, सगळंच एकदम मस्त! सगळ्या संयोजकांचे व पडद्यामागच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन!
STY प्रकाराला मात्र प्रतिसाद अजिबातच मिळाला नाही, कारणे काय ते नकळे.
अभिनंदन
अभिनंदन सर्व संयोजकांचे!
ते मतदान कुठे करायचे?
चाफाशी
चाफाशी सहमत, अतिशय उठावदार, वैविध्यपूर्ण आणि उत्तम संयोजन. सगळ्यांचे खूप सारे आभार..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्पा, बाबा, ताई, माई सगळ्यांना इतक्या जवळून भेटवून आणलत अगदी घरी असल्यासारख वाटलं
यशस्वी
यशस्वी संयोजनाबद्दल सर्व संयोजकांचे अभिनंदन!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धा ह्यांनी गणेशोस्तव दणक्यात साजरा झाला!! मनापासुन आभार सगळ्याचे!!
संयोजक
संयोजक अभिनंदन.. उत्तम व यशस्वी आयोजनाबद्दल मनःपुर्वक अभिनंदन.
स्पर्धा जवळपास सगळ्याच चांगल्या झाल्या, प्रतिसादही छान मिळाला. माझी एक सुचना राहिल की स्पर्धा आव्हानात्मक असाव्यात पण सोबत सहज व सुटसुटीत म्हणजे खुपच जास्त नियम नको, कदाचित त्यामुळे काही स्पर्धाना अपेक्षित असा प्रतिसाद मीळाला नसावा.
सर्व
सर्व संयोजकांचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन..
माझा माबोवरचा १लाच गणेशोत्सव्..खूप छान वाटलं अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून..
वाईट एका गोष्टीचं मात्र वाटतं..संयोजन समितीने संयोजनाची संधी दिलेली असूनही आणि खूप ईच्छा असूनही मला त्यात मनाप्रमाणे सहभागी होत्ता आले नाही..याबद्द्ल क्षमस्व..
बाकी स्पर्धा आणि त्यांचे संयोजन देखील अतिशय सुयोग्य रीतीने करण्यात आले..
झकास पार
झकास पार पडला हा मायबोली गणेशोत्सव. संयोजन सुरेख होते. अगदी फ्रेश आणि इंटरेस्टींग अशा कल्पना होत्या स्पर्धांच्या आयोजनामधे. सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन. खूप मेहनत घेतली त्यांनी.
संयोजन
संयोजन मंडळातील सर्वजण नविन असुनसुद्धा अतिशय योजनबध्द आणि उठावदार असा मायबोली गणेशोत्सव साजरा करून संयोजनाची धुरा समर्थपणे सांभाळल्याबद्दल संयोजनमंडळाचे आणि यात सक्रीय सहभागी झालेल्या सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपतीबाप्पा मोरया!!!
अभिप्राया
अभिप्रायांबद्दल सर्वांना धन्यवाद !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.maayboli.com/node/3634
ह्या लिंक वर स्पर्धांसाठीचे मतदान सुरू केलेले आहे.
फारच
फारच नाविन्यपूर्ण गणेशोत्सव. दरवर्षी गणेशोत्सवात काही नवीन सुरु करायच हे केवढं अवघड आहे पण तुम्ही सर्व संयोजकांनी खूप श्रम घेतलेत आणि एक सरस गणेशोत्सव साकार केलात त्याबद्दल कौतुक आणि आभार.
सगळ्यांचं
सगळ्यांचं अगदी मनापासून अभिनंदन...... अतिशय सुरेख झाला आपल्या मायबोलीवरचा गणेशोत्सव. आयोजकांचं, स्पर्धकांचं.... अगदी मनापासून अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्या मायबोलीचा प्रचंड अभिमान वाटतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व
सर्व संयोजकांचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन..आणि सर्व मायबोलीकरान्चे अभिनन्दन!!!!!!!!
.
.
सर्व
सर्व संयोजकांचे , स्पर्धकांचे, अन कार्यक्रम सादर करणार्यांचे अभिनंदन. अतिशय संस्मरणीय झाला हा गणेशोत्सव!