आई आई...

Submitted by सत्यजित on 19 August, 2008 - 11:34

अगदी परवा बॅंगलोरच्या टाईमस मध्ये बातमी वाचली."आता ह्यांच कोण?" एका दांपत्याचा अपघाती मृत्यू, सिग्नल वर दुचाकीवर उभे असता मागुन आलेल्या अर्थमुव्हर धडक दिली दोघे जागिच मरण पावले. त्यांना दोन लहान मुलं, एक ३ आणि दुसरा ५ वर्षाचा असवा कदाचीत. रोज कामासाठी बाहेर पडलेले आईबाबा घरी परत आलेच नाहीत. बिचा-या बाळाना हे पण माहीत नव्हत की काय झालं आहे. म्हणे घरी जमलेल्या गर्दीत आईला शोधत होती, आईला हाका मारत होती. ते चित्र डोळ्या समोरुन काही केल्या जात नाही. हे अस का होत? हा विचारच माझ्या सहन करण्या पलिकडचा आहे, देव(?) किंवा दैव अस का करत?

देवबप्पा , मी तुझपाशी
काही मागणार नाही
शहाण्या सारखा वागेन मी
मज देशिल का रे आई?
नसते आता अंगाई
न केसातुन फिरणारा हात
पाठीवरती थोपटणारा
तिचा निरंतर हात
मज अंधाराची भीती वाटते
वाटते भीती एकांताची
मिणमिणणार्‍या प्रकाशातल्या
मोठाल्या सावल्यांची
येता संकट कोणतेही
आईला बिलगत होतो
तिचा हातातुन सुटता हात
मी कीती बर दचकत होतो
आई आई हाक मारता
मजला उचलून घेई आई
तू जाना तुझ्या आईकडे
दे मला माझी आई...

-सत्यजित.

गुलमोहर: 

>>तू जाना तुझ्या आईकडे
दे मला माझी आई..

सत्या, डोळे पाणावलेत रे! कुणावरही असला प्रसंग येउ नये. तारे जमींपर मधले गाणे आठवले.

सत्या, भिडलं रे. हे वाचलं, पाहीलं की त्याची गणिते फारच अवघड वाटतात बघ.

खरच खुप हळुवार लिहलय डोळे पाणावतात वाचुन.

---तू जाना तुझ्या आईकडे
दे मला माझी आई...

अगदी भिडलं. खरंतर, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. हे आईविना पोरकं बाळ म्हणतंय, देवा तू पण श्रीमंत हो व मला पण कर.

खुप मस्त आहे कविता ,

ज्यानि लिहिले त्याचे कैवतुक करु ते कमिच आहे.......

आश्या कविता करनारयाला माज सप्रेम नम्सकार्...आहे....आश्या नविन नविन कविता करत रहा..................ओके ......मिन्ना............बाय.............

वाचता वाचता डोळयात पाणी आले. अशी वेळ कोणावरही येउ नये असे वाटते.