Submitted by कविन on 30 April, 2010 - 07:12
एके दिवशी टोपीविक्या
चालला होता बाजारी
डोक्यावरती ओझे घेऊन
थकला होता तो भारी
दिसता झाड; केला विचार
खाऊन घ्याव्या भाकर्या चार
झोपही घेऊ थोडीफार
मSग भरभर गाठू बाजार
नव्हते त्याला पण ठावूक
झाडावर होती माकडे खूप
माकडे होती फारच हुशार
टोप्या घेऊन झाली पसार
झोपून उठता बघतो तर
टोप्या नव्हत्या जागेवर!
वरती बघता प्रकार कळला
माकड रावांचा प्रताप कळला
दगड मारुनी घाबरवले
तरी न माकड घाबरले
काय करावे कळेना
डोकेच त्याचे चालेना
डोक्यावरची टोपी फेकुन
तो ही बसला हताश होऊन
बघता त्याची टोपी खाली
माकडांनीही नक्कल केली
नकले मुळे गंमत झाली
टोप्या सगळ्या पडल्या खाली
टोप्या सार्या गोळा करुन
ऐटीत निघाला टाटाSS करुन
गुलमोहर:
शेअर करा
एकदम गोड कविगोष्ट
एकदम गोड कविगोष्ट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा!! मस्त गं....
व्वा!! मस्त गं....
छान.......... गोष्टीची
छान.......... गोष्टीची "कविता" झाली.
धन्स लोक्स काल सानुला गोष्ट
धन्स लोक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काल सानुला गोष्ट नको होती, नी नेहमीच्या नर्सरी र्हाईम्स पण नको होत्या. काही तरी रचुन गाण करचा फतवा निघाला. तेव्हा पहिली दोन कडवी सुचली. मग आता झोप बये उद्या बघु पुर्ण करुयात हे गाण म्हणुन बोळवण केली. आज गेल्या गेल्या हजेरी घेईल आता![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
छान कविता..!! मस्त जमली.
छान कविता..!!
मस्त जमली. बालपण आठवले.
कवे मस्त आज गेल्या गेल्या
कवे मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
आज गेल्या गेल्या हजेरी घेईल आता >> म्हणजे तुझी सुट्टिची शाळा सुरु
वर्षे हो गं
वर्षे
हो गं
लई बडबड(गीतं) करून र्हायली
लई बडबड(गीतं) करून र्हायली गं तू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त कथाकाव्य! लहानपणी ती
मस्त कथाकाव्य! लहानपणी ती वाचलेली गोष्ट अगदी चित्रांसकट आठवली!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच ग कवे
मस्तच ग कवे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
सुंदर. मुलाना खूप आवडेल.
सुंदर. मुलाना खूप आवडेल.