चांदोबा चांदोबा (युगाणी - विश्वनाथ खैरे)

Submitted by प्रज्ञापाटील on 8 April, 2010 - 22:01

हे आहे माझे वडील विश्वनाथ खैरे यांच्या १९७९ मधे प्रकाशित झालेल्या "युगाणी" मधील एक विज्ञान-गाणे.
दिव्याच्या दीपत्काराला विजेचा साक्षात्कार म्हणून ओळखणार्‍या नव्या युगातल्या बाळाने चांदोबाला "भागलास का" ऐवजी "येऊ का" विचारल्यावर चांदोबा काय म्हणतो:

चांदोबा चांदोबा येऊ का, येऊ का
पाठीवर पाय तुझ्या देऊ का, देऊ का?

एवढ्या लांब तू येशील कसा
हवा ना पाणी राहशील कसा?
यानात बसेन मी, उडाण मारीन
हवा नि पाणी संगेच आणीन

धरणीमाय तुला सोडायची नाय
गारठा नि धग इथं सोसायची नाय
राकेट्ट झाडीन सुटवेग घेईन
गवेश घालून उतरायला येईन

चुकशील एकटा अंधार दाट
खळग्या-शिळांनी भरली माझी पाठ
गणकोबा देतील आखून वाट
खेच तुझी थोडी माझी उडी अफाट

बराय बाबा, येऊन जा, येऊन जा
इथून पृथ्वी पाहून जा, पाहून जा
--------------------------------------------------

गवेशः गगनात घालण्याचा वेश
सुटवेग: पृथ्वीच्या ओढीतून सुटून जाण्यासाठी लागणारा वेग (escape velocity)
गणकोबा: Computer

गुलमोहर: 

छान!!

छान!