बेस्ट ऑफ सारेगमप

Submitted by Adm on 24 April, 2010 - 13:46

पुन्हा एकदा सारेगमप !!!! Happy
मराठी सारेगमप चं पुढचं पर्व सोमवार दिनांक २६ एप्रिल पासून होतय. ह्या पर्वात आधीच्या १८-३० वयोगटांच्या पर्वातले अंतिम फेरीत गेलेले (विजेते नाही) स्पर्धक सहभागी होणार आहेत. होस्ट परत एकदा पल्ल्वी जोशी. अवधूत गुप्ते परिक्षक आणि मान्यवर परिक्षक दर आठवड्याला बदलणार आहे. स्पर्धक पुढील प्रमाणे :
१. राहूल सक्सेना
२. अनिरुध्द जोशी
३. मंगेश बोरगावकर
४. ज्ञानेश्वर मेश्राम
५. आनंदी जोशी
६. सायली ओक
७. अपुर्वा गज्जला
८. विजय गटलेवार
९. अनिकेत सराफ
१०. संहिता चांदोरकर

हा धागा ह्या स्पर्धेतील गाण्यांबद्दल चर्चा करण्यासाठी....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छे छे..."अशोक्-निवेदिताचा मुलगा"- फारच महान प्रकरण आहे. तो निवेदिताचा मुलगा कोणत्याही अँगलने वाटत नाही.

आयच्ची कटकट... शिळ्या कढीला ऊत नुस्ता...पूर्वीचा वाद्यवृंद पण कंटाळला असावा परत ऊत आणायला..
त्यापेक्षा इंडियन आयडॉल वरची नाटकं बरी..

राहूल सक्सेना खेरीज ईतर कुणाचेच गाणे आधीच्या पर्वात ऐकले नसल्याने माझे मत unbiased म्हणायला हरकत नाही. Happy
पण एकंदरीत हे झी मराठी वरील top 10? हे राम!!!! Sad
सोमवारची गाणी पाहीली.... पल्लवी अन अवधूत असल्याने पुन्हा एकदा "करमणुक्"होणार हे नक्की! शिवाय ईथल्या experts चे साडी, मेकप, ड्रेस, ओठ, पोट, ई. वरील निरीक्षणे याही मौसमात हा बी.बी. गाजवतीलच..
वाद्यवृंद मात्र अगदीच गल्ली-बँजो आहे.
मान्यवर परीक्षक नेहेमीप्रमाणेच पाट्या टाकतीलच.
तेव्हा सूर, ताल, गायन याबबतीत काही विशेष अपेक्षा नाही ठेवल्या तर जरा tp होईल असे वाटते.

जे ऐकले त्यावरून सायली ओक, राहुल, अनीरुध्ध जोशी टिकतील(?) असा अंदाज आहे. बाकी सर्वांच्या बाबतीत आनंदी आनंद आहे... माऊलींची कृपा झाली तर "आयत्या" वेळी चमत्कार होतीलच.

एलिमीनेशन नाही म्हणून देवकी ताईंन्ना आणलं होतं का? :).. त्या अवधूत पल्लवी सकट सर्वांनाच एलिमीनेट करतील अशी भिती असावी झी ला.
-------------------------------------------------------------------------------
त्यातही ज्यांन्ना हे सर्व सोडून निव्वळ यातील गीत, संगीत या विषयी खाज आहे त्यांसाठी हा ऊप्द्व्यापः
सायली ओक ने गायलेल्या "मी मज हरपून" ची मूल आशा ताईंनी गायलेल्या गीताशी निव्वळ तांत्रिक तुलना दर्शविणारा आलेखः (fequency spectrum analysis):
हिरवा: आशा ताईंच्या मूळ गाण्याचा
निळा: सायली च्या गाण्याचा.
अर्थात हे करण्याआधी बरेच करावे लागते. जसे: सायली ने गाणे जवळ जवळ ३पट्टी खाली गायले. त्यामूळे प्रथम त्याची पट्टी मूळ गाण्याच्या पट्टीशी जुळवणे.. मग पाठील वाद्यव्रुंदांच्या frequency वगळून गायकाची अधोरेखित करणे, शिवाय सायली ने एकच कडवे गावून शेवटी तान घेतली त्यानुसार मूळ गाणे बदलून तुलना करणे वगैरे, वगैरे.....
उद्देश एव्हडाच की सायली चे सूर कुठे कमी जास्त झाले हे तपासणे. दोन्ही ग्राफ मधिल अंतर/तफावत अगदीच कमी आहे, किंबहुना ईतक्या कमी frequency चे अंतर/तफावत कानाला चटकन जाणवणार नाही.
ढळ्ढळीत बेसूर झालेले सूर कानाला जाणवतात तेव्हा ही तफावत ग्राफ मध्ये अधिक दिसून येईलच. पण गाण्याची सुरुवात अन शेवटचा आलाप यात सायली थोडी कमी पडलीये..कडवे अंतरा यात सूर जवळ जवळ पक्के लागले आहेत हे दिसून येईल.
oak_analysis.jpg
(पुढे मागे कधी कुण्या परिक्षकाने ऊगाच एखाद्या अतीसामान्य बेसूर गायकाला फुकट स्तुती करून जास्त गुण दिले तर हा ग्राफ श्रोत्यांना नक्की गाणे कसे झाले हे "सूरंच्या" कसोटीवर गुणात्मक रित्या स्पष्ट दाखवेल.)
तूर्तास ईतकेच... वेळ मिळाला तर असे ग्राफ सादर करीन.
त्या खेरी़ज सायली ने एकंदरीत गाणे ईतके खालच्या पट्टीत गायले की त्याचा भावनात्मक अपिल पूर्ण गायब झाला अन निव्वळ शास्त्रोक्त अंग शिल्लक राहिलं. मूल गाणे व सायली चे गाणे ऐकलेत तर फरक जाणवेल. आशा ताईंन्नी घेतलेल्या ताना, शब्दफेक या सर्वात एक लडीवाळ्पणा, धुंदपणा आहे जो या गीताचा आत्मा आहे...तोच ईथे हरवला आहे! ते दाखवणारा ग्राफ मात्र अजून जन्माला यायचा आहे!

स्पष्टीकरणः वरील ग्राफ मध्ये x axis वर frequency आहे, गाण्याची वेळ/(running song time) नव्हे. थोडक्यात खालचे सूर ते वरचे सूर यामधील तुलना आहे... ग्राफचे विश्लेषण करताना गाण्यात खालचे व वरचे सूर प्रामुख्याने कुठे होते (सुरुवात, शेवट, अंतरा) हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.

मिल्या,
मिळवलेले नाही रे राजा... मी केलय.

निंबुडा: हिरवा व निळ्या मधील संख्यात्मक तफावत.. it can be ignored as the difference is already visible in the graph.
शेवटच्या भागात तफावत जास्त आहे कारण आशा ताईंच्या ताना जराशा वेगळ्या आहेत.

बरेच वेळा गायक मूळ गाण्यापासून वेगळ्या हरकती किंव्वा स्वताच्याच काही जागा, ताना घेतो तेव्हा अशी तुलना करताना "शास्त्रीय" आधारावर करावी लागेल. जसे, मी मज हरपून हे गीत बिलावल रागात असल्याने, गायकाच्या नविन ताना, हरकती त्या रागाशी धरून असल्या तरच सुरेल वाटतील अन्यथा बेसूर ऐकायला येईल. अशा वेळी या रागाच्या सुरांची तशी रचनात्मक मांडणी (खमाज- थाट) लक्षात घेवून एक frequency pattern/range बनवून त्याच्याशी तुलना करावी लागेल..

अरे योग हा ग्राफ बघून मला वाटलं की तू कालच्या डो किंवा निफ्टीला इकडे का टाकलस? नंतर वाचल्यावर कळाले की तू पण चार्टिस्ट (पण गाण्यातला) निघालास. Happy

केदार,
दोन्ही प्रकार सेमच आहेत्.... आपण फक्त आकडे लावायचं काम करू शकतो... बाकी सब "ऊपर" वालेके हाथ मे है!

विवेक देसाई, तुम्ही 'पद्मश्री' पद्मजा फेणाणी असं लिहायला हवं होतं.!!!!!

राहुल सक्सेना इंडियन आयडॉल सीझन १ मधे होता (जेव्हा अभिजीत सावंत जिंकला). बहुधा पहिल्याच भागात बाहेर गेला होता...तेव्हा परीक्षक हळहळले होते.

झी वरचे दोन सूत्रधार (भावजी आणि खादाडे) इ-टीव्ही मराठीवर यायची धमकी देताहेत.

आज गाणी बघितली थोडी..

आनंदी जोशी, सायली ओक, अनिरुध्द, संहिता ह्यांची सोमवारची गाणी आवडली..

मंगळवारी संहिताने आणि वादकांनी मिळून त्या कांदेपोहेची काय वाट लावली !!!!!!!!!!आणि अवधूत म्हणे आधी भेटली असतीस तर तुझ्याकडून गाऊन घेतलं असतं... Uhoh त्या वादकांना काहितरी टॉनिक द्यायला हवं असं वाटलं.. अवंती पटेल नंतर ते गाणं खरं तर कोणी गाऊच नये.. तेव्हड्या लेवलला जातच नाही..

आनंदीने मंगळवारची लावणी चांगली गायली..

मला तिचे हातवारे नै आवडत.. फार डोक्यात जातात..
असं वाटतं ती आता ५ मिनिटात नाचायला सुरवात करेल .. Uhoh

भरत मयेकर...
<<विवेक देसाई, तुम्ही 'पद्मश्री' पद्मजा फेणाणी असं लिहायला हवं होतं.!!!>>... झालेल्या 'अक्षम्य' चुकिबद्दल 'दिलगीर' आहे...

आपण मला माझी चुक दाखवून दिल्याबद्दल, तुम्च्यासाठी एकदा 'जो. टा. झा. पा.'... Proud

योग हा ग्राफचा प्रकार फारच अवघड आणि भारी आहे. कसं काय केलत ? मस्त आहे. तुमच्या प्रयत्नाचे कौतुक करावे तेवढे कमीच ! __/\__

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकरांसाठीच टाळ्या वाजवा.
हृदय्नाथ मंगेशकर आणि त्या सारेगम मधे एकत्र असताना त्यांनी सांगितले की ज्यावर्षी लतादीदींना भारतरत्न मिळाले त्याच वर्षी पंडितजींना आणि पद्मजाना पद्मश्री मिळाले. म्हणजे दोघांचे कर्तृत्व (हा शब्द टाइपल्याबद्दल मलाही पद्मश्री हवे) सारख्याच मापाचे!

आरती,
धन्यवाद! यात अजून बरेच काही करता येईल.. जसे मूळ गायकाच्या सुरांशी तुलना करण्यापेक्षा निव्वळ पेटी/कीबोर्ड वर ते गाणे वाजवून त्या सुरांशी तुलना केली तर अधिक योग्य ठरेल. अर्थात जे कानसेन आहेत, अन ज्यांना सूराची चांगली जाण आहे त्यांना गाणे ऐकतानाच कुठे सूर चढले वा ऊतरले हे जाणवेल. पण त्याहीपेक्षा गायकाला या ग्राफ मुळे आपले कुठले सूर- खर्जातले, मध्यमातले, वरचे, कमी जास्त पडत आहेत याकडे लक्ष देणे व त्याचा अभ्यास करणे सोपे होईल.
ईथे आनंदी चे सोमवारचे गाणे "बाई माझी करंगळी मोडली" या गाण्याचे ऊदा. देतो.
गाणे तीने जवळ जवळ दिड पट्टी/सूर खाली म्हटले.
सुरुवातीलाच तीचे सूर कमी लागत होते. मला याचं मुख्य्कारण वाटतं ते म्हणजे तीचे नाकात गाणे. "ऐन दुपारी....ssssssss" याला जी हरकत्/आलापी आहे तीथे नाकात सूर लावल्याने "तीव्र" स्वर कमी पडले.
यमुनातिरी....sssss नंतरच्या आलापीचे सूर ऊतरते आहेत. तिथे आनंदीचे खालचे सूर कमकुवत पडले. खर्जातील सूर पक्के नसल्याने शिवाय नाकात गायल्याने हे होते. फक्त पहिली सुरुवात अन ध्रुवपदाचा ग्राफ ईथे देतोय.. बाकी पुढील सर्व गाणे अगदीच कमी दर्जाचे झाल्याने तो आलेख द्यायची गरज वाटत नाही.
anandi joshi analysis.jpg
या TOP 10 लेव्हल ला आनंदी सारखे गायक आणू नयेत असे माझे मत.
असो. राहुल च्या गाण्याचा आलेख नंतर अप्लोड करीन... चांगलाच असेल असे वाटते!

अरे वा ! >>> सुरुवातीलाच तीचे सूर कमी लागत होते. मला याचं मुख्य्कारण वाटतं ते म्हणजे तीचे नाकात गाणे. "ऐन दुपारी....ssssssss" याला जी हरकत्/आलापी आहे तीथे नाकात सूर लावल्याने "तीव्र" स्वर कमी पडले.
यमुनातिरी....sssss नंतरच्या आलापीचे सूर ऊतरते आहेत. तिथे आनंदीचे खालचे सूर कमकुवत पडले. खर्जातील सूर पक्के नसल्याने शिवाय नाकात गायल्याने हे होते.<<< मस्तच !
राहूल बरोबर संहिताचाही ग्राफ जमला तर टाकाल? मला वाटतं तिचाही बरा असावा ....

अन हो मज्जा म्हणून मेश्रामचा मूळ आणि परवाचा असाही ? जरा हाव वाढत चालली Proud
माझ्यामते अवधुतने बर्‍यापैकी काम केलं असणार एडिटिंगचे Happy

छे! मेश्राम वर ऊगाच वेळ घालवण्यात अर्थ नाही...
संहिता ने स्टाईल सोडून निव्वळ गाण्यावर लक्ष दिलं तर विचार करता येईल..
गज्जलाचेही तेच........

येत्या सोमवारी '१ मे' आणि 'महाराष्ट्राचे सुवर्ण-महोत्सवि वर्ष' स्पेशल एपिसोड...
मान्यवर परिक्षक: - शाहिर विठ्ठल उमप...

संदर्भः - लोकमत - पूणे आवृत्ती...

अवधूतची नवी थिअरी गाणं नुसतं कळावं नही तर गिळावं लागतं...मग मनमोराच्या पिसार्‍याचा खराटा होतो. >>>> प्रचंड टाळ्या......

त्याच वेळेला इन्डियन आयडॉल असतं ते पाहिलं काल, आणि आजही पाहिन. मस्त टिपी असतो. मराठी गाणी आपल्या जिव्हाळ्याची. जवळपास सगळी ओरिजिनल आपल्या कलेक्शनमध्ये असताना ह्या बळंच गायकांकडून ऐकत उगाच स्वतःची चिडचिड का करून घ्यायची? अवधूत काय बोलतो, पल्लवी का बोलते ह्या प्रश्नांनी निव्वळ मनस्तापच होतो..
त्यापेक्षा आयडॉलला कसं, टीपीच आहे, हे माहित असतं. सध्याच्या फालतू गाण्यांची अजूनच वाट लावतात, पण त्याने आपल्याला क्लेष तर नाही होत.. त्यामुळे आयडॉलच्या ब्रेकमध्ये दिसेल तेवढंच सारेगमप! त्यात पल्लवीची हिरवी-काळी पैठणी दिसली Happy सुंदर साडी, पण त्यावर दळभद्रीपणा करत खोटं मंगळसूत्र घालून आणि सो-कॉल्ड कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालून तिने त्या साडीचं सौंदर्य नष्ट केलंनच!! Angry
गाणं फक्त अनिरूद्ध जोशी आणि संहिताचं ऐकलं. त्यांच्यात्यांच्या वकूबाप्रमाणेच झालं एकूणात.

त्या ज्ञानेश्वर मेश्रामला 'माऊली' म्हणणं हा माऊलींचा अपमान आहे. स्वतः ज्ञानेश्वर मेश्राम ह्यावर आक्षेप कसा घेत नाही? Angry

पूनम सहमत आयडॉल बघताना खूप tp होतो.

ती आनंदी तर डोक्यात जाते केवढे हातवारे करते.. तिला पाहून त्या संजीवनी भेलांडेची आठवण होते.

" आनंदीच्या " बाबतीतले माझे शब्द मलाच मागे घ्यावे लागणार असं दिसतंय . Sad तिचा पूर्वीचा आवाज आणि आत्ताचा आवाज ह्यात जमीन आसमानाचे अंतर आहे . Sad गाण्यापेक्षा इतर गोष्टीत जरा जास्तच लक्ष देतेय असं तिच्या हावभावांवरून दिसतंय .

कालचा एपिसोड पाहताना आठवलं , स्वरदा गोखलेला घेतलं नाही हे माझं नशीब , झी ने उपकारच केले माझ्यावर . Wink

Pages