प्रॉमिस

Submitted by स्मितागद्रे on 30 April, 2010 - 00:33

संपली आता एकदाची वार्षिक परिक्षा
रोज रोज अभ्यासाची मुळीच नाही शिक्षा

रोज आता सकाळी खुप उशीरा ऊठणार
दुपार भर मैत्रीणींबरोबर भरपूर दंगा करणार

संध्याकाळी मस्तपैकी बागेत आपण जाऊ
गाडी वरची भेळपुरी एकदा तरी खाऊ

प्लीssssज एकदा तरी बर्फाचा रंगीत गोळा घेऊ
एक दिवस 'हायजिन' तुझ थोड बाजुला ठेऊ

पगमार्क्स च्या कँप ला मला मुळीच जायच नाही
खर सांगु ,तुझ्या शिवाय ट्रीप ला मजाच येत नाही

त्यापेक्षा मस्त पैकी पणजी च्या गावी जाऊ
समुद्रावर भटकु आणि भरपूर आंबे खाऊ

खर सांगते सुट्टीत सुद्धा रोज पाढे पाठ करेन
पुढच्या वर्षी ही परिक्षेत चांगले मार्क मिळवेन

रोज रोज कार्टून साठी हट्ट करणार नाही
भाज्या खाण्यासाठी सुद्धा त्रास देणार नाही

काही नको मला ,आई फक्त एकच प्रॉमिस देशील ?
माझ्या सुट्टी साठी थोडी तु ही सुट्टी घेशील ?

गुलमोहर: 

मस्त ग स्मीते Happy

काही नको मला फक्त एकच प्रॉमिस देशील ?
माझ्या सुट्टी साठी थोडी तु ही सुट्टी घेशील ?>>>>मेरा बस चले तो मै पुरा महिना छुट्टी लु Sad मी पण सुट्ट्या प्रॉमिस केल्यात Happy

खर सांगु ,तुझ्या शिवाय ट्रीप ला मजाच येत नाही

काही नको मला ,आई फक्त एकच प्रॉमिस देशील ?
माझ्या सुट्टी साठी थोडी तु ही सुट्टी घेशील ?

<<<<<<

स्मिता .

काही नको मला ,आई फक्त एकच प्रॉमिस देशील ?
माझ्या सुट्टी साठी थोडी तु ही सुट्टी घेशील ?

ह्या दोन ओळी खूप सुंदर, डोळ्यासमोर चित्र उभे राहते , आईला लाडाने विनवणी करणारी ती चिमूकली बाहूली.