मराठी मालिकातील दुहेरी / विविध भूमिका

Submitted by mangeshminal on 13 November, 2009 - 18:38

'व्हॉटस युअर राशी ?' चित्रपटात प्रियांका चोप्राने केलेल्या १२ भूमिका व 'शंभु माझा नवसाचा' या २००६ साली प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात राजेश शृंगारपुरेने केलेल्या १२ भूमिका याविषयी बातम्या वाचनात आल्या. त्या अनुषंगाने मराठी चित्रपटातील दुहेरी / विविध भूमिका संकलित करण्यासाठी चित्रपट विभागात नवीन धागा सुरू केला.
त्याच्या प्रतिसादात काही जणांनी मराठी नाटकातीलही दुहेरी / विविध भूमिका कळवल्या. मराठी नाटकातील दुहेरी / विविध भूमिका संकलित करण्यासाठी नाटक विभागात नवीन धागा सुरू केला.

मराठी मालिकातील दुहेरी / विविध भूमिका संकलित करण्यासाठी हा धागा सुरू करत आहे.

आपल्याला माहित असलेल्या दुहेरी / विविध भूमिका कळवत रहा.

प्रत्येक नोंदीसाठी खालील माहिती जमा करता येईल.
प्रथम भागाचे साल, मालिकेचे नाव, वाहिनीचे नाव, कलाकाराचे नाव, व्यक्तिरेखांची संख्या, व्यक्तिरेखांची नावे

मराठी मालिकातील दुहेरी / विविध भूमिकांची यादी -
१९८४ श्वेतांबरा दूरदर्शन श्वेता जोगळेकर २ श्वेता / अंबरा

२००७ असंभव झी मराठी मानसी साळवी २ शुभ्रा शास्त्री / पार्वती शास्त्री
२००७ असंभव झी मराठी उमेश कामत २ आदिनाथ शास्त्री / महादेव शास्त्री
२००७ असंभव झी मराठी नीलम शिर्के २ सुलेखा / इंदुमती
२००७ असंभव झी मराठी सुनिल बर्वे २ डॉ. विराज सामंत / श्रीरंग रानडे
२००७ असंभव झी मराठी उर्मिला कानेटकर २ शुभ्रा शास्त्री / पार्वती शास्त्री
२००७ असंभव झी मराठी अशोक शिंदे २ भालचंद्र / बल्लाळ
२००९ अर्धांगिनी ई टीव्ही मराठी आदिती सारंगधर २ अरुंधती / दीक्षा

२०१३ माझे मन तुझे झाले ई टीव्ही मराठी / कलर्स मराठी हरिश दुधाडे २ शेखर देसाई / जीवा बोंगाटी
२०१५ प्रीती परी तुजवरी स्टार प्रवाह संचिता कुलकर्णी २ प्रीती / परी
२०१५ प्रीती परी तुजवरी स्टार प्रवाह प्रिया बेर्डे २ शर्मिला / उर्मिला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'द्विधाता' या दूरदर्शनवरील मालिकेत विक्रम गोखले यांनी दुहेरी भूमिका केली होती.
'अर्धांगिनी' या ई टीव्ही मराठीवरील मालिकेत आदिती सारंगधर हिने दुहेरी भूमिका केली आहे. तिने अरुंधती व दीक्षा या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
या माहितीचा अंतर्भाव करून मालिकातील विविध भूमिकांची यादी सुरू केली आहे.

काही महिन्यांपूर्वी संपलेली 'असंभव' ही मालिका पुनर्जन्मावर आधारित होती.
मानसी साळवी, उमेश कामत, नीलम शिर्के, सुनिल बर्वे यांच्या या मालिकेत दुहेरी भूमिका होत्या.
मानसी साळवीने बाळंतपणामुळे ही मालिका सोडल्यानंतर तिची भूमिका उर्मिला कानेटकरने केली होती.
मालिका संपायच्या काही महिने आधी अशोक शिंदेने या मालिकेत दुसरी भूमिका केली होती.

अशाप्रकारे, एकूण सहा कलाकारांनी या मालिकेत दुहेरी भूमिका केल्या होत्या.

एकाच चित्रपटात, नाटकात किंवा मालिकेत जास्तीत जास्त कलाकारांनी दुहेरी भूमिका करण्याचा हा कदाचित विक्रम असावा.

यादीत सुधारणा केली आहे.

श्वेतांबरा कोणाला आठवतेय का? पहिली मराठी मालिका त्यात विजया जोगळेकर धुमाळेंच्या मुलीने मध्यवर्ती दुहेरी भूमिका केली होती.

धन्यवाद भरत.
आपण दिलेल्या माहितीनुसार यादीत सुधारणा केली आहे.

ही व्यक्तिरेखा साकारणार्‍या स्त्री कलाकाराचे पूर्वाश्रमीचे नाव माहित झाल्यावर कळवा.
त्यांचे सध्याचे नाव श्वेता परुळेकर आहे. (हा उल्लेख त्यांच्या राजकीय कारकीर्दीसंबंधी आलेल्या बातमीत वाचला होता.)

श्वेतांबरा ही दूरदर्शन वरील पहिली प्रायोजित मालिका होती.

आत्ता माझे मन तुझे झाले मध्ये new track आलाय त्यात हिरोची भूमिका करणाऱ्याचा duplicate रोल नक्षलवादी व्हिलन आहे.

कलाकाराचे नाव 'हरीश दुधाडे'. हिरो शेखर, नक्षलवादी जीवा.

हिर्विनीची!!!!!!! म्हनजे मालिकेच्या जाहिरातीत दाखवले जाते व कुठेतरी वाचले होते म्हणून टाकले बर का !!

धन्यवाद अन्जू.
आपण दिलेल्या माहितीनुसार यादीत सुधारणा केली आहे.

द्विधाता मालिकेत विक्रम गोखले यांनी दुहेरी भूमिका साकारली नव्हती का?
या मालिकेनंतर काही वर्षांनी 'दुहेरी' ही मालिका आली होती. ती दूरदर्शनवर दाखवली की एखाद्या खाजगी उपग्रह वाहिनीवर हे नक्की आठवत नाही. या मालिकेत विक्रम गोखले यांची दुहेरी भूमिका होती का?
बहुतेक, 'दुहेरी' मालिकेत एकाच व्यक्तिरेखेची २ रूपे होती.

आपण किंवा इतर कोणी याविषयी अधिक माहिती कळवल्यास बरे.

धन्यवाद अन्जू.
आपण दिलेल्या माहितीनुसार यादीत सुधारणा केली आहे.

द्विधाता मालिकेत विक्रम गोखले यांनी दुहेरी भूमिका साकारली नव्हती का?
या मालिकेनंतर काही वर्षांनी 'दुहेरी' ही मालिका आली होती. ती दूरदर्शनवर दाखवली की एखाद्या खाजगी उपग्रह वाहिनीवर हे नक्की आठवत नाही. या मालिकेत विक्रम गोखले यांची दुहेरी भूमिका होती का?
बहुतेक, 'दुहेरी' मालिकेत एकाच व्यक्तिरेखेची २ रूपे होती.

आपण किंवा इतर कोणी याविषयी अधिक माहिती कळवल्यास बरे.

रवींद्र मंकणी यांनी एका मालिकेत दुहेरी भूमिका साकारली होती.

गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व त्यांचा विवाहबाह्य संबंधातील मुलगा अशी ही दुहेरी भूमिका होती.
याबद्दल अधिक काही माहिती असेल तर जरुर कळवा.

धन्यवाद अन्जू.
आपण दिलेल्या माहितीनुसार यादीत सुधारणा केली आहे.

द्विधाता मालिकेसंबंधी नोंद यादीतून काढली आहे.

आपल्याला 'दुहेरी' मालिकेविषयी काही माहिती मिळाल्यास जरुर कळवा.

धन्यवाद अपर्णा, आपण व अंजू यांनी कळवल्याप्रमाणे 'प्रीती परि तुजवरी' या मालिकेतील दुहेरी भूमिका यादीत नमूद केली होती.

याच मालिकेत प्रिया बेर्डे यांची दुहेरी भूमिका ३० नोव्हेंबर २०१५ पासून सुरू झाली आहे.
परीचा नवरा साहिल याची आई शर्मिला व साहिल याची मावशी उर्मिला या २ भूमिका प्रिया बेर्डे साकारत आहेत.

यादीत सुधारणा केली आहे.