९ ऑगस्ट, जेड गुडी बिग बॉसचे घर घाईघाईने सोडून गेली. नाही म्हटले तरी मनाचा विरस झाला. बिचार्या शिल्पाच्या अडचणीचा विचार करुन डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी अंमळ उशीराच जाग आली आणि ती पण मोबाईलच्या आवाजाने. जराशा आळसातच फोन उचलला आणि पलीकडचा आवाज ऐकून बेडवरुन पडायचाच बाकी होतो. दस्तुरखुद्द शिल्पा विचारत होती, "बिग बॉस मधे सहभागी होणार का?" मी म्हटले, "पण हा सेलेब्रिटी स्पेशल आहे ना?". "हो, म्हणूनच तर तुला फोन केला. तुला कोण नाही ओळखत? " सेलेब्रिटीला शोभेल अशा शिष्टपणाने मी सांगितले "माझी डायरी बघून सांगतो." "ठीक आहे, मी येतो." तिच्या नंतरच्या फ़ोनला, शक्य तितका भाव खाऊन उत्तर दिले.
स्वीटी माझे स्वागत कोणत्या गाण्याने करेल बरं? केतकी माझ्यासाठी कोणती स्पेशल डिश बनवेल? देबोजितला जरा अनुनासिक गायला शिकवले पाहिजे. बिचार्याला काही काम तर मिळेल तिथून बाहेर पडल्यावर. असे सगळे मनातले मांडे खात आमची स्वारी जाऊन पोहोचली लोणावळ्य़ाला!
मंडळी, इथे कल्पना करा की तुमच्या आवडत्या शिल्पाचा फोन तुम्हाला आला आहे. शिवाय देशासाठी काहीतरी केलेच पाहिजे अशा विचाराने तुम्ही भारावून गेला आहात. बिग बॉसमधे भाग घेऊन कितीतरी जणांचे वैचारिक परिवर्तन करता येईल याची पण तुमची खात्री पटली आहे. मग सांगा तर तुमचे (काल्पनिक) रोमांचक अनुभव, "बिग बॉसच्या घरात अस्मादिक".
********************************************************************
नियम :
१. शब्दमर्यादा २००० शब्द.
२. एक आयडी कितीही प्रवेशिका टाकू शकतो.
३. निकाल मतदानाद्वारे.
४. कथा तुम्ही हवी अशी फुलवू शकता. आजूबाजूची पात्र, लोकेशन(देश/परदेश), प्रसंग हे सगळं हवं ते घेऊ शकता.
५. कथेला logical end असावा.
६. कथेला शीर्षक असावे.
७. कथा प्रतिसादामध्ये लिहावी.
लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.
मायबोली
मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धा प्रवेशिका स्विकारण्याही मुदत संपली आहे. यापुढे कुठलीही प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारली जाणार नाही. लवकरच निकालासाठीचे मतदान सुरु केले जाईल त्यात सर्व मायबोलीकरांना मतदान करता येईल.
मायबोली गणेशोत्सव २००८