Submitted by मेधा on 2 May, 2010 - 14:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
एक वाटी तुरीची डाळ
मेथी, पालक, आंबटचुका,चाकवत चवळी, लाल माठ , अरुगुला यातील मिळतील त्या भाज्या साधारण दोन जुड्या.
सांबार पावडर
मीठ , हळद, तूप, मोहरी. हिंग, सुक्या मिरच्या , कढीपत्ता.
आंबट चुका किंवा चाकवत नसल्यास छोट्या लिंबाएवढी चिंच.
क्रमवार पाककृती:
डाळ थोडी हळद घालून कुकरमधून शिजवून घ्यावी.
पालेभाज्या बारीक चिरून , थोडा सांबार मसाला घालून शिजत लावाव्यात.
भाज्या शिजत आल्या की घोटलेली डाळ घालून अजून थोडा सांबार मसाला घालावा.
मीठ घालावे. चिचेचा कोळ घालावा.
दोन उकळ्या आल्या की तुपात मोहरी , सुक्या मिरच्या, कढीपत्ता,हळद, हिंग घालून फोडणी करावी व गरम गरम सांबारावर घालावी.
वाढणी/प्रमाण:
४ ते ६ जण
अधिक टिपा:
मैसुर बंगळूर भागात करतात हा प्रकार. मी नक्की कृती अशी विचारली नाही, पण खाऊन पाह्यलाय अन मग अंदाजाने वरच्या प्रकारे करते.
सोप्पू म्हणजे पालेभाजी.
माहितीचा स्रोत:
प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेधा धन्यवाद लगेच कृती
मेधा धन्यवाद लगेच कृती टाकल्याबद्दल! करुन पाहीन नक्की.
आमच्याकडे मायाळू घालून करतात
आमच्याकडे मायाळू घालून करतात हा प्रकार. तसेच ओले खोबरे, धणे, मिरच्या वाटून लावतात. आईला मंगलोरी मैत्रिणीनेच सांगितला होता हा प्रकार. आता बाकिच्या पालेभाज्या वापरून बघायल अपाहिजेत.